LG Smart TV
LG Smart TV esakal
विज्ञान-तंत्र

LG Smart TV : एल जी स्मार्ट टिव्हीमध्ये मोठा बिघाड, परत मागवले 56,000 टीव्ही,जाणून घ्या कारण...

सकाळ डिजिटल टीम

LG Smart TV : इलेक्ट्रॉनिक्स सेक्टरमधील दिग्गज कंपनी असलेल्या एलजीच्या स्मार्ट टीव्हीमध्ये मोठ्या त्रुटी समोर आल्या आहेत. रिपोर्ट्सनुसार, कंपनीने 56,700 टीव्ही परत मागविण्याची घोषणा केली आहे. LG च्या 86-इंचाच्या स्मार्ट टीव्हीच्या स्टँडमध्ये युझर्सना अडचणी येत आहेत.

स्मार्ट टीव्हीच्या स्टँडमुळे हे टीव्ही व्यवस्थित बसवता येत नाहीत. त्यांचा ऑप्शनल स्टँड वापरताना टिप ओव्हरची समस्या येत आहे. त्यामुळे युझर्सच्या जीवालाही धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आता कंपनीने हे टीव्ही परत मागवले आहेत.

अमेरिकेच्या कंझ्युमर प्रॉडक्ट सेफ्टी कमिशननुसार, LG च्या टेलिव्हिजनचा ऑप्शनल स्टँड वापरताना टिप ओव्हरची अडचण येते आहे. त्यामुळे टीव्ही भिंतीवर लावताना अडचणी येतात. यासंबंधीच्या एकूण २२ तक्रारी कंपनीला मिळाल्या. यातील १२ तक्रारींमध्ये टिप-ओव्हरची समस्या नमूद करण्यात आली होती. पण या तक्रारींमध्ये कोणत्याही युजरला इजा झाली नसल्याचं म्हंटलय.

कुठले टीव्ही परत मागवले जाणार आहेत?

बिझनेस स्टँडर्डने दिलेल्या बातमीनुसार, मार्च 2022 ते सप्टेंबर 2022 दरम्यान जे टिव्ही विकण्यात आलेत ते परत मागवले जातील. यात अमेरिका आणि इतर बाजारपेठांमध्ये विकण्यात आलेले टिव्ही असतील. या सर्व टिव्हीची किंमत 89,000 रुपयांपासून ते 1.54 लाख रुपयांपर्यंत आहे.

कंपनी एकूण 52,000 स्मार्ट टीव्ही परत मागवत आहे. याशिवाय कॅनडामध्ये विकण्यात आलेले 1,800 टीव्ही आणि मेक्सिकोमध्ये विकले गेलेले 2,900 टीव्हीही परत मागवण्यात आले आहेत. कंपनीकडून रिकॉल करण्यात येत असलेल्या 86-इंचाच्या स्मार्ट टीव्हीमध्ये चार मॉडेल्स आहेत.

कंपनीशी संपर्क साधा

ग्राहकांनी एलजीशी संपर्क साधावा असं आवाहन कंपनीने केलंय, जेणेकरुन टिव्हीची टेस्ट कशी करायची याबाबतची माहिती कंपनी देऊ शकेल. याशिवाय स्टँडच्या कोणत्याही पार्टच्या दुरुस्तीसाठी टेक्निशियन कडून मोफत दुरुस्तीची सुविधा दिली जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahini Yojana: 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण'साठी अर्ज करण्यास 'या' 15 दिवसांचीच मुदत! ही' कागदपत्रे जरुरी; कसा अन् कुठे करायचा अर्ज?

Sharad Pawar: विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठीचा काय आहे महाविकास आघाडीचा प्लॅन? पवारांनी थेटच सांगितलं

Kalki 2898 Box Office: नुसता धुरळा! तिसऱ्या दिवशी प्रभासच्या 'कल्की'ची पहिल्या दिवसापेक्षाही जास्त कमाई, वाचा एकूण कलेक्शन

गोफण | लाडका भाऊ योजनेची अधिसूचना

T. Dilip Fielding Coach : करोडो रूपयात खेळणाऱ्या खेळाडूंना साधं 'मेडल' देत काम काढून घेणारा गणिताचा क्लास टिचर टी दिलीप!

SCROLL FOR NEXT