विज्ञान-तंत्र

फेसबुकची ही सेटिंग माहीत नसेल तर आहे नातेवाईक, मित्रांना धोका

नीलेश डाखोरे

नागपूर : फेसबुक, व्हॉट्स ॲप, ट्विटर, इंस्टाग्राम आदी सोशल मीडियाचे (Social media) साधन आता कुणासाठीही नवीन नाही. प्रत्येकाकडे स्मार्ट फोन आल्यामुळे याचा वापर सहाजिकच वाढला आहे. अल्पावधीत व्हॉट्स ॲपने लोकांच्या मनावर राज्य केले. यामुळे फेसबुकचे अस्तित्व धोक्यात आले होते. यामुळेच मार्क झुकरबर्ग यांनी व्हॉट्स ॲप विकत घेतले. यावरून सोशल मीडियाचे महत्त्व स्पष्ट होते. आता फेसबुकचा वाईट कामांसाठी अधिक वापर (Use of Facebook for bad work) होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे आपले अकाऊंट कसे सुरक्षित करावे, असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होत आहे. (Make-your-Facebook-account-secure)

ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांनी आपला मोर्चा फेसबुककडे वळविला आहे. हॅकर्स कोणाच्याही फेसबुक अकाऊंटवर पाळत ठेवतात. यानंतर ते त्यांचे बनावट अकाऊंट तयार करून फ्रेंडलिस्टमधील इतर मित्रांना रिक्वेस्ट पाठवतात. समोरचा व्यक्ती मित्रच असल्याचे समजून रिक्वेस्ट स्वीकारतो आणि येथूनच फसवणुकीला सुरुवात होते.

बनावट अकाऊंट तयार करणारे समोरच्या व्यक्तींना मेसेज करून आपण किंवा आपले मुल-बाळ अडचणीत असल्याचे सांगतात किंवा फोटो दाखवितात आणि मदत मांगतात. समोरील व्यक्ती मित्र/नातेवाईक अडचणीत असल्याचे पाहून मदतीसाठी तयार होतो. यानंतर समोरील बनावट खात्यावरून UPI मोबाईल नंबर किंवा बँक अकाऊंटची माहिती देऊन पैसे आपल्या खात्यात वळते केले जातात. देश आणि राज्यभरासह नागपूर शहरात आजवर अशा अनेक घटना घडल्या आहेत. अशा बनावट खात्यांबाबत तातडीने तक्रार करण्यासह स्वतःचे खाते सुरक्षित आहे की नाही, हे तपासून पाहण्याचे आवाहन सायबर सेलकडून करण्यात आले आहे.

फेसबुकवर ट्रेंड

काही दिवसांपासून फेसबुकवर ‘‘माझे फेसबुक अकाऊंट हॅक झाले आहे. दुसरे अकाऊंट तयार करून तुम्हाला रिक्वेस्ट येऊ शकते. ती तुम्ही स्वीकारू नका. मी दुसरे अकाऊंट तयार केलेले नाही. सावध राहा’’ असा मजकूर लिहून पोस्ट करण्यात येत आहे. हा ट्रेंड चांगलाच चर्चेत आहे त्याला कारण आहे बनावट खात्याद्वारे होणारी हानी.

अशी करा तक्रार

तुमचा फोटो नाव वापरून बनावट खाते तयार झाले असेल आणि त्यावरून ज्यांना फ्रेंड रिक्वेस्ट गेली आहे, त्यांच्याकडून ती लिंक मागवा. त्या लिंकवर क्लिक करून गुगल क्रोमवरून फेसबुक खाते उघडा. नमूद प्रोफाईलच्या उजव्या बाजूला तीन डॉट वर क्लिक करा ‘फाइंड सपोर्ट ॲंड रिपोर्ट प्रोफाईल’चा पर्याय निवडा. यानंतर ‘प्रिटेंडिंग टू बी समवन’ या पर्यायावर क्लिक करा. तुम्हाला ‘मी’, ‘अफ्रेंड’, ‘सेलिब्रेटी’ असे तीन पर्याय दिसतील. तुम्ही स्वतःच्याच खात्याची तक्रार करीत असल्याने ‘मी’ वर क्लिक करा. यानंतर ‘नेक्स्ट’ हा पयाय निवडा. असे केल्याने फेक अकाऊंट बंद होईल. मित्राच्या फेक खात्याची तक्रार करायची असल्यास ‘अफ्रेंड’ हा पर्याय निवडून ‘नेक्स्ट’वर क्लिक करा. त्यानंतर ते खाते बंद होईल.

