Mahindra Stock Clearance Sale eSakal
विज्ञान-तंत्र

Mahindra Discount : कार घेण्याची सुवर्णसंधी! महिंद्राच्या स्टॉक क्लिअरन्स सेलमध्ये मिळतेय 4.2 लाखांपर्यंतची सूट

महिंद्रा कंपनी आपल्या दोन तगड्या गाड्यांवर मोठा डिस्काउंट देत आहे. (Mahindra company big discount on two of its tough cars)

Sudesh

या वर्षीचा शेवटचा महिना सुरू झाला आहे. नवीन वर्ष सुरू व्हायला अगदी काही दिवस शिल्लक असल्यामुळे कित्येक कंपन्या आपला स्टॉक क्लिअर करण्याच्या प्रयत्नात आहेत. महिंद्रा कंपनीने देखील आपल्या स्टॉक क्लिअरन्स सेलची घोषणा केली आहे.

महिंद्रा कंपनी आपल्या दोन तगड्या गाड्यांवर मोठा डिस्काउंट देत आहे. यात एका इलेक्ट्रिक कारचाही समावेश आहे. कोणत्या कारवर किती डिस्काउंट मिळत आहे, याबाबत आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. CNBC ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

XUV400

महिंद्राच्या XUV400 EL व्हेरियंटवर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट उपलब्ध आहे. यातील विना ESC मॉडेलवर सर्व डिस्काउंट जोडल्यानंतर 4.2 लाख रुपयांपर्यंतची सूट मिळत आहे. ESC मॉडेलवर 3.2 लाख रुपयांची सूट मिळत आहे. यासोबतच, कमी स्पेसिफिकेशन्स असणाऱ्या EC व्हेरियंटवर 1.7 लाख रुपयांची सूट मिळत आहे.

XUV400 या इलेक्ट्रिक गाडीच्या टॉप व्हेरियंटमध्ये 456 किलोमीटर रेंज मिळते. EC ट्रिम व्हेरियंटमध्ये 375 किलोमीटर एवढी रेंज मिळते. या गाड्यांची एक्स शोरुम किंमत 15.99 ते 19.39 लाख रुपयांदरम्यान आहे.

XUV300

एक्सयूव्ही 300 या गाडीवर देखील मोठा डिस्काउंट उपलब्ध आहे. या गाडीच्या W8 या टॉप डिझेल व्हेरियंटवर 1.72 लाख रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. तर W6 मॉडेलवर 1.4 लाख रुपयांची सूट मिळते आहे. (Automobile News)

बेसिक टर्बो पेट्रोल व्हेरियंटवर 45,000 ते 1.63 लाख रुपयांची सूट मिळत आहे. तर पेट्रोलमधील टॉप व्हेरियंटवर यापेक्षा जास्त डिस्काउंट मिळत आहे. XUV300 या डिझेल गाड्यांची एक्स शोरूम किंमत 7.99 ते 13.46 लाख रुपयांपर्यंत जाते. पेट्रोल व्हेरियंट गाड्यांची किंमत 9 ते 13 लाख रुपयांदरम्यान आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT