Fast Charging  
विज्ञान-तंत्र

30 मिनीटात बॅटरी फुल्ल; पाहा सुपरफास्ट चार्जिंग होणारे स्मार्टफोन

सकाळ डिजिटल टीम

Fast Charging Smartphones : स्मार्टफोन कंपन्या सध्या फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजीवर जास्त भर देत आहेत. या सेगमेंटमध्ये काही महिन्यांपूर्वी, Xiaomi ने त्यांची 200-वॅट फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी हायपरचार्ज लॉंच केले होते. कंपनीचा दावा आहे की, या तंत्रज्ञानाच्या मदतीने 4000mAh बॅटरी असलेला स्मार्टफोन केवळ 8 मिनिटांत 0-100% पर्यंत चार्ज होईल. मात्र 200W फास्ट चार्जिंग सपोर्ट असणाऱ्या स्मार्टफोनसाठी, आपल्याला थोडी वाट पाहावी लागणार आहे.

सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या स्मार्टफोन्सबद्दल बोलायचे झाल्यास सध्या फास्ट चार्जिंग तंत्रज्ञान असलेले अनेक पावरफुल स्मार्टफोन उपलब्ध आहेत, जे अगदी कमी वेळेत पूर्ण चार्ज होतात. चला जाणून घेऊया अशाच काही बेस्ट स्मार्टफोन्सबद्दल.

OnePlus Nord 2 5G

12GB पर्यंत RAM आणि 256GB पर्यंत इंटरनल स्टोरेज असलेल्या या फोनमध्ये तुम्हाला 4500mAh बॅटरी देण्यात आली आहे. फोन वार्प चार्ज 65 फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानासह येतो आणि याच्या मदतीने फोनची बॅटरी फक्त 30 मिनिटांत 0-100% पर्यंत चार्ज होते. फोनमध्ये तुम्हाला 50 मेगापिक्सलचा ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप, 32 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आणि MediaTek डायमेंशन 1200AI चिपसेट दिलेला आहे.

Reno 5 Pro 5G

Oppo चा हा 5G स्मार्टफोन 4350mAh बॅटरी सोबत येतो. तसेच या फोनमध्ये 65W SuperVOOC 2.0 फ्लॅश चार्ज टेक्नोलॉजी देण्यात आली आहे. ज्यामुळे 30 मिनिटांपेक्षा कमी वेळेत फोन पूर्णपणे चार्ज होतो. Oppo Reno 5 Pro मध्ये तुम्हाला MediaTek Dimensity 1000+ प्रोसेसर मिळेल तसेच 6.5-इंचाचा डिस्प्ले असलेल्या या फोनमध्ये 32-मेगापिक्सलचा फ्रंट आणि 64-मेगापिक्सेलचा मागील प्रायमरी कॅमेरा दिला आहे.

रियलमी GT Neo 2

हा फोन 12 GB पर्यंत रॅम आणि 256 GB पर्यंत इंटरनल स्टोरेजसह येतो. फोनमध्ये कंपनीने 64-मेगापिक्सलचा ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आणि 6.62-इंचाचा डिस्प्ले दिला आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 65W सुपरडार्ट चार्ज तंत्रज्ञानासोबत येते. सुपरडार्ट चार्जिंग टेक्नोलॉजीच्या मदतीने हा फोन 36 मिनिटांत पूर्ण चार्ज होतो.

Poco F3 GT

Poco चा हा फोन 5065mAh च्या बॅटरीसह येतो. फोनमध्ये दिलेली बॅटरी 67 W च्या फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते, ज्यामुळे ती अवघ्या 15 मिनिटांत 50% आणि 42 मिनिटांत 100% चार्ज होते. फोनमध्ये तुम्हाला 64-मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि MediaTek Dimensity 1200 चिपसेट मिळेल.

Xiaomi Mi 11 Ultra

कंपनी या फोनमध्ये 5000mAh बॅटरी देत ​​आहे. ही बॅटरी 67W वायर्ड आणि 67W वायरलेस फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानाला सपोर्ट करते. फोनमध्ये तुम्हाला 6.81 डिस्प्ले मिळेल जो 20:9 च्या आस्पेक्ट रेशोसह येतो. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप मिळेल ज्यामध्ये 50-मेगापिक्सलच्या प्रायमरी कॅमेरा तसेच दोन 48-मेगापिक्सल कॅमेरे आहेत.

iQOO 7 5G

हा फोनमध्ये 4400mAh बॅटरी दिली आहे ज्याला 65W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. फोन 0-100% पर्यंत चार्ज होण्यासाठी फक्त 30 मिनिटे लागतात. फोनमध्ये कंपनी 6.62-इंचाचा डिस्प्ले, 48-मेगापिक्सलचा ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आणि स्नॅपड्रॅगन 870 चिपसेट देत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aheri Assembly Election Results 2024 : बापाने केला लेकीचा पराभव! अहेरी मतदारसंघात धर्मरावबाबा आत्राम यांनी मारली बाजी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मालेगावमतदार संघात शिवसेनेचे उमेदवार दादा भुसे १ लाख ६ हजार ००६ मतांनी विजयी

khadakwasla Assembly Election 2024 Result Live: खडकवासलात भाजपचा विजयाचा चौकार, भीमराव तापकीर यांनी पुन्हा मारली बाजी

Rajan Naik Nalasopara Assembly Election 2024 Result : नालासोपाऱ्याचा गड भाजपचाच; राजन नाईक यांचा दणदणीत विजय

Dapoli Assembly Election 2024 Results : दापोलीत आमदार योगेश कदमांनी राखला गड; ठाकरे गटाच्या संजय कदमांचा केला पराभव

SCROLL FOR NEXT