प्रोफाईल असे करावे सुरक्षित

  • तुमच्या प्रोफाईल मधील माहिती किंवा फोटो मित्रांच्या व्यतिरिक्त इतर अनावश्यक लोकांना दिसू नये यासाठी वरच्या बाजूला उजव्या हातावर दिसणाऱ्या तीन आडव्या रेषेवर क्लिक करा. आपले नावावर (प्रोफाईलवर) क्लिक करा. उजव्या बाजूच्या तीन डॉट क्लिक करा. ‘लॉक प्रोफाईल’वर क्लिक करा. प्रोफाईल लॉक कॅन्फार्म करा आणि ‘ओके’वर क्लिक करा.

  • तुमची फ्रेंडलिस्ट अनोळखी व्यक्तीला दिसू देऊ नका. यासाठी Settings & privacy जाऊन आपल्याला आपला फोन नंबर, ईमेल आयडी, आपल्या पोस्ट कोणी पहाव्यात, मित्रांची यादी कोणी पहावी आदींची डेटिंग करता येते. त्यापैकी मित्रांची यादी ‘मी’ फसवणुकी दरम्यान अत्यंत महत्त्वाची आहे. आपले मित्र केवळ आपल्याला दिसले पाहिजे अशी सेटिंग करण्यासाठी Settings सेटिंगमध्ये जा Privacy Settings वर क्लिक करा. त्यातील Who can see your friends list? (तुमची फ्रेंड लिस्ट कोण पाहू शकते? (Only me) ‘केवळ मी’ हा पर्याय निवडा.

  • अनोळखी फ्रेंड रिक्वेस्ट येऊ नये म्हणून Who can send you friend request? हा पर्याय निवडा आणि त्यातील ‘फ्रेंडस ऑफ फ्रेंड’ हा पर्याय निवडा.

  • ई-मेल आयडी कुणालाही दिसू नये यासाठी Who can look you up using the email address you provided ‘हू कॅन लुक यू अप युजिंग द मेल ॲड्रेस यू प्रोव्हाईडेड’ हा पर्याय निवडा व (Only me) ओन्ली मी करा.

  • मोबाईल क्रमांक कुणालाही दिसू नये यासाठी The phone number you provided ‘द फोन नंबर यू प्रोव्हाईडेड’वर क्लिक करून (Only me)‘ओन्ली मी’ करा.

खाते हॅक होऊ नये यासाठी

आपले खाते कोणी हॅक करू नये व ते सुरक्षित राहण्यासाठी ‘Setting’ मध्ये जाऊन तसेच ‘Use two-factor authentication ‘सेक्युरिटी ॲण्ड लॉगिन व टू फॅक्टर ऑथेंटीकेशन’ हा पर्याय निवडा. यामध्ये एस.एम.एस.द्वारे आपले व्हेरिफिकेशन करून घ्यावे. आपला पासवर्ड टाकला की खाते अत्यंत सुरक्षित होते. यानंतर आपण दिलेल्या मोबाईलवर आलेला व्हेरिफिकेशन कोड टाकल्याशिवाय खाते कोणी अन्य व्यक्ती उघडू शकणार नाही.

तुम्हाला ज्यांनी फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली आहे त्याचा नंबर असेल तर याबाबत विचारून घ्या. कोणी आपल्याला या माध्यमातून गरज आहे असे म्हणून रुपयांची मागणी करीत असेल तर शक्यतो त्याला भेटून किंवा त्याला फोन करून खात्री करा. कोणासोबत अशी घटना झाली असल्यास संबंधित फेसबुक खात्याची लिंक काढून स्वतःचे आधार कार्ड आणि गेलेल्या रकमेबाबत बँकेचे स्टेटमेंट घेऊन, नजीकच्या पोलिस स्टेशन येथे किंवा सायबर पोलिस स्टेशन येथे येऊन तक्रार नोंद करा.
- केशव वाघ, सहाय्यक पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस स्टेशन, नागपूर शहर

(Make-your-Facebook-account-secure)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

Ghatkopar East Assembly Election 2024 Result live : घाटकोपर पूर्व मतदार संघात भाजप आणि शरद पवार गटात दुहेरी लढत

Mira Bhaindar: Assembly Election 2024 Result Live: मिरा-भाईंदर मतदारसंघात सय्यद मुजफ्फर हुसेन विरुद्ध नरेंद्र मेहता

SCROLL FOR NEXT