Maruti Baleno Alpha  Sakal
विज्ञान-तंत्र

Maruti Car: दरमहिना फक्त २० हजार द्या अन् घरी घेऊन जा १० लाखांची गाडी, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स

Maruti Baleno Alpha हॅचबॅक कारला अवघ्या ९९ हजार रुपयांच्या डाउन पेमेंटवर घरी घेऊन जाऊ शकता.

सकाळ डिजिटल टीम

Maruti Baleno Alpha Details: मारुती सुझुकीची लोकप्रिय हॅचबॅक कार Baleno कंपनीच्या बेस्ट सेलिंग गाड्यांपैकी एक आहे. गाडीचे टॉप व्हेरिएंट अल्फा (Alpha) शानदार फीचर्ससह येते. या गाडीची किंमत जवळपास १० लाख रुपये आहे. परंतु, तुम्ही अवघ्या ९९ हजार रुपयांच्या डाउन पेमेंटवर गाडीला घरी घेऊन जाऊ शकता.

Maruti Baleno Alpha च्या किंमत, फीचर्स, माइलेज आणि इंजिनविषयी सविस्तर जाणून घेऊया.

Maruti Baleno Alpha ची किंमत

Maruti Baleno Alpha ची एक्स-शोरूम किंमत ९,२१,००० रुपये आहे. तर ऑन-रोड किंमत १०,३२,१२० पर्यंत जाते. तुम्ही जर रोख रक्कमेसह गाडीला खरेदी केल्यास १०.३ लाख रुपये खर्च करावे लागतील.

तुम्ही गाडीला ९९ हजार रुपयांच्या डाउन पेमेंटवर देखील घरी घेऊन जाऊ शकता. ९९ हजार रुपये डाउन पेमेंट केल्यास ९,३३,१२० रुपयांपर्यंत कर्ज घ्यावे लागेल.

९९ हजार रुपये डाउन पेमेंट केल्यानंतर तुम्हाला पुढील ५ वर्ष दरमहिन्याला १९,७३४ रुपये ईएमआय भरावा लागेल. अशाप्रकारे, अवघ्या ९९ हजार रुपयात मारुती बलेनो अल्फा कार तुमची होईल.

हेही वाचा: Bestseller Phone: 'हा' आहे भारतातील सर्वाधिक विक्री होणारा स्मार्टफोन, किंमत-फीचर्सने ग्राहकांना लावले वेड

Maruti Baleno Alpha मध्ये मिळेल पॉवरफुल इंजिन

Maruti Baleno Alpha हॅचबॅक कारमध्ये कंपनीने ११९७ सीसीचे पॉवरफुल इंजिन देण्यात आले असून, हे इंजिन ८८.५० बीएचपी पॉवर आणि ११३ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. कंपनीचा दावा आहे की, कार प्रती लीटर २२.३५ किमी माइलेज देते.

Maruti Baleno Alpha मध्ये हेड अप डिस्प्ले, 360 डिग्री व्ह्यू कॅमेरा, मल्टी फंक्शन स्टेअरिंग व्हील, ऑटो क्लाइमेट कंट्रोल, इंजिन स्टार्ट स्टॉप बटन, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम, फ्रंट सीटवर ड्यूल एयरबॅग्स, ईबीडीसह अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम सारखे फीचर्स मिळतील.

हेही वाचा: द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: आज शेअर बाजार राहणार बंद; बीएसई आणि एनएसईवर कोणतेही ट्रेडिंग होणार नाही

Latest Maharashtra News Updates : गृह मतदान मोहिमत ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांनी बजावला मतदानाचा हक्क

Sweet Potato Patties: सकाळी नाश्त्यात बनवा चटपटीत रताळं पॅटिस, जाणून घ्या रेसिपी

Congress : समाजात फूट पाडण्यासाठीच भाजपने कलम 370 चा मुद्दा जिवंत ठेवलाय, खर्गेंचा हल्लाबोल

Satara Assembly Election : संदेश, रिल्स पाहताना सावधानता बाळगा...एपीके फाइलवर क्लिक नको, अन्यथा बँक खाते होईल रिकामे

SCROLL FOR NEXT