Bitcoin, Ethereum and Dogecoin Google
विज्ञान-तंत्र

तुम्हाला बिटकॉइन, इथेरियम आणि Dogecoin मधील फरक माहिती आहे?

सकाळ डिजिटल टीम

जगभरात सध्या मोठ्या प्रमाणात क्रिप्टोकरंसीमध्ये (cryptocurrency) गुंतवणूक केली जात आहे, दररोज यांचे दर कित्येक पटीन वाढल्याचे-कमी झाल्याचे आपण वाचतो. दरम्यान टेस्लाचे सीईओ एलोन मस्क आणि ट्विटरचे संस्थापक आणि सीईओ जॅक डॉर्सी यांसारख्या टेक क्षेत्रातील दिग्गज लोकांनी सोशल मीडियामध्ये क्रिप्टोकरंसी बद्दल बोलायला सुरुवात केली आणि जगभरात याचा प्रसार आणि प्रचार झाला. इतकेच नाही तर काही मोठ्या कंपन्यांनी क्रिप्टो करंसीमध्ये पेमेंट स्वीकारण्यास सुरुवात केल्याने लोकांचा या क्रिप्टोकरंसीवर विश्वास देखील वाढला आहे. सुरुवातीला बिटकॉईन ही क्रिप्टोकरन्सी वापरात आणि चर्चेत आली आणि Bitcoin मुळे अनेकांना क्रिप्टोकरंसी बद्दलची माहिती झाली. दरम्यान अलीकडच्या काळात अनेक क्रिप्टोकरंसी पुन्हा एकदा लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.

क्रिप्टोकरंसी काय आहे?

ज्यांना याबद्दल माहिती नाही अशांसाठी, क्रिप्टोकरंसी हे ब्लॉकचेन टेकवर आधारित डिजिटल करंसी आहे, जी कोणत्याही व्यवस्थेशी जोडलेली नाही. ही करंसी वापरुन तुम्ही वस्तू आणि सेवा खरेदी यासोबतच मालमत्तेप्रमाणे यामध्ये गुंतवणूक देखील केली जाऊ शकते. मालमत्ता आणि सोन्यासारख्या इतर मालमत्तेच्या तुलनेत ही गुंतवणुक अधिक अस्थिर मानली जाते, कारण या गुंतवणूकीत तुमच्याकडे काहीच नसते तसेच बऱ्याच देशांमध्ये या करंसीला सरकारचे समर्थन देखील नाही. म्हणजेच एखाद्या देशात मध्यवर्ती बँकेद्वारे जारी केलेल्या नोटा आणि नाणी हे चलन म्हणून वापरले जाते, त्याप्रमाणे क्रिप्टोकरन्सीसाठी अशी कोणतीही व्यवस्था अस्तित्नाक नाही. क्रिप्टोकरन्सी क्रिप्टोग्राफिक पुराव्यावर आधारित आहे जी ब्लॉकचेन प्रोग्रामवर व्हेरिफाय आणि रेकॉर्ड केली जाते. एकदा रेकॉर्ड केल्यानंतर हे व्यवहार हॅक केले जाऊ शकत नाहीत. क्रिप्टोकरंसीचे व्यावहार हे दोन की सेट वापरुन सेक्योर केलेले असतात एक पब्लिक की आणि दुसरी प्रायव्हेट की त्यामुळे हे व्यवहार अत्यंत सुरक्षित पणे केले जातात.

इंटरनेटवरील सर्वात लोकप्रिय क्रिप्टोकरंसी

बिटकॉइन (Bitcoin)

बिटकॉइन ही पहिली क्रिप्टोकरन्सी असून ‘सा तोशी नाकामोटो’ या नावाखाली कोणा व्यक्ती किंवा गटाने बिटकॉईनचे तंत्रज्ञान २००९ मध्ये आणले. या व्हर्च्युअल करन्सीचा वापर करून जगातल्या कोणत्याही व्यक्तीला कुठूनही पेमेंट केले जाऊ शकते. याहूनही महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पेमेंटसाठी कोणत्याही बॅंकेची गरज पडत नाही. बिटकॉईनचा वापर ‘पीअर टू पीअर’ या टेक्‍नॉलॉजीवर आधारित आहे. याचा अर्थ हा की बिटकॉईनच्या मदतीने ट्रान्झॅक्‍शन दोन कॉम्प्युटरच्या माध्यमातून केले जाऊ शकते. या ट्रान्झॅक्‍शनसाठी कोणत्याही बॅंकेची गरज पडत नाही. बिटकॉइन हे बिटकॉइन एक्सचेंजमधून खरेदी केले जाऊ शकतात आणि ते वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये वापरले जाऊ शकताा.

इथेरियम (Ethereum)

इथेरियम ही सध्या इंटरनेटवरील सर्वात लोकप्रिय क्रिप्टोकरन्सी आहे. Ethereum.org म्हणते की, Ethereum हे एक तंत्रज्ञान आहे जे तुम्हाला कुणालाही थोड्या फीमध्ये क्रिप्टोकरन्सी पाठवू देते. तसेच इथेरियम ही क्रिप्टोकरंसी आपल्यापैकी कोणीही व्यक्ती सहज वापरु शकतो 'ETH' एथेरियमची एक क्रिप्टोकरन्सी आहे जी इंटरनेटवर वस्तू आणि सेवा खरेदी करण्यासाठी वापरली जाऊ शकते.

डोगेकोइन (Dogecoin)

Dogecoin ही ETH आणि Bitcoin प्रमाणेच एक क्रिप्टोकरन्सी आहे. हे सॉफ्टवेअर इंजिनिअर्स बिली मार्कस आणि जॅक्सन पामर यांनी 2013 च्या उत्तरार्धात ही क्रिप्टोकरन्सी विनोदाचा भाग (meme) म्हणून तयार केले होते. ही एक ओपन सोर्स डिजीटल चलन आहे. Dogecoin (DOGE) लोकप्रिय "डोजे" इंटरनेट मीम वर आधारीत असून याच्या लोगोवर एक शीबा इनू या जातीच्या कुत्र्याचा फोटो आहे. डॉजकॉईनच्या निर्मात्यांनी गंमत म्हणून ही क्रिप्टो सुरू केली होती.

एलोन मस्कने Dogecoin बद्दल एक ट्विट केल्यानंतर या क्रीप्टोकरंसीची किंमत कित्येक पटीने वाढली होती. फोर्ब्सच्या अहवालानुसार, बिटकॉइनच्या तुलनेत Dogecoin माइन करणे सोपे आहे, कारण माइन करणाऱ्यांसाठी मॅथेमॅटीकल इक्वेशन पूर्ण करणे आणि रेकॉर्ड करणे सोपे आहे. याव्यतिरिक्त, डोगेकोइनच्या निर्मितीवर कोणतीही मर्यादा नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT