mera ration mobile app launched in India for ration card holders see how to use it and benefits 
विज्ञान-तंत्र

रेशनकार्ड धारकांसाठी Mera Ration App लॉन्च; आता मोबाइलवरच मिळवा सर्व माहिती

सकाळ डिजिटल टीम

रेशनकार्ड धारकांसाठी भारत सरकारने 'मेरा रेशन' (Mera Ration) नावाचे मोबाइल अ‍ॅप सुरू केले आहे, ज्याद्वारे गरजू, गरीब कुटुंबांना रास्त मूल्य धान्य दुकान तसेच रेशनकार्डमधील त्यांची स्थिती तसेच रेशन  कार्डवर उपलब्ध असलेल्या सुविधा याची संपुर्ण माहिती मिळेल. सध्या अ‍ॅन्ड्रॉइड स्मार्टफोनसाठी मेरा राशन मोबाइल अ‍ॅप (Mera Ration App ) सुरू करण्यात आले आहे, आणि ते गुगल प्ले स्टोअर वरून डाउनलोड करता येईल.

आजकाल घरातील प्रत्येक सदस्याच्या हातामध्ये स्मार्टफोन असतोच, अशा परिस्थितीत लोकांच्या मोबाईलमध्ये काही अ‍ॅप्स असावेत असा सरकार प्रयत्न करीत आहे, ज्यामध्यी आपल्या वेगवेगळ्या सरकारी योजनांचे फायदे सहज मिळू शकतील. 

तुम्हाला प्रत्येक गोष्टीची माहिती मिळेल..

वन नेशन-वन रेशन कार्ड उपक्रमाकडे वाटचाल करत असताना ‘मेरा राशन’ मोबाइल अ‍ॅप हे पहिले पाऊल सरकारने टाकले आहे. रेशनकार्डधारकांनी त्यांचे राहण्याचे ठिकाण बदलून नवीन जागेवर स्थानांतरित केले तर ते आपल्या मोबाईलवर देखील जवळचे रेशन दुकान कोठे आहे हे सहज पाहू शकतील. तसेच तेथे कोणत्या सुविधा पुरविल्या जात आहेत ते देखील या अ‍ॅपच्या मदतीने पाहाता येणार आहे. सरकारी आकडेवारीनुसार, देशभरातील ६९ कोटी लोक राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याचा (एनएफएसए) National Food Security Act (NFSA) लाभ घेत आहेत.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (एनएफएसए) याबद्दल सांगयचे झाल्यास,  या कायद्याचा लाभ घेणारे शिधापत्रिकाधारकांना सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे (पीडीएस) प्रति किलो 1 ते 3 रुपये दराने धान्य पुरवठा करण्यात येतो. ही सुविधा 32 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील कोट्यावधी लोकांना या योजनचा लाभ मिळतो. आता माय रेशन अ‍ॅपद्वारे तो घेणे अधिक सोपे होईल. सध्या या अ‍ॅपमध्ये हिंदी आणि इंग्रजी भाषेत माहिती देण्यात आली आहे, परंतु लवकरच ते १४ प्रमुख भाषांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

हे डाउनलोड आणि वापरण्यास सोपे आहे का?

मेरा राशन मोबाइल अ‍ॅप वापरण्यास अगदी सोपे आहे. सर्व प्रथम, आपण हे अ‍ॅप डाउनलोड करा. (गुगल प्ले स्टोअरवर आपल्याला सेंट्रल एईपीडीएस टीमने विकसित केलेला हे अ‍ॅप सहज सापडेल). डाउनलोड केल्यानंतर आपण आपल्या मोबाइल नंबरसह स्वत: ची नोंदणी यामध्ये करा. नोंदणी केल्यावर तुम्हाला तुमच्या रेशनकार्ड क्रमांक विचारला जाईल. नंबर दिल्यानंतर सबमिट करा आणि नंतर आपल्याला रेशन कार्डशी संबंधित सर्व माहिती तुम्हाला मिळेल. माय रेशन अ‍ॅपवर आपल्याला रेशनचे वाटपा बद्दलची मागील 6 महिन्यांपासूनची माहिती तसेच आधार सीडींगबद्दल माहिती मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

सोलापूर जिल्ह्यातील ११ आमदारांनी किती घेतली मते? दुसऱ्या- तिसऱ्या क्रमांकावर कोण? जाणून घ्या, जिल्ह्यातील विजयी अन्‌ दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांची मते

Amol Javle Won Raver Assembly Election 2024 Result Live: रावेर विधानसभा मतदार संघातून अमोल जावळे विजयी

SCROLL FOR NEXT