Maruti Suzuki Celerio CNG Variant : दिग्गज कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने (Maruti Suzuki सोमवारी सर्व-नवीन सेलेरिओचे CNG व्हेरिएंट लॉन्च केले आहे. सेलेरियोला कंपनीने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये लॉंच केले होती. Celerio चे CNG व्हेरिएंट मिड-लेव्हल VXi ट्रिमसह उपलब्ध आहे.(Maruti Suzuki Celerio CNG Car Launches in India)
किंमत किती आहे?
या कारच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर त्याची किंमत 6,58,000 रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे. जर आपण Celerioच्या पेट्रोल वेरिएंट बरोबर याची तुलना करायची झाल्यास त्याची किंमत 4.99 लाख रुपये ते 6.94 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.
इंजिन आणि उत्तम मायलेज
या सीएनजी कारमध्ये तुम्हाला चांगले मायलेज पाहायला मिळेल. ही कार त्याच्या पेट्रोल-डिझेल वेरिएंटपेक्षा जास्त मायलेज देते. CNG Celerio नवीन 1.0-लिटर ड्युअल जेट, ड्युअल VVT K-सिरीज इंजिन देण्यात आले आहे. CNG व्हेरिेएंट 57 PS आणि 82 Nm टॉर्क जनरेट करते, तर पेट्रोल व्हेरिएंट 65 PS आणि 89 Nm टॉर्क जनरेट करते जे CNG पेक्षा थोडा जास्त आहे. मायलेजच्या बाबतीत, या CNG व्हेरियंटचे मायलेज 35.50 km/kg (ARAI) आहे, तर पेट्रोलचे मायलेज 26.68 km/l (ARAI) आहे.
6 लाखांहून अधिक युनिट्सची विक्री
मारुती सुझुकीकडे 8 CNG मॉडेल्सचा सर्वात मोठा पोर्टफोलिओ आहे आणि कंपनीने आजपर्यंत 9,50,000 S-CNG वाहने विकली आहेत. Celerio लाँच झाल्यापासून दोन महिन्यांत कारला 25,000 बुकिंग मिळाले आहेत. Celerio च्या एकूण 6,00,000 युनिट्सची विक्री झाली असल्याचा दावा मारुती सुझुकीने केला आहे.
सीएनजी विक्री 22% वाढली
शशांक श्रीवास्तव, वरिष्ठ कार्यकारी संचालक (मार्केटिंग और सेल्स) , मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड यांनी सांगितले की, त्यांनी गेल्या पाच वर्षांत CNG कार विक्रीत 22% CAGR वाढ नोंदवली असून. त्यांची मारुती सुझुकी फॅक्टरी फिट एस-सीएनजी वाहने दुहेरी परस्परावलंबी ECU (इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट) आणि स्मार्ट इंजेक्शन सिस्टीमने सुसज्ज आहेत. तसेच ते सर्व प्रकारच्या भूप्रदेशात दर्जेदार कामगिरी करण्यासाठी विशेष ट्यून आणि कॅलिब्रेट केलेली आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.