Maruti Suzuki 7 Seater Car : मारुतीच्या गाड्या म्हटलं की भारतीय डोळे झाकून विश्वास ठेवणार. अगदी सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल अशा गाड्या आणणारी ही कंपनी त्यांची नवीन 7 सीटर कार आणण्याच्या तयारीत आहे. या गाडीला Engage हे नाव मिळण्याची शक्यता आहे. गेल्या मार्च मध्ये मारुती सुझुकीने Engage नावाचा ट्रेडमार्क करण्यासाठी अर्ज केला होता.
मारुती सुझुकीची अपकमिंग 7 सीटरला टोयोटा इनोव्हा हाइक्रॉस रिबॅज व्हर्जन मानले जात आहे. ही सुझुकी ग्रँड विटारावर बेस्ड असेल. मीडिया रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, मारुती सुझुकीची नवीन प्रीमियम एमपीव्ही जुलै 2023 पर्यंत विक्रीसाठी उपलब्ध होईल. मारुती अँगेज देशात इंडो जपानी कार निर्माताचे प्रमुख मॉडल असेल.
लूक
लूक आणि फीचर्स वाइज बघायला गेलं तर मारुती सुझुकीची नवीन एमपीव्हीची डिझाइन आणि स्टायलिंग टोयोटा इनोव्हा हायक्रॉस पेक्षा थोडी वेगळी असेल. यात ब्रँडची सिग्नेचर ग्रिल सोबत नवीन डिझाइनचे हेडलँम्प, टेललँम्प आणि फ्रंट बंपर असतील. ही इनोव्हा हायक्रॉस प्रमाणे फ्रंट व्हील ड्राइव्ह सिस्टम सोबत मोनोकॉक टीएनजीए सी प्लॅटफॉर्मवर बेस्ड असेल. या कारचे इंटिरियर जबरदस्त असेल. तसेच फीचर्स इनोव्हा हायक्रॉस प्रमाणे असेल.
फीचर्स
मारुती सुझुकी अँगेज मध्ये अडवॉन्स्ड ड्रायव्हर असिस्टेंस सिस्टम (ADAS) सोबत वायरलेस अँड्रॉयड ऑटो आणि अॅपल कार प्ले सपोर्टचे 10 इंचाचा टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, 360 डिग्री कॅमेरा, ऑटोमन फंक्शन सोबत सेकंड रो सीट्स, ड्युअल पॅन पॅनारमिक सनरूफ, मल्टिपल एअरबॅग्स सह अनेक खास फीचर्स पाहायला मिळू शकतात.
इंजिन आणि पॉवर मध्ये मारुती सुझुकी अँगेज एमपीव्ही मध्ये हायब्रिड टेक्नोलॉजीचे 2.0 लीटर पेट्रोल इंजिन दिले आहे. हे इंजिन 186 PS चे मॅक्सिमम पॉवर आणि 206 एनएमचे पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन ई-सीव्हीटी गियरबॉक्स सोबत पाहिले जाऊ शकते.
तर 2.0 लीटर पेट्रोल इंजिन 174 PS चे मॅक्सिमम पॉवर आणि 205Nm चे पिक टॉर्क जनरेट करते. यात सीव्हीटी ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पाहायला मिळू शकतात. मारुती सुझुकी अपकमिंग 7 सीटर एमपीव्हीची किंमत 18 लाख रुपये ते 30 लाख रुपये (एक्स शोरूम) असू शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.