Mahindra Thar Roxx vs Thar esakal
विज्ञान-तंत्र

Mahindra Thar Roxx : महिंद्राच्या गेमचेंजर SUVची मार्केटमध्ये एंट्री; 5 दरवाज्यांची थार रॉक्स Vs रेग्युलर थार,कोणती आहे बेस्ट?

Mahindra Thar Roxx 5 Door SUV Launch : महिंद्रा कंपनीच्या लोकप्रिय थारची 5 दरवाजांची आवृत्ती ‘थार रॉक्स’ लाँच झाली आहे. या नव्या एसयूव्हीमुळे महिंद्राच्या एसयूव्ही पोर्टफोलिओला आणखी दमदार बनवण्यात मदत होणार आहे.

Saisimran Ghashi

Mahindra Thar SUV : भारतातील SUV बाजारात धडाकेबाज एंट्री करत महिंद्रा थार आता एका नवीन अवतारात आपल्यासमोर आहे. महिंद्राने नुकतीच आपली नवी SUV थार Roxx लाँच केली आहे. 14 ऑगस्ट रोजी लाँच झालेल्या या नव्या ‘थार रॉक्स’ (Thar Roxx) ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 12.99 लाख रुपये (पेट्रोल) आणि 13.99 लाख रुपये (डिझेल) आहे.

थार Roxx आणि रेग्युलर थारमध्ये काय फरक आहे?

नव्या थार Roxx मध्ये जुनी थारचे सर्व चांगले फीचर्स कायम ठेवून काही मोठे बदल करण्यात आले आहेत. यात दोन अतिरिक्त दरवाजे आणि दुसऱ्या रांगेत बेंच सीटचा लेआउट आहे, ज्यामुळे गाडीत प्रवेश करणे सोपे होईल आणि अधिक प्रवाशांना आरामात बसता येईल.म्हणजे या गाडीला एकूण 5 दरवाजे आहेत. याशिवाय, या नव्या मॉडेलमध्ये लांब व्हीलबेससह अधिक स्थिरता आणि आराम मिळेल, जे महिंद्राच्या Scorpio N प्रमाणे आहे.

थार Roxx मध्ये नवीन डबल-स्टॅक 6-स्लॉट ग्रिल असून, हेडलॅम्प्स गोल आकाराचे LED प्रोजेक्टर लाइट्स आणि नवीन C-आकाराचे DRLs देखील दिले आहेत.

नव्या थार Roxx मध्ये 10.25-इंचाचा टचस्क्रीन, 360-डिग्री कॅमेरा, पुश-बटन स्टार्ट, लेदर सीट्स, मागील AC व्हेंट्स, 6 एअरबॅग्स आणि पॅनोरॅमिक सनरूफ यासारखी प्रीमियम फीचर्स उपलब्ध आहेत.

थार Roxx मध्ये लेव्हल 2 ADAS सुरक्षा प्रणालीसह 10.25-इंचाचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर दिला आहे, जो या गाडीला आणखी प्रीमियम बनवतो. ब्रेकिंग सिस्टममध्ये देखील सुधारणा करण्यात आली आहे, ज्यामध्ये आता मागील बाजूस डिस्क ब्रेक्स दिले आहेत.

नव्या महिंद्रा थार Roxx मध्ये अधिक आरामदायी, जास्त जागा आणि सर्व ॲडव्हान्स फीचर्स देण्यात आले आहेत, ज्यामुळे ऑफ-रोडिंगसह शहरातही आरामदायी प्रवास करू इच्छिणाऱ्यांसाठी ही SUV उत्तम पर्याय ठरू शकते.

थार Roxxची मुख्य वैशिष्ट्ये

  • दोन अतिरिक्त दरवाजे आणि बेंच सीट

  • लांब व्हीलबेस

  • नवीन डिजाइन

  • प्रीमियम फीचर्स

  • लेव्हल 2 ADAS सुरक्षा प्रणाली

  • अधिक आरामदायी

  • अधिक जागा

महिंद्रा थार Roxx ही एडव्हेंचर प्रेमींसाठी एक उत्तम निवड आहे.या गाडीमध्ये नवीन फीचर्सची उत्तम झलक पाहायला मिळते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Govt of India: भारत सरकारने विकिपीडियाला बजावली नोटीस, केला 'हा' गंभीर आरोप

IPL Auction 2025: CSK vs MI यांच्यात पाच खेळाडूंसाठी रंगणार वॉर! दोन्ही संघ मागे नाही हटणार

Share Market Closing: शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक! सेन्सेक्स 700 अंकांनी वाढला; निफ्टी 24,200च्या जवळ

CJI DY Chandrachud : सरकारविरोधात निकाल म्हणजेच न्यायव्यवस्थेचे स्वतंत्र असे नाही; सरन्यायाधीशांचे खडे बोल

Latest Marathi News Updates live : इतरांकडे असलेल्या चांगल्या गोष्टी पंतप्रधानांना दिसत नाहीत- खर्गे

SCROLL FOR NEXT