Mercedes Benz EQA Luxury EV esakal
विज्ञान-तंत्र

Mercedes EV Car : मर्सिडीज बेंझची नवी ई-कार बाजारात; आकर्षक फीचर आणि सुपरफास्ट चार्जिंग क्षमता, जाणून घ्या आणखी काय आहे स्पेशल

Electric Car Launch : लहान आकाराच्या लक्झरी इलेक्ट्रिक गाड्यांच्या (EV) मार्केटमध्ये आता मर्सिडीज बेंझ EQA ही गाडी लाँच झाली आहे.

Saisimran Ghashi

Mercedes Benz : लहान आकाराच्या लक्झरी इलेक्ट्रिक गाड्यांच्या (EV) मार्केटमध्ये आता चांगलीच स्पर्धा पाहायला मिळत आहे. BMW iX1, Volvo आणि Kia EV6 सारख्या गाड्या बाजारात धमाका करत आहेत. पण या सेगमेंटमध्ये मर्सिडीज बेंझचा जास्त अंश दिसत नव्हता. पण मर्सिडीज बेंझ EQA ही गाडी लाँच करून त्यांनीही या स्पर्धेत उडी घेतली आहे.

मर्सिडीज बेंझ EQA ही लोकप्रिय मर्सिडीज बेंझ GLA ची इलेक्ट्रिक आवृत्ती आहे. ही गाडी आधुनिक आणि वेगळी अशा डिझाईनसह बाजारात आली आहे. गाडीच्या पुढच्या बाजूला फुल-विड्थ लायटिंग, ब्लू हायलाइट्स असलेली हेडलॅम्प्स आणि स्टारच्या आकाराचे डिझाईन असलेली ग्रिल आहे. ही डिझाईन गाडीला आकर्षक आणि सुंदर बनवते. त्याचबरोबर क्रोम ऍक्सेंट आणि रेडिझाईन केलेली बंपर गाडीला आणखी स्लीक आणि आकर्षक बनवतात.

बाजूने पाहिली तर EQA ही GLA सारखी दिसते पण या गाडीची खासियत म्हणजे 19-इंचांची एरो-इफिशियंट टायर्स. ही आकर्षक टायर्स गाडीचे सौंदर्य तर वाढवतातच पण गाडीची एरोडायनामिक्स देखील सुधारतात. यामुळे गाडीला वाऱ्याचा विरोध कमी अनुभवायला येतो.

EQA ची मागची बाजू स्लिमर फुल-विड्थ टेललॅम्प्स आणि नवीन बूट लिडने वेगळी दिसते. नंबर प्लेट आता नव्या बंपरवर आहे त्यामुळे ही इलेक्ट्रिक गाडी पेट्रोल गाडीपेक्षा अधिक स्लीक दिसते. पण या डिझाईनमुळे बूटची क्षमता कमी झाली आहे. EQA ची बूटची क्षमता 340 लिटर इतकी आहे तर GLA ची बूटची क्षमता 425 लिटर इतकी आहे.

इंजिन (Engine) ची जागा EQA 190 PS इतकी पॉवर आणि 385 Nm इतका टॉर्क निर्माण करते. ही गाडी 0 ते 100 किमी / तास वेग नेण्यासाठी 8.6 सेकंद घेते. ही स्पीड या सेगमेंटमधील गाड्यांपैकी सर्वात जास्त नसली तरी सामान्य ड्राइव्हिंगसाठी पुरेसे आहे. गाडीची टॉप स्पीड 160 किमी / तास इतकी आहे.

EQA ची सर्वात महत्वाची खासियत म्हणजे त्याची रेंज. 70.5 kWh ची बॅटरी एका चार्जवर 560 किमी इतकी WLTP रेंज देते. सामान्य रस्त्यावर चालवताना ही रेंज सुमारे 450 किमी इतकी मिळण्याचा अंदाज आहे. त्यामुळे वारंवार चार्ज न करता लांबच्या ट्रिपवर सुद्धा सहज जाता येईल.

DC फास्ट चार्जिंगची क्षमता 100 kW इतकी आहे. त्यामुळे गाडी चार्ज करणे सोयीचे आहे. 11 kW AC वॉलबॉक्सने घरी गाडी पूर्ण चार्ज करण्यासाठी 7 तास 15 मिनिटे इतका वेळ लागतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawr : रोहित तू थोडक्यात वाचलास.. वाकून नमस्कार करणाऱ्या रोहित पवारांना अजित दादांचा मिश्किल टोला

Share Market Opening: शेअर बाजारात मोठी वाढ; निफ्टी 24,200च्या पार, सेन्सेक्स 1300 अंकांनी वर, कोणते शेअर चमकले?

Latest Maharashtra News Updates : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विजयी आमदारांची आज बैठक

Share Market Today: शेअर बाजारातील ट्रेंडमध्ये झाला बदल; आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

IPL 2025 Mega Auction Highlights: मुंबई इंडियन्सपासून ते CSK पर्यंत, जाणून घ्या कोणत्या संघात कोणते खेळाडू

SCROLL FOR NEXT