MG मोटर इंडियाच्या स्मार्ट ईव्हीच्या नव्या मॉडेलचे Comet EV चे लॉन्चिंग लवकरच होणार आहे. त्या आधीच Comet EV ही गाडी भारतातील रस्त्यांवर सुस्साट घावत आहे. तिचा एक फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. जिओ मेरे लाल या इंस्टा पेजवरून हा फोटो व्हायरल होत आहे.
या मॉडेलची सर्वांनाच उत्सुकता होती. ती गाडी कधी लॉन्च होणार याची भारतीय ग्राहक वाट पाहत होते. इलेक्ट्रिक कारचे नाव कॉमेट (Comet) आहे. कॉमेट म्हणजे धूमकेतू होय. एमजी इंग्लंड-ऑस्ट्रेलिया मॅकरॉबर्टसन एअर रेसमध्ये भाग घेतलेल्या 1934 च्या लोकप्रिय ब्रिटिश विमानावरून हे नाव घेतले गेले आहे.
MG Motors एप्रिल 2023 मध्ये भारतात आपली बहुप्रतीक्षित इलेक्ट्रिक कार Comet EV लॉन्च करणार आहे. कंपनीने अलीकडेच आपल्या 2- डोअर इलेक्ट्रिक कारचा अधिकृत फोटो जाहीर केला आहे. या इलेक्ट्रिक कारची लांबी केवळ 2.9 मीटर आहे, जी टाटा नॅनोपेक्षाही लहान आहे. नवीन मॉडेलची भारतात एक्स-शोरूम किंमत सुमारे 10 लाख रुपये असण्याची शक्यता आहे. ही कार भारतीय बाजारपेठेत Tata Tiago EV आणि Citroën E C3 शी स्पर्धा करेल.
कारच्या पुढील बाजूस ड्युअल, वर्टिकल स्टॅक केलेले हेडलॅम्प, इंटिग्रेटेड टर्न इंडिकेटरसह एलईडी डेटाइम रनिंग लॅम्प आणि ड्युअल-टोन फ्रंट बंपर मिळतात. विंडस्क्रीनच्या खाली एक क्रोम पट्टी आणि एलईडी लाइट बार आहे. कंपनीने कॉमेटचे अनेक फोटो जारी केले आहेत, ज्यामध्ये ड्युअल-टोन कलर थीम देखील दिसली आहे.
एमजी कॉमेट ईव्हीच्या केबिनमध्ये मोठी रिअर क्वार्टर ग्लास देण्यात आली आहे. त्यामुळे व्हेंटिलेशनची समस्या येणार नाही. या छोट्या कारला व्हील कव्हर्ससह 12 इंच लहान स्टील चाके मिळतील. मागील बाजूस उभ्या स्टॅक केलेले टेल-लॅम्प, एक उच्च-माऊंट स्टॉप लॅम्प आणि लायसन्स प्लेट हाउसिंगसह एक सपाट मागील बंपर असेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.