Affordable 5g phone 
विज्ञान-तंत्र

Affordable 5g Phone: 5G स्मार्टफोन घेताय? स्वदेशी कंपनीचा 'हा' सर्वात स्वस्त फोन आहे बेस्ट ऑप्शन

सकाळ डिजिटल टीम

स्वस्तात मस्त 5G फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर थोडं थांबा कारण देसी कंपनी Lava ने आपल्या स्मार्टफोनची रेंज वाढवत Lava Blaze 5G हा नवीन हँडसेट सादर केला आहे. कंपनीने हा फोन इंडियन मोबाईल काँग्रेस 2022 मध्ये सादर केला असून फोनच्या किंमतीबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, हा देशातील सर्वात स्वस्त 5G हँडसेट असेल असे सांगण्यात येत आहे.

कंपनीने सांगितले की त्याची किंमत सुमारे 10 हजार रुपये असेल. तसेच हा फोन दिवाळीच्या आसपास प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध करून दिला जाईल. या फोनमध्ये कंपनी आठ 5G बँडसाठी सपोर्ट देत आहे. यात 4 जीबी (रिअल) + 3 जीबी (व्हर्च्युअल) रॅमचा सपोर्ट आहे. यात विशेष काय आहे ते सविस्तर जाणून घेऊया.

Lava Blaze 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

लावाच्या या फोनमध्ये तुम्हाला 720x1600 पिक्सेल रिझोल्युशनसह 6.5-इंचाचा फुल एचडी + एलसीडी पॅनेल मिळेल. वॉटरड्रॉप नॉच डिझाइनसह येणाऱ्या या डिस्प्लेचा रिफ्रेश दर 90Hz आहे. फोन 4 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेज पर्यायात येतो. विशेष बाब म्हणजे कंपनी या फोनमध्ये 3 जीबी व्हर्चुअल रॅम सपोर्ट देखील देत आहे, ज्यामुळे त्याची एकूण रॅम 7 जीबी झाली आहे. प्रोसेसर म्हणून तुम्हाला त्यात MediaTek Dimensity 700 चिपसेट मिळेल.

फोनच्या मागील बाजूस एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरे देण्यात आले आहेत. यामध्ये डेप्थ सेन्सर आणि 50 मेगापिक्सेलच्या प्रायमरी लेन्ससह मॅक्रो सेन्सरचा समावेश आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. मायक्रो एसडी कार्डला सपोर्ट करणाऱ्या या फोनमध्ये दिलेली बॅटरी 5000mAh आहे.

OS बद्दल बोलायचे झाले तर, हा 5G फोन आउट ऑफ द बॉक्स Android 12 वर काम करतो. ब्लू आणि ग्रीन कलरमध्ये येणाऱ्या या फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी कंपनी ड्युअल सिम, वाय-फाय 6, ब्लूटूथ 5.1, जीपीएस, यूएसबी टाइप-सी पोर्ट आणि 3.5 मिमी हेडफोन जॅक सारखे पर्याय देण्यात आले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT