Masked Aadhaar Card Download : आजच्या डिजिटल युगात वैयक्तिक माहितीचे संरक्षण सर्वांसाठी महत्वाचे आहे. अनेक लोक आपले आधार कार्ड हॉटेल्समध्ये दाखवून नकळतपणे त्यांचा डेटा धोक्यात आणतात. ही एक सवय बनली आहे पण यामुळे माहिती चोरी आणि बँकेच्या फसवेगिरीचा धोका वाढतो. अशा परिस्थितीतून वाचण्यासाठी मास्क केले आधार कार्ड वापरण्याचा सल्ला दिला जातो.हे आधार कार्ड नेमक आहे तरी काय आणि याचा वापर करण्याचे काय फायदे आहेत हे आम्ही तुम्हाला सांगणार आहे.
हे तुमच्या आधार कार्डाचे रूपांतरित रूप आहे. यात तुमच्या आधार क्रमांकातील पहिले 8 आकडे लपवले जातात आणि शेवटच्या 4 आकड्यानाच दाखवले जाते. म्हणजे तुमची वैयक्तिक माहिती कमी उघडी होऊन सुरक्षित राहते.
आधार हे भारतात ओळखपत्र म्हणून वापरले जाणारे महत्वाचे दस्तावेज आहे. त्याची काळजी घेणे गरजेचे आहे. मूळ आधार कार्ड दाखवण्याऐवजी मास्क केले आधार अधिक सुरक्षित पर्याय आहे.
UIDAI ची अधिकृत वेबसाइटवर जा (UIDAI's official website) .
'My Aadhaar' वर क्लिक करा.
तुमचा आधार क्रमांक आणि कॅप्चा भरून टाका.
नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर आलेला OTP टाका.
सत्यापन झाल्यानंतर मास्क केले आधार डाउनलोड करण्याचा पर्याय निवडा.
हॉटेल चेक-इन/आउटसाठी वापरू शकता आणि तुमची माहिती सुरक्षित राखण्यासाठी वापरा.
प्रवास करताना,विमानतळावर ओळखपत्र म्हणून दाखवा.
आपली संपूर्ण आधार माहिती उघड न करता हे मास्क केले आधार वापरा आणि तुमच्या माहितीची सुरक्षा करा.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.