Mahindra EV esakal
विज्ञान-तंत्र

Mahindra EV : प्रतीक्षा संपली ! महिंद्रा इलेक्ट्रिक SUV पुढच्या महिन्यात येणार , जाणून घ्या काय असेल त्यात खास

महिंद्राच्या इलेक्ट्रिक कारची लोक खूप दिवसांपासून वाट पाहात आहेत

सकाळ डिजिटल टीम

Mahindra EV : देशातली इलेक्ट्रिक वाहनांची मागणी पाहता महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीने भारतात आपल्या इलेक्ट्रिक कार लाँच करण्याची घोषणा केली होती. तेव्हापासून महिंद्राच्या इलेक्ट्रिक कारची लोक खूप दिवसांपासून वाट पाहात आहेत. आता महिंद्राने त्यांची ऑल-इलेक्ट्रिक एसयूवी रेंज लॉन्च केली आहे. कंपनीने ब्रिटनमध्ये ही नवी इलेक्ट्रिक एसयूव्ही लॉन्च केली आहे.

या नव्या इलेक्ट्रिक गाड्या यूके स्थित MADE (महिंद्रा अॅडव्हान्स्ड डिझाइन युरोप) डिझाईन स्टुडिओमध्ये तयार केल्या जातील. आणि 10 फेब्रुवारी ला प्रथमच भारतात लॉन्च केल्या जातील. हैदराबादमधील पहिल्या फॉर्म्युला ई रेसिंगच्या आधी ही कार लाँच केली जाईल.

महिंद्रा अँड महिंद्राने त्यांच्या रेसिंग फॅक्टरी टीमला फॉर्म्युला ई ग्रिडवर आणलय. फॉर्म्युला ई रेसिंगच्या सुरुवातीपासूनच ही टीम ॲक्टीव्ह राहिली आहे. टीम M9Electro ने रेसिंग कारवरही फोकस केलाय. त्यामुळे हैदराबाद ई प्रिक्स वीकेंड मध्ये महिंद्रा कारच्या पदार्पणाचा मार्ग मोकळा झालाय.

XUV.e चे फिचर्स

महिंद्राच्या नव्या इलेक्ट्रिक SUV रेंज मध्ये XUV.e आणि BE हे दोन वेगवेगळे इलेक्ट्रिक सबब्रँड बाजारात आणले आहेत. XUV.e चे दोन मॉडेल आहेत. तर, BE चे तीन मॉडेल आहेत.

या दोन्ही मॉडेल लाइन्समध्ये युनिक डिझाईन फिचर्स देण्यात आलेत.

यात इलेक्ट्रॉनिक INGLO प्लॅटफॉर्म वापरण्यात येईल. XUV.e रेंज पहिल्यांदा बाजारात दाखल होईल. डिसेंबर 2024 पासून याचं प्रोडक्शन सुरु होईल. त्यानंतर ऑक्टोबर 2025 पासून BE मॉडेल्सवर काम सुरू करण्यात येईल असं कंपनीने सांगितलं आहे.

महिंद्राचा XUV ब्रँड त्याच्या ICE मॉडेल्सच्या रेंजसाठी ओळखला जातो. पण कंपनी आपल्या इलेक्ट्रिक मॉडेल्सची वेगळी ओळख निर्माण करण्यावर भर देत आहे. EV च्या Twin Peaks लोगोमध्ये कॉपर फिनिश असणार आहे. नुकत्याच लाँच झालेल्या XUV400 वर असच फिनिशिंग देण्यात आलं आहे. XUV.e8 ची कॉन्सेप्ट XUV700 सारखीच आहे. यानंतर कंपनी XUV.e9 आणेल. याची कॉन्सेप्टही वेगळी असेल. याचं प्रोडक्शन एप्रिल 2025 मध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे.

दरम्यान, इलेक्ट्रिक वाहनांची BE रेंज 2025 पासून येणार आहे. त्याचा लुक इतर गाड्यांपेक्षा वेगळा असेल. यात C आकाराचा एलईडी हेडलॅम्प असेल. BE रेंजची सुरुवात BE.05 coupe-SUV ने होईल आणि तिला स्पोर्ट्स इलेक्ट्रिक कारच लेबलिंग करण्यात येईल. त्यापाठोपाठ BE.07 लॉन्च केली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT