Laptop Overheat esakal
विज्ञान-तंत्र

Laptop Overheat: काम करताना लॅपटॉप जास्त गरम होतो? मग, 'या' सोप्या गोष्टींच्या मदतीने ठेवा कूल

Tips to deal with Overheating: उन्हाळ्यात इलेक्ट्रॉनिक उपकरणे गरम होण्याची शक्यता असते.

Monika Lonkar –Kumbhar

Laptop Overheat : आजकाल लॅपटॉपचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. स्मार्टफोनच्या सोबतीला लॅपटॉपमध्ये देखील विविध प्रकारचे फिचर्स आणि प्रकार येत आहेत. परंतु, लॅपटॉपवर काम करताना काहीवेळा लॅपटॉप गरम होतो. त्यामुळे, अनेकांना याची काळजी वाटते. परंतु, जर तुमचा लॅपटॉप वारंवार गरम होत असेल तर घाबरण्याची गरज नाही. त्यासाठी तुम्ही काही सोप्या ट्रिक्सचा वापर करू शकता.

उन्हाळ्यात इलेक्ट्रॉनिक उपकरणे गरम होण्याची शक्यता असते. त्यामुळे, तुमचा लॅपटॉप जर गरम झाला तर लगेच घाबरू नका. परंतु, वारंवार जर तुमचा लॅपटॉप गरम होत असेल तर त्यासाठीच्या काही सोप्या ट्रिक्स आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

ओरिजिनल चार्जरचा वापर करा

तुमचा लॅपटॉप चार्ज करण्यासाठी शक्यतो ओरिजिनल चार्जरचा वापर करा. अनेकांना दुसऱ्याच कंपनीचा चार्जर वापरण्याची सवय असते. त्यामुळे, ही तुमचा लॅपटॉप गरम होऊ शकतो. त्यामुळे, मूळ कंपनीच्या चार्जरचा वापर करा.

यासोबतच, चार्जिंग करताना लॅपटॉपचा वापर कमीत कमी करण्याचा प्रयत्न करा. जर चार्जिंग करताना तुमचा लॅपटॉप वेगाने गरम होत असेल तर, ताबडतोब चार्जिंग बंद करा. शक्य असल्यास, बॅटरी डिस्कनेक्ट करा.

लॅपटॉप कूलिंग पॅडचा करा वापर

तुमचा लॅपटॉप वारंवार गरम होत असेल तर तुमच्या लॅपटॉपसाठी कूलिंग पॅडचा वापर करा. ही एक प्रकारची बाह्य अ‍ॅक्सेसरीज आहे, जी लॅपटॉप थंड ठेवण्यासाठी वापरली जाते.

जर तुमच्याकडे हे कूलिंग पॅड नसेल तर त्याची खरेदी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या सिस्टिममध्ये एअर इनटेक पोर्टची कोणती बाजू आहे? हे पाहावे लागेल. त्यानंतरच, तुमच्या लॅपटॉपसाठी कूलिंग पॅडची खरेदी करा आणि त्याचा वापर करा. यामुळे, तुमचा लॅपटॉप कूल राहण्यास मदत होईल.

सपाट आणि घनपृष्ठभागावर लॅपटॉप ठेवा

लॅपटॉपवर काम करताना तो एका सपाट आणि घनपृष्ठभागावर ठेवा. यामुळे, हवेच्या चांगल्या संपर्कामुळे लॅपटॉप गरम होण्याचे प्रमाण कमी होऊ शकेल. अनेकदा आपण ब्लॅंकेट, उशी आणि पलगांवर लोळत लॅपटॉपवर काम करतो. यामुळे, लॅपटॉपचा इनटेक बंद होऊन जातो आणि लॅपटॉप गरम होण्यास सुरूवात होते. त्यामुळे, तापमान वाढू लागते. हे सर्व टाळण्यासाठी सपाट आणि घनपृष्ठभागावर लॅपटॉप ठेवून काम करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : राहुल गांधी यांनी दोन डिसेंबरला न्यायालयात हजर राहावे; पुणे प्रथमवर्ग न्यायालयाचा आदेश

Pune News : मविआच्या काळात महाराष्ट्राच्या विकासाचा वेग मंदावला; केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत

IPL Auction साठी पर्थ कसोटीवेळीच 'हा' कोच संघाला सोडणार अन् ऑस्ट्रेलियातून सौदी अरेबियात पोहचणार

Paranda Assembly Election : महाराष्ट्राच्या विधानसभेमधून निधी आणण्यासाठी धमक लागते - प्रा. डॉ. तानाजी सावंत

Parli Assembly constituency 2024 : परळी विधानसभेच्या इतिहासात पहिल्यांदाच: ना सभा,ना रँली गाठीभेटीने संपला परळी विधानसभेचा प्रचार

SCROLL FOR NEXT