विज्ञान-तंत्र

हवं ते काम करेल 'डंजो'!

सायली क्षीरसागर

तुम्ही कामावर गेला आहेत आणि काही महत्त्वाची कागदपत्रे घरीच विसरली आहेत आणि ती तुम्हाला लगेच हवी आहेत... किंवा तुम्ही ऑफिसच्या कामात व्यस्त आहात आणि घरातला किराणामालच संपला आहे... अशावेळी काय करणार? ऑफिसमधून घरी जाणार की, कामातून वेळ काढून दुकानात जाऊन सामान आणणार? तर आता असं काहीही करायची गरज नाही! कारण तंत्रज्ञानाने तुमची खूप महत्त्वाची सोय करून ठेवली आहे.  तेही हातातल्या स्मार्टफोनवरून तुम्हाला तुमचा महत्त्वाचा वेळ न दवडता एका क्लिकवर तुमची सर्व कामं करता येणार आहेत.  ही कामं करेल 'डंजो' अॅप! 

स्मार्टफोनमध्ये होत गेलेले उपयुक्त बदल आपण बघत आलोय. पण आपली वैयक्तिक कामं, म्हणजेच इस्त्रीचे कपडे आणणं, औषधं आणणं, सामान आणणं, चार्जर विसरला असल्यास तो आणून देणं अशी अनेक किरकोळ वाटणार मात्र महत्त्वाची असलेली काम मोबाईलवरून होतील अशी अपेक्षा कोणीच केली नव्हती. मात्र, डंजो अॅपने सामान्यांचं जगणं आणखी सोपं केलंय. केवळे फूड डिलिव्हरी न करता सर्वच प्रकारची कामं करणारं हे अॅप अनेक स्मार्टफोन युजर्सचं लाडकं आणि आवडतं अॅप आहे. कामात व्यस्त असणाऱ्या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये हे अॅप दिसतंच. अॅप स्टोअरवर Dunzo | Delivery App for Food, Grocery & more अशा नावाने हे अॅप उपलब्ध आहे. 

डंजो - डिलिव्हरी अॅप

डंजो हे डिलिव्हरी अॅप असून २४x७ चालणारी डंजोची सेवा ही केवळ ४५ मिनिटांत तुमचं काम करते. २०१५ मध्ये सुरू झालेलं हे अॅप काही दिवसांतच लोकांच्या पसंतीस उतरलं, कारण आपण सांगितलेली कामं, आपल्या पद्धतीने ते उत्तम प्रकारे करत होते. विशेष म्हणजे हे अॅप भारतीयांनी सुरू केलेलं आहे.

कबीर बिस्वास, मुकुंद झा, दलवीर सुरी, अंकुर अग्रवाल या चौघांनी मिळून हे अॅप सुरू केलं. अॅप सुरू करण्यापूर्वी त्यांनी व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून चाचणी घेतली. प्रतिसाद किती व कसा येतोय हे बघून त्यांनी आणखी माणसं या अॅपसोबत जोडली. डिलिव्हरी बॉय, हॉटेल्स, किराणामालाची दुकानं अशा अनेकांना हाताशी धरून 'डंजो'चा प्रवास सुरू झाला. सध्या पुणे, मुंबई, बंगळू, चेन्नई, दिल्ली, जयपूर, हैदराबाद, गुडगाव अशा मोठ्या शहरांमध्ये डंजोची सेवा उपलब्ध आहे. आणखी शहरांमध्ये डंजो सुरू करण्याची योजना आहे. 

डंजो का वापरावे?

- सर्वात वेगवान घरपोच सेवा
- अगदी लहान गोष्टींपासून मोठ्या गोष्टींपर्यंत सर्व प्रकारची सेवा व पुरवठा
- शहराच्या कानाकोपऱ्यात सेवा
- काही ठराविक वेळी ५० टक्क्यांपर्यंत सूट 
- ऑनलाईन पेमेंट उपलब्ध 
-  २४x७ सेवेसाठी सज्ज

डंजोवर उपलब्ध सेवा

- रेस्टॉरंट्स, हॉटेल्स
- किराणा, ताजी फळे, भाज्या, मासे, चिकन
- औषधे
- विसरलेल्या वस्तू मागवणे
- ड्रायक्‍लीनिंग 
- भेटवस्तू 
- डंजो बाइक, टॅक्‍सी
- पेट सुविधा

असं काम करेल डंजो...

किराणा, भाजी, फळे, खाद्यपदार्थ असे करा ऑर्डर
1. तुमच्या नजीकचे स्टोअर निवडा. 
2. तुम्हाला हव्या असलेल्या वस्तू निवडा.
3. उपलब्ध पर्यायांतून तुम्हाला हवा असलेला पर्याय निवडून पेमेंट करा. 
4. केवळ तासाभरात डिलिव्हरी मिळवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

Ghatkopar East Assembly Election 2024 Result live : घाटकोपर पूर्व मतदार संघात भाजप आणि शरद पवार गटात दुहेरी लढत

Mira Bhaindar: Assembly Election 2024 Result Live: मिरा-भाईंदर मतदारसंघात सय्यद मुजफ्फर हुसेन विरुद्ध नरेंद्र मेहता

SCROLL FOR NEXT