Make Reels on Facebook, Earn Rs 26 Lakh a Month Know How 
विज्ञान-तंत्र

फेसबुकवर रील्स बनवा, महिन्याला कमवा 26 लाख रुपये, कसे ते वाचा?

सकाळ डिजिटल टीम

Facebook Reels: फेसबुकने आपल्या यूझर्ससाठी Instagram सारखे नवीन फीचर आणले आहे. कंपनीने 150 हून अधिक देशांमध्ये लहान व्हिडिओ मेकिंग फीचर Reels आणले आहे. हे अॅप जगभरातील प्रसिद्ध TikTok ला जोरदार स्पर्धा देईल. फेसबुकवर यूझर्सना 60 सेकंदांचा छोटा व्हिडिओ बनवायचा आहे. यूझर्स इन्स्टाग्रामवर व्हिडिओ बनवून क्रॉस प्लॅटफॉर्म फेसबुकवरही शेअर करू शकतील.


'फेसबुक रील्सना (Facebook Reels) ग्लोबली लॉन्च करण्यात आले असल्याची माहिती मेटाने (Meta) दिली, ज्यामुळे कंटेंट क्रिएटर्सना कमाईचा एक नवीन मार्ग मिळेल. फेसबुकने एका ब्लॉग पोस्टद्वारे आपल्या यूझर्सना ही माहिती दिली आहे. 150 हून अधिक देशांमध्ये iOS आणि Android डिव्हाइसेससाठी Facebook Reels रोल आउट करत आहोत, जेणेकरून कंटेंट क्रिएटर्सना पैसे कमावण्यासाठी मोठी बाजारपेठ मिळेल असे मेटाने आपल्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे. तसेच त्यात वेळोवेळी क्रिएशन टूल्स जोडली जात आहेत.


कमाईचा नवीन मार्ग
मार्क झुकरबर्गच्या म्हणण्यानुसार व्हिडिओ क्लिपिंग टूल तयार केले जात आहे. कंटेंट क्रिएटर्स लाइव्ह आणि लॉन्ग फॉर्म व्हिडिओ पब्लिश करु शकतील. याशिवाय फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या रील्स फीचरद्वारे कंटेंट क्रिएटर्ससाठी कमाईचा एक नवीन मार्गही सुरू करण्यात आला आहे.

काय खास ?
रील्स फिचर्सना ग्लोबली रोल आऊट करण्यासोबतच बॅनर आणि स्टिकर्सवर पॉप अप होणार्‍या जाहिरातींद्वारे रेव्हेन्यू कमावण्याच्या मार्गाची चाचणी करत असल्याचे मेटाने सांगितले. ज्या युझर्सच्या रील्सवर 30 दिवसांत किमान 1000 व्ह्यूज असतील, त्यांना फेसबूक बोनस देणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाराष्ट्रामधील मतमोजणीपूर्वी नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात जिलेबी बनवण्याची तयारी सुरु

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निवडून आल्यानंतरही पक्षासोबतच राहू; ठाकरेंनी लिहून घेतलं प्रतिज्ञापत्र

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT