Mahindra Thar Roxx New 5-Door SUV launching August 14 esakal
विज्ञान-तंत्र

Thar 5 Door SUV Launch : या महिन्यात लाँच होतीये 5 दरवाज्यांची महिंद्रा थार; ॲडव्हान्स फीचर्ससह दमदार एसयूव्हीची मार्केटमध्ये होणार एंट्री

Mahindra Thar Roxx Launch : महिंद्रा कंपनी लोकप्रिय थारची ५ दरवाजांची आवृत्ती म्हणून ‘थार रॉक्स’ या महिन्यात लाँच होणार आहे. या नव्या एसयूव्हीमुळे महिंद्राच्या एसयूव्ही पोर्टफोलिओला आणखी दमदार बनवण्यात मदत होणार आहे.

Saisimran Ghashi

Mahindra Thar New Car Launch : देशातील एसयूव्ही कार मार्केटमध्ये आणखी एक धमकेदार कारची एन्ट्री होणार आहे. महिंद्रा कंपनी लोकप्रिय थारची ५ दरवाजांची आवृत्ती म्हणून ‘थार रॉक्स’ १४ ऑगस्ट रोजी लाँच करणार आहे. या नव्या एसयूव्हीमुळे महिंद्राच्या एसयूव्ही पोर्टफोलिओला आणखी दमदार बनवण्यात मदत होणार आहे.

नव्या थार रॉक्समध्ये आकर्षक गोलाकार एलईडी हेडलॅम्प्स, एलईडी डीआरएल, एलईडी फॉग लाईट्स आणि एलईडी टेललॅम्प्स देण्यात आले आहेत. याशिवाय नवी ग्रिल आणि डिझाइन केलेले अलॉय व्हील्सही या कारची शोभा वाढवतील. या एसयूव्हीमध्ये ३६० डिग्री कॅमेरा सेटअपही देण्यात येणार आहे.

कारच्या इंटेरियरबाबत अधिकृत माहिती नाही; मात्र, १०.२५ इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि १०.२५ इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय पॅनोरॅमिक सनरुफही या कारची खासियत ठरणार आहे. थार रॉक्समध्ये एडीएएस फीचरही देण्यात येणार असल्याने ही एक्सयूव्ही ७०० आणि एक्सयूव्ही ३एक्सओ नंतर एडीएएस असलेली महिंद्राची तिसरी एसयूव्ही ठरणार आहे.

इंजिन पर्यायांच्या बाबतीत थार रॉक्समध्ये थारमधीलच १.५ लिटर डीझेल, २.२ लिटर डीझेल आणि २.० लिटर पेट्रोल इंजिन पर्याय देण्यात येऊ शकतात. या इंजिनला ६ स्पीड मॅन्युअल आणि ६ स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय उपलब्ध असेल. या कारमध्ये फोर व्हील ड्राइव्ह सेटअपही देण्यात येणार आहे.

थार रॉक्सची किंमत १२.५० लाख रुपयांपासून सुरु होऊ शकते. तर टॉप वेरिएंटची किंमत १९ लाख रुपये इतकी असण्याची शक्यता आहे. या नव्या एसयूव्हीची स्पर्धा मारुती सुझुकी जिम्नी आणि फोर्स गुरखा यांच्याशी होणार आहे.

या कारबद्दल अजून अधिकृतरित्या जास्त माहिती कंपनीने शेअर केली नाही. कार लॉन्च होण्यापूर्वीच या कारसाठी देशभरातून उत्सुकता व्यक्त केली जात आहे. 14 ऑगस्टला लॉन्च झाल्यानंतर ही एसयूव्ही गाडी लोकांच्या किती पसंतीस उतरते हे पाहण्यासारखे असेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Govt of India: भारत सरकारने विकिपीडियाला बजावली नोटीस, केला 'हा' गंभीर आरोप

IPL Auction 2025: CSK vs MI यांच्यात पाच खेळाडूंसाठी रंगणार वॉर! दोन्ही संघ मागे नाही हटणार

Share Market Closing: शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक! सेन्सेक्स 700 अंकांनी वाढला; निफ्टी 24,200च्या जवळ

CJI DY Chandrachud : सरकारविरोधात निकाल म्हणजेच न्यायव्यवस्थेचे स्वतंत्र असे नाही; सरन्यायाधीशांचे खडे बोल

Latest Marathi News Updates live : इतरांकडे असलेल्या चांगल्या गोष्टी पंतप्रधानांना दिसत नाहीत- खर्गे

SCROLL FOR NEXT