maruti suzuki electric suv yy8 to be bigger than nexon ev check details  
विज्ञान-तंत्र

Maruti घेऊन येतेय पहिली इलेक्ट्रिक कार; किती असेल किंमत? वाचा

सकाळ डिजिटल टीम

देशात इलेक्ट्रिक वाहनांकडे (EV) ग्राहकांचा कल वाढताना दिसत आहे, या दरम्यान मारुती सुझुकी (Maruti-Suzuki) भारतीय इलेक्ट्रिक वाहन सेगमेंटमध्ये प्रवेश करणार आहे. काही मीडिया रिपोर्टनुसार, दोन्ही ऑटोमेकर्स इलेक्ट्रिक मिड साइज SUV वर एकत्रीतपणे काम करत आहेत, जी 2025 मध्ये कधीतरी लॉंच करण्यात येईल. नवीन मारुती इलेक्ट्रिक एसयूव्ही (Maruti-Suzuki Electric SUV) सुझुकीच्या गुजरातमधील प्लांटमध्ये तयार केली जाईल.

मारुतीची नवीन इलेक्ट्रिक कार नवीन, फ्यूचरिस्टीक डिझाइनसह येईल. ते सध्याच्या IC इंजिन असलेल्या वाहनांपेक्षा वेगळी असेल आणि ती स्केटबोर्ड 27PL प्लॅटफॉर्मवर तयार केले जाईल, जे टोयोटाच्या 40PL ग्लोबल आर्किटेक्चरमधून घेतले आहे. टोयोटाच्या इलेक्ट्रिक एसयूव्हीसाठी हेच आर्किटेक्चर वापरले जाईल, परंतु त्याची स्टाइल मारुती सुझुकीच्या इलेक्ट्रिक कारपेक्षा वेगळी असेल. मारुती आणि टोयोटाच्या या इलेक्ट्रिक एसयूव्हीचे नाव मारुती सुझुकी YY8 असू शकते.

नवीन मारुती YY8 इलेक्ट्रिक SUV क्रेटापेक्षा मोठी असेल. क्रेटाची लांबी 4300 मिमी, रुंदी 1790 मिमी आणि उंची 1620-1635 मिमी आहे. मारुतीची नवीन इलेक्ट्रिक कार MG ZS EV सारखी मोठी असेल. नवीन EV मध्ये 2700mm लांब व्हीलबेस असेल तसेच त्याची लांबी, रुंदी आणि उंची अनुक्रमे 4275 मिमी, 1880 मिमी आणि 1640 मिमी असेल.

बॅटरी रेंज

मारुती YY8 इलेक्ट्रिक SUV 2WD (टू-व्हील ड्राइव्ह) आणि AWD (ऑल-व्हील ड्राइव्ह) कॉन्फिगरेशनसह ऑफर केली जाण्याची शक्यता आहे. कंपनी त्यात 48kWh किंवा 59kWh चा बॅटरी पॅक देऊ शकते, जे एकदा पूर्ण चार्ज केल्यावर 400 किमी ते 500 किमीची रेंज देऊ शकते.

किंमत किती असेल?

नवीन मारुती इलेक्ट्रिक SUV ची किंमत 13 ते 15 लाखांच्या दरम्यान असू शकते. भारतातील सर्वाधिक विकल्या जाणार्‍या इलेक्ट्रिक कार - Tata Nexon EV - पेक्षा ती स्वस्त असेल, ज्याची किंमत 14.29 लाख ते 16.90 लाख रुपय (सर्व, एक्स-शोरूम) आहे .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

Ghatkopar East Assembly Election 2024 Result live : घाटकोपर पूर्व मतदार संघात भाजप आणि शरद पवार गटात दुहेरी लढत

Mira Bhaindar: Assembly Election 2024 Result Live: मिरा-भाईंदर मतदारसंघात सय्यद मुजफ्फर हुसेन विरुद्ध नरेंद्र मेहता

SCROLL FOR NEXT