Zuckerberg on Tech Layoff eSakal
विज्ञान-तंत्र

Mark Zuckerberg on Layoff : 'एआय'मुळे नव्हे, तर अनेक कारणांमुळे जातायत जगभरातील नोकऱ्या; मार्क झुकरबर्गने केलं स्पष्ट

Tech Layoff : 2024 वर्ष सुरू झाल्यापासून जगभरातील 40 हून अधिक दिग्गज टेक कंपन्यांनी लेऑफची घोषणा केली आहे. यामुळे सुमारे 40 ते 50 हजार जणांची नोकरी गेली असल्याची चर्चा आहे.

Sudesh

Mark Zuckerberg on Tech Layoffs : 2024 वर्ष सुरू झाल्यापासून जगभरातील 40 हून अधिक दिग्गज टेक कंपन्यांनी लेऑफची घोषणा केली आहे. यामुळे सुमारे 40 ते 50 हजार जणांची नोकरी गेली असल्याची चर्चा आहे. या लेऑफमागचं सर्वात मोठं कारण एआय असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र, हे पूर्णपणे खरं नसल्याचं मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी म्हटलं आहे.

"लेऑफचा निर्णय हा आमच्यासाठी देखील खूप कठीण असतो, मात्र कंपनी पुढे न्यायची असेल तर असे निर्णय घ्यावे लागतात", असं मार्क एका पॉडकास्टमध्ये म्हणाले. 'मॉर्निंग ब्रू डेली' या चॅनलला ते मुलाखत देत होते. लेऑफचा पहिला टप्पा हा कोविड महामारीदरम्यान सुरू करण्यात आला होता. कित्येक कंपन्या अजूनही यातून सावरत असल्याचं मार्क यांनी म्हटलं. (Meta CEO Mark Zuckerberg)

एआय मोठं कारण नाही

मायक्रोसॉफ्ट, गुगल अशा कित्येक कंपन्यांना गेल्या काही दिवसांमध्ये भरपूर प्रॉफिट झालं आहे. मात्र, तरीही या कंपन्यांनी कामगार कपातीची घोषणा केली आहे. याला एआय मोठं कारण मानलं जात असलं, तरी झुकरबर्ग यांनी असं मानन्यास नकार दिला आहे. त्यांनी या लेऑफमागची काही इतर कारणं यावेळी स्पष्ट केली. (Tech Layoffs in 2024)

ओव्हर हायरिंग

कोरोना काळामध्ये ई-कॉमर्स सेल मोठ्या प्रमाणात वाढले होते. यामुळे ऑनलाईन अ‍ॅडव्हरटायझिंग कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात भरती केली. या कंपन्यांना त्या काळात भरपूर फायदा देखील झाला. मात्र, आता लोक पुन्हा एकदा दुकानांमध्ये जात आहेत. त्यामुळे ऑनलाईन जाहिरातींचे दर, ऑनलाईन शॉपिंग या गोष्टी खाली चालल्या आहेत. त्यामुळे मेटासोबत इतर कित्येक कंपन्यांना कॉस्ट कटिंग करावी लागत आहे. म्हणूनच ओव्हर हायरिंगला कमी करण्यासाठी लेऑफच्या घोषणा करण्यात येत आहेत. (Cost Cutting)

कठीण निर्णय गरजेचे

कित्येक टेक कंपन्यांनी लेऑफ हा पर्याय सुरुवातीला बाजूलाच ठेवला होता. मात्र, असं करणं कंपनीच्या भविष्यासाठी योग्य असल्याची जाणीव त्यांना होत आहे. या निर्णयामुळे आम्हाला कित्येक वेळा प्रतिभावान उमेदवारांना घरी पाठवावं लागतं. मात्र, एकूण कंपनी लेऑफनंतर अधिक चांगल्या प्रकारे काम करत असल्याचं आतापर्यंत दिसून आलं आहे. (आमच्या) कंपनीचे शेअर्स देखील ऑल-टाईम-हाय आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: घाटकोपर पूर्व विधानसभा मतदार संघात कोणी घेतली आघाडी ? भाजप विरुद्ध शरद पवार गटात थेट लढत

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळमध्ये सुनील शेळके यांची दणदणीत आघाडी

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT