linkedIn Verification Esakal
विज्ञान-तंत्र

LinkedIn वरुन होणाऱ्या स्कॅम्सना बसणार आळा! भारतीयांसाठी लाँच केलं ID व्हेरिफिकेशन फीचर

यूजर्स आपलं आधार कार्ड आणि मोबाईल नंबरच्या मदतीने प्रोफाईल 'व्हेरिफाय' करू शकतील.

Sudesh

काही दिवसांपूर्वी लिंक्डइनवरून मोठ्या प्रमाणात स्कॅम होत असल्याची माहिती एका रिपोर्टमध्ये देण्यात आली होती. यानंतर आता अशा घटना टाळण्यासाठी कंपनीने पाऊल उचललं आहे. लिंक्डइनवर आता आयडेंटिटी व्हेरिफिकेशन फीचर देण्यात आलंय.

लिंक्डइन यूजर्स आपलं आधार कार्ड आणि मोबाईल नंबर यांचा वापर करून आपली प्रोफाईल 'व्हेरिफाय' करू शकतील. यानंतर यूजर्सच्या प्रोफाईलवर व्हेरिफाईड स्टेटस दिसेल. यामुळे तुमचं प्रोफाईल खरं आहे, याबाबत इतरांना खात्री पटणार आहे. विशेष म्हणजे, ही प्रोसेस अगदी फ्री-ऑफ कॉस्ट असणार आहे.

हायपव्हर्ज या थर्ड-पार्टी आयडेंटिटी व्हेरिफिकेशन सुविधा देणाऱ्या कंपनीच्या मदतीने लिंक्डइन ही प्रक्रिया करणार आहे. ही कंपनी व्हेरिफिकेशनसाठी डिजिलॉकरची मदत घेईल. केंद्र सरकारने नागरिकांना आपले डिजिटल आयडी एकाच ठिकाणी ठेवता यावेत यासाठी डिजिलॉकर सुविधा सुरू केली होती.

असं करा व्हेरिफाय

आपलं अकाउंट व्हेरिफाय करण्यासाठी लिंक्डइनने काही सोप्या स्टेप्स सांगितल्या आहेत. VERIFY या शब्दाच्या माध्यमातूनच हे टप्पे उलगडण्यात आले आहेत. व्हिजिट, एंटर, रिसीव्ह, इन्स्टंट, फेस आणि येस असे हे टप्पे आहेत.

यासाठी तुम्हाला लिंक्डइन मधील तुमच्या प्रोफाईलला जाऊन 'व्हेरिफाय विथ आधार' हा पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार एंटर करावा लागेल. यानंतर या टप्प्यामध्ये तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल. हा ओटीपी एंटर केल्यानंतर हायपरव्हर्ज तुमच्या डिजिलॉकरमधील माहिती व्हेरिफाय करून घेईल. तुमच्याकडे डिजिलॉकर अकाउंट नसेल, तर ते तातडीने तयार केलं जाईल.

यानंतर तुम्हाला एक सेल्फी घेऊन तुमचा आणि तुमच्या आधार कार्डवरील फोटो मॅच होईल याची खात्री करायची आहे. त्यानंतर 'येस, शेअर विथ लिंक्डइन' या पर्यायावर क्लिक करून, व्हेरिफिकेशन तुमच्या लिंक्डइन प्रोफाईलला अ‍ॅड करायचं आहे.

प्रक्रिया आहे सुरक्षित

जर तुमचं व्हेरिफिकेशन अनसक्सेसफुल झालं, तर तुम्ही परत पहिल्या टप्प्यापासून प्रक्रिया सुरू करू शकता. डिजिलॉकरमधील तुमच्या डॉक्युमेंट्सचा अ‍ॅक्सेस लिंक्डइनला नसल्याची खात्री कंपनीने दिली आहे. ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही त्यांच्यासाठी व्हेरिफिकेशनचे इतर पर्यायही देण्यात आले आहेत. तसंच, आपले वर्क ई-मेल क्रेडेंशिअल्स वापरुनही यूजर्स व्हेरिफिकेशन करू शकणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: विधानसभा निवडणुका जिंकण्याचा एकनाथ शिंदेंचा हा आहे 'मास्टर प्लॅन'; ठाण्यात नाही तर 'या' ठिकाणी ठोकणार तळ

SA vs IND: मी फार विचार केला, तर इमोशनल होईन; १० वर्ष मी वाट पाहिली! Sanju Samson ने मैदानासोबत मनंही जिंकली

Pune Crime: पुण्यातील 'त्या' 5 मुलींनी घेतला मोकळा श्वास, पोलिसांची मोठी कारवाई

शेतकऱ्यांची होणार संपूर्ण कर्जमाफी! राज्यातील साडेपंधरा लाख शेतकरी थकबाकीत; कर्जमाफीसाठी लागणार 30,495 कोटी; जाणून घ्या, जिल्हानिहाय थकबाकीदार शेतकरी

Raju Patil: ...यांच्या नियत मध्ये खोटं आहे, त्याप्रमाणे घडलं; खासदार डॉ. शिंदेंनी मैत्री न निभावल्याने मनसे आमदार पाटील दुखावले

SCROLL FOR NEXT