New Job Opportunities in Germany for 10,000 Technically Trained Maharashtra Youth esakal
विज्ञान-तंत्र

Jobs in Germany : तांत्रिक शिक्षण घेतलेल्या महाराष्ट्रातील 10 हजार युवकांना मिळणार जर्मनीत रोजगार; लगेच अर्ज करा, वाचा सोपी प्रोसेस

Technical Jobs in Germany Memorandum of Understanding Between Goverment of Maharashtra and Germany : ३० विविध तांत्रिक कोर्स पूर्ण केलेल्या महाराष्ट्रातील १० हजार युवकांना जर्मनीमध्ये रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Technical Education Jobs : उच्च माध्यमिक शिक्षणाचे व्यावसायीकरण या योजनेचा विस्तार करून जर्मनीतील बाडेन-युटेनबर्ग या राज्यास महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांतील कुशल मनुष्यबळ पुरविण्याबाबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. यामध्ये ३० विविध तांत्रिक कोर्स पूर्ण केलेल्या १० हजार युवकांना जर्मनीमध्ये रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे. या प्रकल्पाचे समन्वयक म्हणून शिक्षण विभागाच्या डायट संस्थेवर जबाबदारी देण्यात आली आहे.

युरोपिय युनियनमधील बहुतांश देश औद्योगिकदृष्ट्या संपन्न आहेत. मात्र, काही वर्षांपासून या देशांना कुशल मनुष्यबळाची कमतरता भासत आहे. त्या तुलनेत महाराष्ट्रामध्ये कुशल कामगार मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. महाराष्ट्रातील कुशल मनुष्यबळाचा पुरवठा युरोपियन युनियनमधील देशांना करता यावा, त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी महाराष्‍ट्रासोबत जर्मनीतील बाडेन-बुटेनबर्ग राज्यासोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. त्यासाठी शालेय शिक्षण विभागाच्या अध्यक्षतेखाली कृती दलाचे गठण करण्यात आले आहे.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांना जर्मनीला जाण्यापूर्वी चार महिने जर्मन भाषेचे प्रशिक्षण व संबंधित कौशल्यामध्ये वाढ होण्यासाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे.

इच्छुक उमेदवारांनी https://script.google.com/macros/s/AKfycbyYGvDJEhhNjpNFlAaaCT8rLSar3M4pEPiHrQuV37uzJZgTEXHhhf6JVMYQcLw1OHLZ/exec या लिंकवर नोंदणी करावी, असे आवाहन डायटच्या प्राचार्य आर.एस. देशमुख यांनी केले आहे. या प्रकल्पासाठी राज्य शासनाकडून ७६ कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.

३० प्रकल्पांतील मनुष्यबळ आवश्यक

नर्सिंग, लॅब असिस्टंट, रेडिओलॉजी असिस्टंट, डेंटल, केअर टेकर, फिजिओथेरपिस्ट, डॉक्युमेंटेशन ॲण्ड कोडिंग, लेखा आणि प्रशासन, इलेट्रिशियन, अक्षय ऊर्जेसाठी वीजतंत्री, औष्णिक वीजतंत्री, पेंटर, सुतार, गवंडी, प्लंबर, मशिनिस्ट, वाहनचालक, सुरक्षारक्षक, टपाल सेवा, सामान बांधणी व वाहतूक, पॅकर्स ॲण्ड मूव्हर्स, वेटर्स, रिसेप्शनिस्ट, कूक, हॉटेल व्यवस्थापक, लेखापाल, सफाई कामगार या प्रकल्पांतील मनुष्यबळ आवश्यक आहे.

शासन देणार पासपोर्ट अन् व्हिसा

ज्या कुशल युवकांची जर्मनीत जाण्यासाठी निवड होणार आहे, त्या युवकांना महाराष्ट्र शासनाकडून पासपोर्ट आणि व्हिसा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जर्मनीमध्ये संबंधित विद्यार्थ्याला कुठे रोजगाराची संधी उपलब्ध आहे, तेथील कंपनी, संस्थेशी टायअप करून दिले जाईल. यासाठी देशाचे राजकीय दूतावास सहकार्य करणार आहे.

जर्मनीमध्ये जाण्यासाठी निवड झालेल्या १० हजार युवकांना जीओईटीएचई संस्थेमार्फत जर्मन भाषेचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यानंतर चार स्तरावर घेण्यात आलेल्या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या युवकांना जर्मनीत रोजगाराची संधी दिली जाणार आहे. जर्मन भाषा शिकण्यासाठी २५ विद्यार्थ्यांसाठी एक प्रशिक्षण वर्ग याप्रमाणे १० हजार विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी ४०० प्रशिक्षण वर्गांची आवश्यकता आहे. त्यासाठी शासनाकडून खर्चाची तरदूत करण्यात आली आहे.

- आर. एस. देशमुख, प्राचार्य, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Mega Auction 2025 : रांचीचा 'गेल'! CSK हवा होता संघात, पण Mumbai Indians ने दिली मात; जाणून घ्या कोण हा Robin Minz

Shiv Sena Leader: मोठी बातमी! शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड; मुख्यमंत्री कोण होणार?

IPL 2025 Auction Live: जोफ्रा आर्चर पुन्हा राजस्थान संघात, तर Mumbai Indiansने सर्वात पहिल्यांदा खरेदी केला 'हा' खेळाडू

NCP Ajit Pawar Party : ‘राष्ट्रवादी’च्या पक्षनेतेपदी अजित पवार; नवनिर्वाचितांच्या बैठकीत निर्णय

Maharashtra Assembly : विधानसभेत यंदा ७० नव्या चेहऱ्यांची प्रथमच ‘एन्ट्री’; दिग्गजांना धूळ चारत ठरले ‘जायंट किलर’

SCROLL FOR NEXT