मुंबई : एमजी मोटर्स इंडियाने (MG Motors India) भारताची पहिली पर्सनल एआय असिस्टंट (AI Assistant) आणि सेग्मेंटमधली पहिली ऑटोनॉमस (लेव्हल-2) टेक्नॉलॉजी असलेली मध्यम आकाराची एसयूव्ही एमजी अॅस्टर( MG Astor SUV) 9.78 लाखांच्या खास सुरुवातीच्या किंमतीत लॉन्च केली आहे.
Astorकारसाठी बुकिंग 21 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे आणि एमजी कंपनीला 2021 मध्ये सुमारे 5,000 डिलीव्हरी पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. पुढील महिन्याच्या सुरुवातीला या कारची डिलीव्हरी सुरू होईल.
Astor ची स्टाईल हा बेस व्हेरिएंट, सुपर, स्मार्ट आणि टॉप-ऑफ-द-लाइन शार्प असे व्हेरियंट उपलब्ध आहेत. MG Astor चे i-SMART तंत्रज्ञान स्मार्ट आणि शार्प व्हेरियंटसाठी 80+ कनेक्टेड कार फीचर्स ग्राहकांना मिळतात. 220 टर्बो एटी आणि व्हीटीआय-टेक सीव्हीटी ट्रान्समिशन ट्रिम्सच्या शार्प व्हेरियंटवर त्याची ऑटोनॉमस लेव्हल 2 टेक्नोलॉजी ऑप्शनल पॅकेज म्हणून दिली जातील.
Astor वर बाय-बॅक प्रोग्राम देखील ऑफर केला जात आहे. या अंतर्गत, नियम आणि अटींवर अवलंबून मालक वाहनाच्या किंमतीच्या 60% ची अपेक्षा करू शकतो. माय एमजी शील्ड प्रोग्रामसह, ग्राहक वॉरंटी एक्स्टेंशन आणि प्रोटेक्ट प्लॅनसह सह त्याच्या मालकीचे पॅकेज पर्सनलाईज करू शकतो.Astor च्या सर्व व्हेरियंटमध्ये 27 सेफ्टी फीचर्स स्टँडर्ड्स दिले आहेत. Astor मध्ये स्टँडर्ड 3-3-3 वॉरंटी पॅकेज मिळते, ज्यामध्ये तीन वर्षे/अमर्याद किलोमीटर्स वॉरंटी, तीन वर्ष रोडसाइड असिस्टन्स आणि तीन लेबर फ्री पिरीयॉडिक सर्व्हिस देण्यात येत आहेत. माय एमजी शील्ड प्रोग्रामसह Astor ग्राहकांना वॉरंटी एक्स्टेंशन आणि प्रोटेक्ट प्लॅनसह आपले ओनारशिप पॅकेज निवडण्याची आणि पर्सनलाईझ करण्याची मुभा मिळते.Astor तीन स्टाईल व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे दरम्यान या कारची किंमत 9.78 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 220 टर्बो इंजिनसह टॉप-ऑफ-द-लाइन शार्पसाठी ती 16.78 लाख रुपयांपर्यंत जाते. एमजी Astor मध्ये दोन इंजिन पर्याय दिण्यात आले आहेत. यात 1.5-लिटर पेट्रोल मोटर असून जी 110PS ची पावर आणि 144 Nm टॉर्क जनरेट करते. दुसरे पॉवर 1.3-लिटर टर्बो पेट्रोल देखील आहे जे 140PS पावर आणि 220Nm टॉर्क जनरेट करते.
ग्राहक आजपासून एमजीच्या वेबसाइट (www.mgmotor.co.in) वर जाऊन Astor ची टेस्ट ड्राइव्ह घेऊ शकतात आणि प्री-रिझर्व करू शकतात. बुकिंग 21ऑक्टोबर 2021 सून सुरू होईल आणि डिलिव्हरी नोव्हेंबर 2021 मध्ये सुरू होईल.ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.