मोबाईल टेडा वाचवायचाय? Esakal
विज्ञान-तंत्र

तुमचा मोबाईल डेटा लगेचच संपतोय? Data Use नेमका कुठे होतोय असं करा चेक

मोबाईलचा वापर करत असताना अचानक डेटा Mobile Data संपत आल्याचा मेसेज किंवा नोटिफिकेशन येत आणि आपण गोंधळात पडतो. एवढा डेटा संपला कुठे असा प्रश्न अनेकदा तुम्हालाही पडला असेल

Kirti Wadkar

सध्याच्या घडीला मोबाईल या केवळ एका डिव्हाइसवरून Mobile Device अनेक कामं करणं शक्य झालं आहे. मग अगदी मुलांचा अभ्यास असो ऑनलाइन क्लास किंवा ऑफिसची कामं आणि बँकेचे व्यवहार तुमच्या हातातील मोबाईलमुळे सारं काही सोप झालं आहे. Marathi Tips How to Save your Mobile Date

मोबाईल आपण अनेक ऑनलाईन काम करत असतो. सोशल मीडियाचा Social Media वापर असो किंवा सिनेमा, वेब सीरिज पाहणं. या सगळ्यासाठी मोबाईलचा डेटा खर्च होत असतो.

मोबाईलचा वापर करत असताना अचानक डेटा Mobile Data संपत आल्याचा मेसेज किंवा नोटिफिकेशन येत आणि आपण गोंधळात पडतो. एवढा डेटा संपला कुठे असा प्रश्न अनेकदा तुम्हालाही पडला असेल. तुमच्या फोनमध्ये नेमका कुठे सर्वात जास्त डेटाचा वापर होतो हे जाणून घेणं यासाठी महत्वाचं आहे.

आपल्या फोनमधील प्रत्येक अॅप वेगवेळ्या प्रमाणात डेटा क्नझ्युम करत असतात. तसचं डेटाचा सगळ्यात जास्त पावर कुठे होतोय हे तुमच्या लक्षात आल्यास तुम्ही त्यावर नियंत्रण देखील आणू शकता. यासाठीच डेटाचा वापर कुठे होतोय हे कसं चेक करावं हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

सॅमसंग स्मार्टफोन आणि टॅबलेटमधील Data Use असा करा चेक

- यासाठी सर्वप्रथम तुम्हाला फोनमधील सेटिंगमध्ये जावं लागेल.

- सेटिंगमध्ये तुम्हाला Connections हा पर्याय दिसेल. हा पर्याय निवडा.

- इथं तुम्हाला डेटा युजेस हा पर्याय दिसेल. यावर क्लिक करा.

- त्यानंतर Mobile data Usage पर्याय निवडा.

- Mobile data Usage मध्ये तुम्हाला तुमचा डेटा कोणत्या अॅपसाठी किती प्रमाणात वापरला जात आहे. कोणत्या अॅपसाठी जास्त डेटाचा वापर होतो. तसंच ठराविक तारखेच्या काळामध्ये किती वापर झालाय. याची सविस्तर माहिती मिळेल.

हे देखिल वाचा-

इतर अँड्राॅइड डिव्हाइस

प्रत्येक फोनची सेटिंग आणि पर्याय हे वेगवेगळे असतता. मात्र सेटिंगमध्ये किंवा सर्च पर्यायातून तुम्ही Mobile data Usage पर्याय शोधू शकता. इथं आम्ही तुम्हाला नोकिया, गुगुल पिक्सल तसंच मोटोरोला या फोनमध्ये असणाऱ्या साधारण सेटिंगनुसार डेटा चेक कसा करावा हे सांगणार आहोत.

सर्वप्रथम तुमच्या फोनमधील सेटिंगमध्ये जा.

इथं Network and Internet चा पर्याय निवडा. जर तुम्ही दोन सीम कार्ड वापर असाल तर तुम्हाला योग्य सीम कार्ड सिलेक्ट करावं लागेल.

त्यानंतर तुम्हाला data Usage चा पर्याय निवडावा लागेल.

इथं तुम्हाला कोणत्या अॅपसाठी तुम्ही किती डेटा खर्च करत आहात याची संपूर्ण माहिती मिळेल,

तर आयफोन iPhone युजर्ससाठी डेटा वापर चेक करणं अत्यंत सोपं आहे. यासाठी Setting मध्ये डेटाचा पर्याय निवडा. इथं तुम्हाला डेटाचा वापर कुठे आणि किती प्रमाणात केला जातोय याची माहिती मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar: “सध्या धर्म नव्हे, आरक्षण संकटात”; ओबीसींनी वंचितसोबत राहण्याचं आंबेडकरांचं आवाहन

Rahul Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही स्मृतिभ्रंशाचा आजार; आता ते आमचेच भाषण चोरत आहेत

Rajnath Singh : राहुल गांधी तुम्ही, आता जातगनणेची "ब्लु प्रिंट' जनतेसमोर आणाचं

ST Passengers : लालपरीच्या प्रवाशांत तीन वर्षांत ५० हजाराने वाढ; पुणे विभागाला आणखी १६० बसची आवश्यकता

Pakistan Army: पाकिस्तानच्या लष्करी तळावर दहशतवादी हल्ला! ७ सैनिक ठार, १५ जखमी

SCROLL FOR NEXT