कसा ठरतो ट्रेनचा स्पीड Esakal
विज्ञान-तंत्र

Indian Railways ट्रेनचा स्पीड नेमकं ठरवतं तरी कोण? तुम्हाला देखील हा प्रश्न पडलाय मग जाणून घ्या उत्तर

अनेकदा ट्रेन किंवा एक्स्प्रेस मेल मधून प्रवास करत असताना काही वेळेस ट्रेन सुसाट पळत असल्याचं लक्षात येतं तर काही वेळस मध्येच ट्रेनची गती मंदावते. अशा वेळी ट्रेनचा स्पीड नेमका चालकाच्या हातात आहे की कंट्रोल रुममधील आदेशानुसार स्पीड कमी जास्त केला जातो, असे प्रश्न निर्माण होतात

Kirti Wadkar

भारतासारखा प्रगत देश आज रेल्वेमुळे जोडला गेलेला आहे. भारतातील प्रत्येक राज्य, जिल्हे आणि अनेक ठिकाणं ही ट्रेनने जोडली गेलेली आहेत. भारतात रेल्वेचं जाळं Railway हे प्रचंड मोठ्या प्रमाणात विखुरलेलं आहे. Know information in Marathi who decides speed of trains in India

महत्वाच्या मार्गांवरील प्रत्येक रुळावर इथं दिवसाला शेकडो ट्रेन Trains धावतात. ज्यातून लाखो प्रवासी प्रवास करत असतात. भारतातील जनतेला त्यांना हव्या असलेल्या ठिकाणी खिशाला परवडेल अशा दरात प्रवास Travel करण्यासाठी सध्याच्या घडीला भारतीय रेल Indian Railway हा एक सर्वोत्तम पर्याय आहे.

ट्रेनने दररोज प्रवास Journey करत असताना आपल्या प्रत्येकाच्याच मनात ट्रेन किंवा रेल्वे संबधी अनेक प्रश्न निर्माण होत असातात. एकाच रुळावरून अनेक ट्रेनचं नियोजन कसं होत असेल? कंट्रोल रुममध्ये कसं काम चालत असेल? यातीलच एक महत्वाचा प्रश्न म्हणजे ट्रेनचा स्पीड कोण कंट्रोल करतं?

अनेकदा ट्रेन किंवा एक्स्प्रेस मेल मधून प्रवास करत असताना काही वेळेस ट्रेन सुसाट पळत असल्याचं लक्षात येतं तर काही वेळस मध्येच ट्रेनची गती मंदावते. अशा वेळी ट्रेनचा स्पीड नेमका चालकाच्या हातात आहे की कंट्रोल रुममधील आदेशानुसार स्पीड कमी जास्त केला जातो, असे प्रश्न निर्माण होतात.

खास करून सर्व राजधानी एक्सप्रेसमध्ये एक सारखंच इंजिन असतं. तरी प्रत्येक गाडीचा स्पीड मात्र वेगवेगळा असतो. ट्रेनचा स्पीड नेमकी कोण ठरवतं? ट्रेन किंवा एक्सप्रेस चालवणाऱ्या चालकाला लोको पायलट म्हटलं जातं.

हे देखिल वाचा-

ट्रेनच्या स्पीडचा कंट्रोल कोणाकडे?

ट्रेन किंवा एक्सप्रेसच्या स्पीडचा कंट्रोल हा लोको पायलटकडेच असतो. ट्रेनचा स्पीड कमी जास्त करण्याचं काम किंवा ट्रेन थांबवण्याचं काम लोको पायलट करत असला तरी स्पीड ठरवण्याचं काम किंवा निर्णय लोको पायलट घेत नाही.

ट्रेनच्या स्पीडचा कंट्रोल लोको पायलटकडे असला तरी तो स्पीड ठरवत नाही. ट्रेन सुरु होण्यापूर्वी पायलटला एक प्लॅन दिला जातो. ज्यामध्ये कोणत्या भागात स्पीड कमी जास्त करायचा आहे याच्या सूचना देण्यात आलेल्या असतात. त्यानुसार ट्रेन किंवा एक्सप्रेसचा स्पीड ठराविक ठिकाणी कमी जास्त केला जातो.

रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार देशभरात ६८००० किलोमीटरवर रेल्वेचं जाळं पसरलेलं आहे. रेल्वेचे वेगवेगळे विभाग करण्यात आले आहेत. यामध्ये भौगोलिक क्षेत्रासोबतच, ट्रेनची संख्या, ट्रॅकवर येणारे टनेल आणि वळणं अशा विविध गोष्टींचा विचार करून विभागणी करण्यात आली आहे. या सगळ्याचा विचार करून ट्रेनच्या स्पीडचा प्लान आखला जातो.

आधीच ठरवला जातो ट्रेनचा वेग

रेल्वेचे ट्रॅक किंवा रुळावरून एखादी ट्रेन ताशी ९० किमी ते १६० किमी वेगाने धावू शकते. मात्र सर्व ट्रेन एकसारख्या नसल्याने त्या ट्रॅकवरून एकाच वेगाने धावू शकत नाहीत. म्हणूनच मार्गावर येणारे टनेल, उतार, मोठी शहर आणि इतर भौगोलिक स्थिती लक्षात घेऊन ट्रेनचा स्पीड ठरवला जातो. साधारणपणे ट्रेनचा कमीत कमी स्पीड ही ५० किमी प्रति तास इतका असतो.

अशा प्रकारे ट्रेनचा मार्ग लक्षात घेऊन आधीच ट्रेनची स्पीड ठरवण्यात आलेला असतो. या प्लॅन किंवा आराखड्यानुसारच लोको पायलट ट्रेनचा स्पीड कमी-जास्त करत असतात.

हे देखिल वाचा-

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद; निफ्टी बँकेत तेजी, कोणते शेअर्स तेजीत?

IND vs AUS : विराट कोहलीला खुणावतोय राहुल द्रविडचा विक्रम; ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर हव्यात फक्त १०२ धावा

तर 'कुछ कुछ होता हैं' मध्ये राणी मुखर्जी ऐवजी दिसली असती ऐश्वर्या राय; 'या' कारणामुळे दिलेला नकार, म्हणालेली-

Stock Market: कोण आहेत FPI आणि FII? त्यांच्यामुळे शेअर बाजार कोसळतो अन् तेजीत येतो?

महाराष्ट्रात गलिच्छ राजकारण सुरू, 'अदृश्य' शक्तीने कारस्थान रचून दोन पक्ष फोडले; सुप्रिया सुळेंचा भाजपवर हल्ला

SCROLL FOR NEXT