Maruti Suzuki Offer Esakal
विज्ञान-तंत्र

Maruti Suzuki Offer : कार घ्यायची हीच योग्य वेळ! 'या' गाड्यांवर मिळतोय ५० हजारांहून अधिक डिस्काउंट, पाहा ऑफर

ठराविक मॉडेल्सवर ही डिस्काऊंट ऑफर देण्यात येत आहेत.

Sudesh

भारतात मारुती सुझुकी (Maruti Suzuki) कंपनीच्या गाड्या घेण्याला बहुतांश लोक पसंती देतात. स्वस्त किंमत आणि चांगले मायलेज या गोष्टींमुळे मारुती-सुझुकीच्या गाड्या सामान्यांना आवडतात. तुम्हीदेखील या कंपनीची गाडी घेण्याचा विचार करत असाल, तर हीच योग्य वेळ आहे. कारण आता ठराविक गाड्यांवर भरघोस सूट मिळत आहे.

मारूती सुझुकीची मोठी डीलरशिप नेक्सा कंपनीकडे आहे. नेक्साचे देशभरात ठिकठिकाणी शोरूम आहेत. आपल्याकडे असलेल्या कार्सची विक्री वाढवण्यासाठी नेक्साने आता गाड्यांच्या किंमतीवर ६९ हजार रुपयांपर्यंतची सूट (Nexa discount) जाहीर केली आहे. ठराविक मॉडेल्सवर ही डिस्काऊंट ऑफर देण्यात येत आहेत. कोणत्या गाडीवर नेमकी किती सूट आहे? जाणून घेऊयात.

इग्निस

मारुती सुझुकीच्या इग्निस (Maruti Suzuki Ignis) गाडीवर तब्बल ६९ हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळत आहे. यामध्ये ३५ हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट, १५ हजार रुपयांचा एक्सचेंज डिस्काउंट, दहा हजार रुपये एक्सचेंज बोनस, ५००० रुपये स्क्रॅपेज बोनस आणि ४००० रुपये ISL ऑफर या सगळ्याचा समावेश आहे. इन्गिसच्या लिमिटेड एडिशन मॉडेलवर मात्र एकूण ४९,५०० रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे.

बलेनो

मारुती-सुझुकीची ही हॅचबॅक कार (Maruti Suzuki Baleno) बरीच लोकप्रिय आहे. या गाडीवर एकूण ३५ हजार रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. यामध्ये २० हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट, १० हजार रुपयांचा एक्सचेंज डिस्काउंट आणि ५००० रुपये स्क्रॅपेज बोनस यांचा समावेश आहे. बलेनोच्या सीएनजी व्हेरियंटवर १० हजार रुपयांपर्यंतचा डिस्काउंट मिळत आहे.

सियाझ

मारुती सुझुकी सियाझ या गाडीवर (Maruti Suzuki Ciaz) एकूण ३३ हजार रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. यामध्ये कॅश डिस्काउंटचा समावेश नाही. तर, २५ हजार रुपये एक्स्चेंज बोनस, ५००० रुपये स्क्रॅपेज बोनस आणि ३००० रुपये ISL ऑफर असे डिस्काउंट यामध्ये मिळत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bajarang Punia: कुस्तीपटू बजरंग पुनियावर चार वर्षांची बंदी! नेमकं काय घडलंय?

Uddhav Thackeray: ठाकरेंच्या हातातून मुंबई महापालिकाही जाणार? वाचा काय आहेत पक्षा पुढील आव्हानं

Jitendra Awhad: चौथ्यांदा निवडून येवूनही आव्हाडांचे कार्यकर्ते नाराज; जाणून घ्या काय आहे कारण

EVM पडताळणीच्या मागणीचा अधिकार ‘या’ 2 पराभूत उमेदवारांनाच! प्रत्येक ‘ईव्हीएम’च्या पडताळणीसाठी भरावे लागतात 40 हजार रुपये अन्‌ 18 टक्के जीएसटी, मुदत 7 दिवसांचीच

Panchang 27 November: आजच्या दिवशी विष्णुंना पिस्ता बर्फीचा नैवेद्य दाखवावा

SCROLL FOR NEXT