Lava New Smartphone Launched: लावाने आपला नवीन स्मार्टफोन Blaze NXT ला भारतात लाँच केले आहे. हा फोन लावा ब्लेजचे (४जी) अपडेटेड व्हर्जन आहे. नवीन स्मार्टफोनमध्ये कंपनीने ७ जीबीपर्यंत रॅम, पॉवरफुल प्रोसेसर आणि ग्लास बॅक सारखे अनेक शानदार फीचर दिले आहेत. या फोनची किंमत फक्त ९,२९९ रुपये आहे. फोनच्या सेलबाबत कंपनीने अद्याप सविस्तर माहिती दिलेली नाही.
हेही वाचा: मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....
Lava Blaze NXT मध्ये मिळतील दमदार फीचर्स
Lava Blaze NXT मध्ये एचडी रिझॉल्यूशन ६.५ इंच आयपीएस डिस्प्ले दिला आहे. हा डिस्प्ले वॉटरड्रॉप नॉच डिझाइनसह येतो. यामध्ये ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. विशेष म्हणजे कंपनीने फोनमध्ये ३ जीबी व्हर्च्यूअल रॅम सपोर्ट देखील दिला आहे. गरज पडल्यास तुम्ही फोनची रॅम वाढवू शकता. त्यामुळे फोनची रॅम ७ जीबीपर्यंत वाढेल.
लावाच्या या फोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी३७ चिपसेट मिळेल. फोटोग्राफीसाठी एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरे दिले आहेत. यातील मुख्य कॅमेरा १३ मेगापिक्सल आहे, तर इतर दोन कॅमेऱ्यांची माहिती कंपनीने अद्याप दिलेली नाही. यातील एक २ मेगापिक्सल डेप्थ सेंसर आणि एक VGA कॅमेरा असू शकतो.
सेल्फीसाठी फ्रंटला ८ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळेल. यात रियर माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर दिला आहे. तर पॉवर बॅकअपसाठी ५००० एमएएचची दमदार बॅटरी मिळते. बॅटरी चार्जिंगसाठी यूएसबी-सी पोर्ट मिळेल. कंपनीचा दावा आहे की, सिंगल चार्जमध्ये फोनची बॅटरी एक दिवस सहज टिकते. फोन अँड्राइड १२ ओएसवर काम करतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.