Meta CM3leon eSakal
विज्ञान-तंत्र

Meta CM3leon : टेक्स्ट अन् इमेज जनरेशन आता होणार सोपं; मेटाने सादर केलं नवीन एआय टूल

टेक्स्ट-टू-इमेज आणि इमेज-टू-टेक्स्ट जनरेशनसाठी हे टूल वापरता येईल.

Sudesh

फेसबुक आणि इन्स्टाग्रामची पॅरेंट कंपनी असणाऱ्या मेटाने एक नवीन एआय टूल सादर केलं आहे. टेक्स्ट-टू-इमेज आणि इमेज-टू-टेक्स्ट जनरेशनसाठी हे टूल वापरता येईल. यामुळे आता इतर एआय टूल्सकडे लोक पाठ फिरवण्याची शक्यता आहे.

मेटाने आपल्या ब्लॉगपोस्टमध्ये याबाबत माहिती दिली आहे. 'Chameleon' या रंग बदलणाऱ्या सरड्याच्या नावावरून या एआय टूलचं नाव ठेवण्यात आलं आहे. CM3leon असं नाव असलं तरी त्याचा उच्चार शॅमेलिऑन असाच होत असल्याचं कंपनीने स्पष्ट केलं आहे.

काय करेल हे एआय

या एआय टूलमध्ये तुम्ही एखाद्या चित्राचे वा फोटोचे वर्णन दिले, तर तसाच फोटो किंवा चित्र ते तयार करुन देईल. यासाठी त्याचं टेक्स्ट-टू-इमेज हे फीचर काम करेल. तर, एखादा फोटो तुम्ही यामध्ये अपलोड केल्यानंतर त्यातील माहिती वा त्यात जे दिसतंय ते टेक्स्टच्या स्वरुपात तुम्हाला मिळू शकेल.

या एआय टूलमध्ये तुम्ही एखादा फोटो अपलोड करुन तो एडिट देखील करू शकता. यासोबतच फोटो आणि टेक्स्टआधारित कित्येक कामं यात होऊ शकतील.

एआय जनरेटेड फोटो तयार करणं ही आता खरंतर सामान्य बाब झाली आहे. स्टेबल डिफ्यूजन, डाल-ई आणि मिडजर्नी असे कित्येक प्रसिद्ध एआय टूल्स सध्या उपलब्ध आहेत. मात्र, आपलं एआय टूल हे या सगळ्यांपेक्षा अधिक चांगलं आणि प्रगत असल्याचा दावा मेटाने केला आहे.

इतर टेक्स्ट-टू-इमेज जनरेटर एआय टूल्स हे डिफ्यूजन मॉडेल्सवर आधारित आहेत. तर, मेटाचं शॅमेलिऑन हे टोकन-बेस्ड ऑटोरिग्रेसिव्ह मॉडेलवर आधारित आहे. हे मॉडेल्स डिफ्यूजनच्या तुलनेत अधिक महाग आणि प्रभावी असतात असं मेटाने म्हटलं आहे.

अर्थात, मेटाने अद्याप हे टूल केवळ समोर आणलं आहे. याचं लाँचिंग कधी करण्यात येईल, आणि समान्यांना ते कधी उपलब्ध होईल याबाबत अद्याप माहिती देण्यात आलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi Detained: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

हुश्श! प्रचार एकदाच संपला! पंतप्रधान मोदींपासून केंद्रीय मंत्र्यांसह ५ राज्यांचे मुख्यमंत्री अन्‌ सर्वच पक्षप्रमुखांनी गाजविले सोलापूरच्या विधानसभेचे मैदान, कोणाकोणाच्या झाल्या सभा?

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

SCROLL FOR NEXT