Data Hacking esakal
विज्ञान-तंत्र

Data Hacking: तुमचा पर्सनल डेटा बोट मार्केटमध्ये अवघ्या 490 रुपयांत विकला जातोय? सावध व्हा नाहीतर...

रिपोर्टमध्ये भारतीय यूजर्सचा डेटा मोठ्या प्रमाणावर चोरी होत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे

साक्षी राऊत

Mobile Data Hacking: टेक्नॉलॉजीमध्ये प्रगती झाल्याने बऱ्याच गोष्टी जेथे आज साध्य होताय तेथे डेटा चोरी जाण्याचे प्रमाणही याच टेक्नॉलॉजीच्या मदतीने मोठ्या प्रमाणात होताना दिसतेय. दररोज लाखो लोकांचा डेटा चोरी गेल्याच्या तक्रारी असतात. यातच आता आणखी एक धक्कादायक रिपोर्ट पुढे आली आहे. रिपोर्टमध्ये भारतीय यूजर्सचा डेटा मोठ्या प्रमाणावर चोरी होत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

बोट मार्केटमध्ये उपलब्ध असलेला १२ टक्के डेटा हा भारतीयांचा असल्याची माहिती पुढे आली आहे. तसेच हा डेटा फक्त 490 रुपयांत विकला जातोय. याबाबत सायबर सेक्यूरीटी कंपनी NordVPN ने माहिती दिली आहे. माहितीसाठी बोट मार्केट हे ऑनलाइन मार्केटप्लेस आहे. येथे हॅकर्स विक्टिमच्या डिवासमधला डेटा चोरतात. हा डेटा मेलवेअरच्या मदतीने चोरला जातो. हा डेटा पॅकेट्समध्ये विकला जातो. यामध्ये डिजीटल फिंगरप्रिंट. स्क्रीनशॉट, कुकीज आणि बऱ्याच गोष्टींची माहिती असते.

या धोक्याने आतापर्यंत 50 लाख लोकाना प्रभावित केलं आहे. यात भारतातल्या ६ लाख यूजर्सचा समावेश आहे. हॅकर्स तुमचे वेबकॅम, स्नॅप, स्क्रिनशॉट, अप-टू-डेट लॉगिन्स, कुकीज ही सगळी इन्फॉर्मेशनही विकतात.

प्रति डेटाची किंमत आहे ४९० रुपये

रिसर्चरच्या मते, 50 लाख लोकांची ऑनलाइन आयडेंटीटी चोरून बोट मार्केटमध्ये विकली जातेय. याची किंमत प्रति डेटा सुमारे ४९० रुपये आहे. सेक्यूरीटी कंपनीने कमीत कमी २६.६ मिलीयन चोरी केलेले लॉगिन्स मिळालेत. यात सात लाख वीस हजार गूगल लॉगिन्स तर सहा लाख चोपन हजार मायक्रोसॉफ्ट लॉगिन्स आणि सहा साल सत्तेचाळीस हजारक फेसबुक लॉगिन्स होते.

वेगाने वाढतेय डिजिटल बोट्स

डिजीटल बोट्स यावेळी वेगाने वाढताना दिसतेय. याला कस्टम सर्विस, सर्च इंजिन ऑप्टिमायजेशन आणि एंटरटेनमेंट फिल्डमध्ये ऑपरेट केल्या जाते. RedLine, Vidar, Racoon, Taurus आणि AZORult हे काही पॉपूलर मेलवेअर आहे जो तुमचा डेटा चोरी करून कलेक्ट करतो. अशाच प्रकारचं एक मार्केट 2018 मध्ये लॉंच झालं होतं. पहिल्या मार्केटच्या तुलनेत या मार्केटला फार लहान मानलं जातं. यात २६९ देशांमधील तब्बल सहा लाख यूजर्सचा डेटा विकल्या गेला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhule Vidhan Sabha Election 2024 : धुळे जिल्ह्यात बंडखोरांकडून आव्हान उभे; पाचही मतदारसंघांत मतविभाजनाचे डावपेच

Meesho: आता टी-शर्टवर लॉरेन्स बिश्नोईचा फोटो... मीशोवर नेटकऱ्यांचा संताप! कंपनीनं काय दिलं स्पष्टीकरण?

Kartiki Yatra : भाविकांसाठी महत्त्वाची बातमी! पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणीमातेचे 24 तास दर्शन सुरू राहणार

अखेर भुलभुलैय्या 3 ने सिंघम अगेनला टाकलं मागे; बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये कार्तिकच ठरला अजयपेक्षा सरस

Nashik Vidhan Sabha Election : बंडखोरांच्या तलवारी म्यान; बहुतांश बहुरंगी लढती

SCROLL FOR NEXT