आजच्या काळात गुगल पे (Google Pay) आणि पेटीएम (Paytm) सारख्या पेमेंट अॅप्सचा (Payment Apps) वापर खूप वाढला आहे. कारण या अॅप्सद्वारे सहज पैसे ट्रांन्सफर करण्याबरोबरच टीव्ही रिचार्जपासून वीज बिल भरण्यापर्यंत सर्व कामे अत्यंत वेगत होतात. पण समजा जर तुमचा स्मार्टफोन चोरीला गेला किंवा हरवला तर मात्र अडचण होऊ शकते. अशा प्रसंगी तुमचा वैयक्तिक डेटा (Personal Data) आणि बँक खात्यात (Bank Account) असलेल्या पैशांना धोका निर्माण होऊ शकतो. हा धोका टाळण्यासाठी तुमचा फोन चोरीला गेल्यास किंवा हरवल्यास तुमच्या फोनमधील गूगल पे आणि पेटीएम खाते अशा पेंमेट अॅप्स ब्लॉक करणे हा सुरक्षीत पर्याय असतो आज आपण हे अॅप्स कसे ब्लॉक करावे हे आपण जाणून घेणार आहोत.
पेटीएम खाते कसे ब्लॉक करावे?
पेटीएम खाते ब्लॉक करण्यासाठी पहिल्यांदा हेल्पलाईन क्रमांक 01204456456 वर कॉल करा
येथे लॉस्ट फोन हा पर्याय असेल तो निवडा
आता आपल्या चोरी झालेल्या स्मार्टफोनचा नंबर त्या ठिकाणी टाका
आता लॉग-आउट फ्रॉम ऑल डिव्हाइस हा पर्याय निवडा
याशिवाय तुम्ही पेटीएमच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन 24x7 हेल्प पर्यायावर क्लिक करू शकता
रिपोर्ट ए फ्रॉर्ड पर्याय निवडा आणि एनी कैटेगरीवर क्लिक करा
येथे इश्युवर क्लिक करा आणि मेसेज अस बटणावर टॅप करा
आपल्याला येथे ब्लॉक करण्यात येत असलेले खाते तुमचेच असल्याचा पुरावा द्यावा लागेल. पुरावा म्हणून तुम्ही डेबिट / क्रेडिट कार्डचा तपशील, पेटीएम अकाउंट व्यवहार, ईमेल किंवा एसएमएस आणि चोरी झालेल्या फोनबद्दलची पोलिस तक्रार पत्र सबमिट करू शकता. पुराव्याची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पेटीएम खाते ब्लॉक केले जाईल.
Google Pay खाते कसे ब्लॉक करावे?
Google Pay वापरकर्त्यांचे खाते ब्लॉक करण्यासाठी, हेल्पलाइन नंबर 18004190157 वर कॉल करा
येथे एखाद्या तज्ञाशी बोलण्यासाठी पर्याय निवडा
आता तज्ञ आपल्याला Google Pay खाते बंद करण्यात मदत करेल
याखेरीज आपण आपला फोन फॅक्टरी रीसेट करू शकता. असे केल्याने आपले Google Pay खाते हटविले जाईल आणि इतर कोणीही तुमचे खाते वापरु शकणार नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.