Meta AI on WhatsApp 
विज्ञान-तंत्र

Meta AI on WhatsApp : 'व्हॉटसअप युनिव्हर्सीटी' झाली अडव्हान्स; एका क्लिकवर मिळतेय खात्रीलायक माहिती

How to use Meta AI on WhatsApp : काही दिवसांपासून व्हाटसअ‍ॅपच्या युजर इंटरफेसमध्ये एक नवीन अनाहूत पाहुणा दिसू लागला आहे.

प्रकाश सनपूरकर

सोलापूर : व्हॉटसअपवर आलेला गोल रंगाचा जांभळा ठिपका म्हणजेच मेटा एआयच्या माध्यमातून आता हवी ती माहिती व्हॉटसअपवर विचारा, लगेच दुसऱ्या सेंकदाला त्याचे उत्तर मिळत आहे. व्हॉटसअपवरील या नव्या फिचरमुळे गुगल ऐवजी व्हॉटसअप मेटा एआय सर्वांना मदत करणार आहे.

काही दिवसांपासून व्हाटसअ‍ॅपच्या युजर इंटरफेसमध्ये एक नवीन अनाहूत पाहुणा दिसू लागला आहे. मेटा एआय नामक हे व्हाटसअ‍ॅपचेच सर्वात लेटेस्ट फिचर आहे. हे फेसबुक, व्हाटसअ‍ॅप आणि इन्स्टाग्राम युजर्ससाठी लाँच केले आहे. मेटा एआयसाठी नवीनतम लियामा ३ टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे.

वापरण्यासाठी काय करावे?

- व्हॉटसअप स्क्रीनवर निळ्या जांभळ्या रिंगवर टॅप करा

- नवीन चॅट बॉक्समध्ये मध्ये संवाद सुरू करा

- कोणती माहिती हवी ती कंपोज करून पोस्ट करा

- लगेच काही सेकंदात संबंधित माहिती मिळेल

ठळक बाबी

- माहितीसाठी गुगल सर्चची गरज नाही

- मेटा एआयचे इमॅजिन फिचरद्वारे यूजर एआय जनरेटेड प्रतिमा शेअर करता येईल.

- ईमॅजीन फीचरमुळे मेटा एआयचे चॅटजीपीटी आणि गुगल जेमिनीपुढे आव्हान

- ईमॅजीन फीचरचा वापर करण्यासाठी मेटा एआयच्या चॅट बॉक्समध्ये फक्त इमॅजिन हा शब्द टाईप किंवा उच्चारुन इमेज प्रॉम्प्ट द्यावे लागतील.

मेटा एआय काय काम करतो?

तर मेटा एआय हा नेमका काय प्रकार आहे? ज्यांना चॅटजीपीटी किंवा गुगल जेमिनी ठाउक आहे त्यांना जनरेटीव एआय असिस्टंट माहित असेल.

मेटा एआय हा तसाच जनरेटीव्ह रिस्पॉन्स आहे. तो युजर्सना फेसबुक, व्हाटसअ‍ॅप किंवा इन्स्टाग्राम वापरत असताना अ‍ॅपमधून बाहेर न जाताच माहिती पुरवतो. यामध्ये प्लॅनिंग, सल्ला, सजेशन, शिफारशी, काल्पनिक इमेजिस तयार करतो.

मेटा एआय व्हॉट्सअ‍ॅपमध्ये सुद्धा सामान्य वापरकर्त्यांनी संदेशांच्या प्रत्युत्तरांची आणि उत्तरांची देणगी करू शकतात. हे बुद्धिमान सहाय्यक विविध कार्यांमध्ये मदत करते, विचारांची देवाणघेवाण, कल्पनाशील विचारांमध्ये मदत, सूचनांवरून चित्रे तयार करणे व विविध विषयांवर माहिती प्रदान करते. यात, संदेशांच्या उत्तरांची देणगी लवकरात यथार्थपूर्वक करण्याची क्षमता आहे. - प्रो. डॉ.मिथून पाटील, विभागप्रमुख एआय ॲंड डाटा विभाग, ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालय.

मेटा एआय ही मेटा कंपनीद्वारे विकसित केलेली कृत्रिम बुद्धिमत्ता आहे जी आपल्या दैनंदिन जीवनात अनेक लाभ देऊ शकते. यामध्ये आवाज ओळखणे, भाषांतर, वैयक्तिक सहाय्यक, स्मार्ट उपकरणांचे नियंत्रण, आणि आरोग्य सेवा सुधारण्यासाठी डेटाचे विश्लेषण आदीसाठी त्याचा उपयोग होतो. यामुळे संवाद सुलभ होतो, कार्यक्षमतेत वाढ, दैनंदिन क्रियाकलाप जलद व सोपे होतात. उदाहरणार्थ, त्याच्या मदतीने आपण घरातील उपकरणे नियंत्रित करू शकतो किंवा आरोग्यविषयक सल्ले मिळवू शकतो. - वैष्णवी रुपेश क्षीरसागर,विद्यार्थीनी, ऑर्कीड अभियांत्रिकी महाविद्यालय.

तांत्रिक अभ्यासासाठी हे फीचर वापरता येते. व्यक्तिगत मार्गदर्शन, संवादात्मक धडे आणि त्वरित अभिप्राय देऊन कोडिंग, गणित आणि विज्ञानातील संकल्पना सोप्या करते. तुमच्या कौशल्यांचा विकास आणि समज वाढवण्यासाठी हे अत्यंत उपयुक्त आहे. - श्रीराज वल्लमदेशी, विद्यार्थी, ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election : सट्टाबाजारामध्ये महायुती ‘फेव्हरिट’!महाआघाडीला १ रुपयाला २ रुपये १५ पैसे भाव

Nashik Vidhan Sabha Election: ओझरला रात्री साडेदहापर्यंत मतदान; सुरगाणा, त्र्यंबकेश्‍वर व इगतपुरीच्या मतपेट्या मध्यरात्री जमा

IND vs AUS : स्टंपकडे जाणारा चेंडू लाबुशेनने रोखला, सिराज चांगलाच चिडला; कोहलीने तर बेल्सच उडवल्या..काय हा प्रकार

K.K. Muhammed : ‘ते बारा स्तंभ’ राममंदिराचे अवशेष...पुरातत्त्वविद के.के. मोहम्मद यांची पद्म फेस्टिव्हलमध्ये माहिती

Sanjay Raut: ...नाहीतर भाजप घाईघाईत गौतम अदानींना मुख्यमंत्री बनवेल, मविआच्या नेत्याचा खोचक टोला, नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT