TV google
विज्ञान-तंत्र

भारतातील टॉप 5 स्वस्त स्मार्ट टीव्ही, जाणून घ्या खास फीचर्स

सकाळ डिजिटल टीम

भारतीय इलेक्ट्रॉनिक बाजारात अनेक स्वस्त स्मार्ट टीव्हीची उबलब्ध आहेक. यात शिओमी, रियलमी आणि इन्फिनिक्स सारख्या मोठ्या ब्रँड टीव्हीचा समावेश आहे. या स्मार्ट टीव्हीचे वैशिष्ट्य म्हणजे वापरकर्त्यांना त्यांच्यात इंटरनेट देखील वापरता येईल. या सर्व टीव्हीला अमेझॉन प्राइम, यूट्यूब आणि डिस्ने प्लस हॉटस्टार सारख्या ओटीटी अ‍ॅप्सचा एक्सेस दिला आहे.

भारतीय इलेक्ट्रॉनिक बाजारात अनेक स्वस्त स्मार्ट टीव्हीची उबलब्ध आहेक. यात शिओमी, रियलमी आणि इन्फिनिक्स सारख्या मोठ्या ब्रँड टीव्हीचा समावेश आहे. या स्मार्ट टीव्हीचे वैशिष्ट्य म्हणजे वापरकर्त्यांना त्यांच्यात इंटरनेट देखील वापरता येईल. या सर्व टीव्हीला अमेझॉन प्राइम, यूट्यूब आणि डिस्ने प्लस हॉटस्टार सारख्या ओटीटी अ‍ॅप्सचा एक्सेस दिला आहे. याशिवाय या टीव्हीमध्ये वापरकर्त्यांना पावरफुल प्रोसेसर, अँड्रॉइड ओएस आणि शक्तिशाली स्पीकरचा सपोर्ट मिळेल. आज आपण बाजारात उपलब्ध असलेल्या काही निवडक स्मार्ट टीव्हीबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याची किंमत 15,000 रुपयांच्या खाली आहे. (know top 5 cheap smart tv in india marathi news)

KODAK 7XPRO स्मार्ट टीवी

किंमतः 13,499 रुपये

KODAK 7XPRO एक स्वस्त स्मार्ट टीव्ही आहे. या स्मार्ट टीव्हीमध्ये 32 इंचाचा डिस्प्ले आहे. या स्मार्ट टीव्हीमध्ये यूट्यूब आणि डिस्ने प्लस हॉटस्टार सपोर्ट मिळेल. याशिवाय टीव्हीमध्ये गुगल असिस्टंट आणि इन-बिल्ट क्रोमकास्ट देण्यात आले आहेत. त्याचबरोबर हा टीव्ही दोन बॉक्स स्पीकर्ससह सुसज्ज आहे.

infinix x1 स्मार्ट टीव्ही

किंमतः 13,499 रुपये

infinix X1 स्मार्ट टीव्हीमध्ये 32 इंचाचा डिस्प्ले आहे. त्याची फ्रेम एक बेझलसह सुसज्ज असून या स्मार्ट टीव्हीमध्ये चांगल्या कामगिरीसाठी MTK 6683 64 Bit क्वाड कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. या टीव्हीमध्ये दोन स्पीकर्स आणि एक सब-वूफर आहेत. हा टीव्ही डॉल्बी साऊंड तंत्रज्ञानास सपोर्ट देतो. तसेच, याला Google असिस्टंट आणि इन-बिल्ट क्रोमकास्टचा सपोर्ट मिळेल.

TOSHIBA स्मार्ट टीव्ही

किंमत: 13,999 रुपये

हा स्मार्ट टीव्ही एक एडीएस पॅनेल वापरतो. यामुळे पिक्चर क्वालिटी सुधारते. तोशिबा स्मार्ट टीव्हीमध्ये शक्तिशाली ऑपरेटिंग सिस्टम, कॉर्टेक्स-ए 5 3 64 बीट प्रोसेसर आणि दोन स्पीकर्स सपोर्ट देण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त, वापरकर्त्यांना 32-इंचाचा टीव्ही, ऑटो-पॉवर ऑफ आणि स्लीप टाइमर सुविधा असलेल घड्याळ मिळेल.

Mi 4A PRO स्मार्ट टीव्ही

किंमत: 14,999 रुपये

Mi 4A PRO शिओमीच्या उत्कृष्ट टीव्हीपैकी एक आहे. या स्मार्ट टीव्हीला 32 इंच डिस्प्लेसह नेटफ्लिक्स, यूट्यूब आणि डिस्ने प्लस हॉटस्टारचा सपोर्ट देण्यात आा आहे. या टीव्हीला गूगल असिस्टंट, Amlogic 64-bit क्वाड कोर प्रोसेसर आणि दोन स्पीकर्स यांचा सपोर्ट मिळेल.

Realme स्मार्ट टीव्ही

किंमत: 14,999 रुपये

Realme स्मार्ट टीव्हीचे डिझाईन बेझलने सुसज्ज आहे. या स्मार्ट टीव्हीमध्ये 32 इंचाचा डिस्प्ले आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यात 3 एचडीएमआय आणि 2 यूएसबी पोर्टसुद्धा आहेत. याशिवाय Realme टीव्हीला MediaTek क्वाड कोर प्रोसेसर आणि उत्कृष्ट आवाजासाठी 4 स्पीकर्स मिळतील.

(know top 5 cheap smart tv in india marathi news)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Crime Against Dalits: गहू चोरल्याच्या आरोपावरून तीन दलित अल्पवयीन मुलांची काढली धिंड; आरोपींना अटक

IND vs AUS : इंडियाला धक्का; रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या दोन सामन्यांना मुकणार, कारण...

Cabinet Meeting: नॉन क्रिमिलेयरची मर्यादा, पत्रकारांसाठी महामंडळ... मंत्रिमंडळ बैठकीत 38 मोठे निर्णय

Manoj Jarange Video: तुम्ही पिता का हो? जरांगेंना थेट प्रश्न, उत्तरही धमाकेदार; जरांगे पाटलांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत

SCROLL FOR NEXT