Maruti Suzuki Alto K10 launched in india check price features specifications  
विज्ञान-तंत्र

मारुतीची नवीन Alto K10 लाँच; देते 25km मायलेज

सकाळ डिजिटल टीम

Maruti Suzuki Alto K10 : मारुतीने आपली नवीन अल्टो K10 लॉन्च केली आहे. ही हॅचबॅक नवीन-जनरल के-सिरीज 1.0L ड्युअल जेट, ड्युअल VVT इंजिनसह येते. नवीन Alto K10 ची लांबी 3,530mm, रुंदी 1,490mm, उंची 1,520mm आणि 2,380mm चा व्हीलबेस आहे. याव्यतिरिक्त, या कारमध्ये अनेक सुरक्षा फीचर्स देखील देण्यात आले आहेत. या कारला इलेक्ट्रॉनिक ब्रेक फोर्स डिस्ट्रिब्युशन (EBD), रिव्हर्स पार्किंग सेन्सरसह अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS) मिळेल. तसेच या कारची एक्स-शोरूम किंमत 3.99 लाख रुपये आहे.

मारुती अल्टो K10 चे इंजिन

या हॅचबॅक कारमध्ये न्यू जे K-सिरीज 1.0L ड्युअल जेट, ड्युअल VVT इंजिन दिले आहे. हे इंजिन 49kW(66.62PS)@5500rpm ची पॉवर आणि 89Nm@3500rpm वर पीक टॉर्क जनरेट करते. कंपनीचा दावा आहे की त्याचे ऑटोमॅटिक व्हेरिएंट 24.90 किमी/ली मायलेज देईल आणि मॅन्युअल व्हेरिएंट 24.39 किमी/ली मायलेज देईल.

नवीन Alto K10 चे फीचर्स आणि स्पेसिफीकेशन्स

नवीन Alto K10 कार कंपनीच्या अपडेटेड प्लॅटफॉर्म Heartect वर आधारित आहे . या Alto K10 मध्ये 7-इंचाची फ्लोटिंग टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम दिली आहे. कंपनीने S-Presso, Celerio आणि Wagon-R मध्ये ही इन्फोटेनमेंट सिस्टम आधीच दिली आहे. ही इन्फोटेनमेंट प्रणाली Apple कार प्ले, Android Auto, USB, Bluetooth आणि AUX केबलला सपोर्ट करते. यामध्ये स्टिअरिंग व्हीललाही नवीन डिझाइन देण्यात आले आहे. तसेच यामध्ये इंफोटेनमेंट सिस्टीमचे माउंटेड कंट्रोल्स स्टिअरिंगवरच देण्यात आले आहेत.

नवीन अल्टोचे सेफ्टी फीचर्स

या हॅचबॅकमध्ये इलेक्ट्रॉनिक ब्रेक फोर्स डिस्ट्रिब्युशन (EBD), रिव्हर्स पार्किंग सेन्सरसह अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS) मिळेल. यासोबतच Alto K10 ला प्री-टेन्शनर आणि फोर्स लिमिट फ्रंट सीट बेल्ट मिळेल. सुरक्षित पार्किंगसाठी रिव्हर्स पार्किंग सेन्सरही मिळणार आहेत. स्पीड सेन्सिंग ऑटो डोअर लॉक आणि हाय स्पीड अलर्टसोबतच इतर अनेक सेफ्टी फीचर्सही कारमध्ये देण्यात आले आहेत. हे स्पीडी ब्लू, अर्थ गोल्ड, सिझलिंग रेड, सिल्की व्हाइट, सॉलिड व्हाइट आणि ग्रॅनाइट ग्रे या सहा रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Govt of India: भारत सरकारने विकिपीडियाला बजावली नोटीस, केला 'हा' गंभीर आरोप

IPL Auction 2025: CSK vs MI यांच्यात पाच खेळाडूंसाठी रंगणार वॉर! दोन्ही संघ मागे नाही हटणार

Share Market Closing: शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक! सेन्सेक्स 700 अंकांनी वाढला; निफ्टी 24,200च्या जवळ

CJI DY Chandrachud : सरकारविरोधात निकाल म्हणजेच न्यायव्यवस्थेचे स्वतंत्र असे नाही; सरन्यायाधीशांचे खडे बोल

Latest Marathi News Updates live : इतरांकडे असलेल्या चांगल्या गोष्टी पंतप्रधानांना दिसत नाहीत- खर्गे

SCROLL FOR NEXT