Light Pollution esakal
विज्ञान-तंत्र

Light Pollution : एवढंच बाकी होतं, आता प्रकाशाचही वाढू लागलंय प्रदुषण..?

सकाळ डिजिटल टीम

Light Pollution : बुचकळ्यात पडला ना लेखाचे शीर्षक वाचून? आपल्या वाढत्या विजेच्या वापराने असे म्हणायची वेळ आली आहे. शहरात तर नक्कीच. रात्री आपण एखाद्या उंच ठिकाणी जाऊन शहराकडे खाली बघितले तर आपल्याला प्रकाशाचा इतका चकचकाट दिसतो की आकाशातले तारेसुद्धा दिसत नाहीत.

‘प्रकाशाचे प्रदूषण’ याविषयी बाकी प्रदूषणाइतकी चर्चा होत नाही किंवा त्याकडे लक्ष दिले जात नाही. मात्र, आता जगभर शास्त्रज्ञांनी या विषयाकडे लक्ष वेधले आहे, कारण त्याचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम जाणवायला लागले आहेत. प्रकाश प्रदूषण म्हणजे कृत्रिम प्रकाशाचे अतिक्रमण.

विद्युत उपकरणांद्वारे सोडल्या जाणाऱ्या प्रकाशाची तीव्रता आणि व्याप्ती, जेव्हा पर्यावरण व सजीवांच्या (प्राणी, पक्षी, वनस्पती) आरोग्याला घातक होते, तेव्हा त्याला प्रकाश प्रदूषण म्हटले जाते. जगातील ८३ टक्के लोक प्रकाशाच्या प्रदूषणात राहतात असा एक अंदाज आहे. ‘आकाशाचा चकचकाट’ (Sky Glow) हा २०१७मध्ये पृथ्वीच्या ४९ टक्के भूभागावर पसरल्याची नोंद झाली आहे.

प्रकाशाच्या प्रदूषणाचे मुख्य स्रोत

  • रात्रीचे चकचकीत व पांढराशुभ्र प्रकाश असलेले आणि बारा तासांपेक्षा जास्त लागलेले रस्त्यावरचे दिवे.

  • शहरातल्या व काही खेड्यातल्याही उत्पादनांच्या व दुकानांच्या जाहिराती करणार मोठे मोठे फलक.

  • उंच इमारतींना, विशेषतः हॉटेल्स यांना केलेली प्रकाशाची रोषणाई.

  • नदी, तलाव, आणि समुद्राकाठी असलेल्या हॉटेल व इतर व्यावसायिकांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी केलेली विजेची रोषणाई.

  • रात्रभराची वाहतूक व वाहनांचे प्रखर प्रकाशाचे दिवे.

प्रकाशाचे प्रदूषण हे रात्रीच सर्वाधिक असते. अनिर्बंध वाढणारे शहरीकरण व चंगळवाद ही त्याची मुख्य कारणे आहेत. विकसितच्या तुलनेत विकसनशील राष्ट्रांमध्ये प्रकाशाचे प्रदूषण कमी आहे. ऐंशी टक्के अमेरिकी व साठ टक्के युरोपीय लोक आकाशगंगा बघू शकत नाहीत. चीन व भारतातील मोठ्या शहरांचे प्रकाशाचे प्रदूषण वाढले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT