know some tips to protect your personal data from theft marathi article  Google
विज्ञान-तंत्र

तुमचा पर्सनल डेटा होऊ शकतो चोरी, सुरक्षेसाठी वापरा 'या' टिप्स

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : कोविडच्या पार्श्वभूमीवर जग अधिकाधिक डिजिटल झाले आहे. लोक अधिक वेळ ऑनलाइन राहत असतात. ई-मेल आयडी, फोन नंबर, वेगवेगळे पासवर्ड, बँकेचे तपशील आदी वैयक्तिक तपशील अनेकजण संकेतस्थळांवर तसेच विविध अ‍ॅपवर शेअर करतात त्यामुळे डेटा चोरी होण्याची शक्यता वाढते.

आजकाल अनेक कंपन्या ग्राहकांसोबत जुळण्यासाठी त्यांचा वैयक्तिक डेटा गोळा करतात. परंतु काही घटना लक्षात घेतल्यास वैयक्तिक डेटाचे संरक्षण करण्यासाठी पुरेशी यंत्रणा किंवा उपाययोजना आपल्याकडे उपलब्ध नाही. डेटा चोरीमुळे व्यवसायाला तसेच वैयक्तिकरित्या नागरिकांना मोठा फटका बसतो. ज्या व्यक्तीचा डेटा चोरीला गेला आहे, त्याच्यासाठी हल्लेखोर फिशिंग घोटाळे, बँक खाती हॅक करून, खात्याचा पासवर्ड बदलणे, डेटा चोरी करून बँक कर्ज काढल्या जाऊ शकते. म्हणूनच, ग्राहकांनी त्यांचा डेटा लीक झाला आहे की नाही हे तपासणे आणि त्याबाबत उपाययोजना करणे महत्वाचे आहे.

डेटा चोरीतून कसे वाचावे?

- सोशल मीडियावरील आपले पासवर्डमध्ये वेळोवेळी बदल करत राहा.

- सर्व ऑनलाइन प्लॅटफॉर्मसाठी मजबूत आणि हटके पासवर्ड वापरा

- अकाऊंट लॉगिनसाठी टू-फॅक्टर ऑथेंटिकेशनचा वापर करा

- ईमेलवर आलेल्या संशयास्पद लिंकपासून सावध राहा आणि अनोखळी वेबसाईटवर क्लिक करणे टाळा

- उत्तम दर्जाच्या अँटीव्हायरस सोल्यूशनचा वापर करा.

क्विक हीलच्या मुख्य उत्पादन व्यवस्थापक स्नेहा काटकर म्हणाल्या, "वाढत्या डेटा उल्लंघनामुळे, आम्ही क्विक हील मध्ये डेटा ब्रीच अलर्टसारख्या नवीन गोपनीयता वैशिष्ट्यांचा समावेश करून आमच्या ग्राहकांच्या समस्या सोडविण्यासाठी अद्ययावत झालो आहोत. हे ग्राहकांना त्यांच्या वैयक्तिक डेटाशी तडजोड केल्यास त्वरित सूचना देते आणि त्यानुसार सक्रियपणे त्यापासून बचावाच्या उपाय सूचवते. आमच्या नव्या सुरक्षा उपाययोजनांमध्ये अँटी-ट्रॅकर, वेबकॅम संरक्षण, सुरक्षित बँकिंग आणि बरेच काही यासारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut: ...नाहीतर भाजप घाईघाईत गौतम अदानींना मुख्यमंत्री बनवेल, मविआच्या नेत्याचा खोचक टोला, नेमकं काय म्हणाले?

IND vs AUS : स्टंपकडे जाणारा चेंडू लबूशेनने रोखला, सिराज चांगलाच चिडला; कोहलीने तर बेल्सच उडवल्या..काय हा प्रकार

K.K. Muhammed : ‘ते बारा स्तंभ’ राममंदिराचे अवशेष...पुरातत्त्वविद के.के. मोहम्मद यांची पद्म फेस्टिव्हलमध्ये माहिती

IND vs AUS: पर्थ कसोटीत ऋषभ पंतसोबत IPL ऑक्शनची चर्चा; हाय व्होल्टेज सामन्यातील दोन्ही संघातील खेळाडूंच्या संवादाचा Video Viral

Ram Naik : अलीकडच्या राजकारणात एकमेकांना नाव ठेवण्याची स्पर्धा : राम नाईक यांनी व्यक्त केली खंत

SCROLL FOR NEXT