Micromax In Note 2 
विज्ञान-तंत्र

स्वस्तात खरेदी करा Micromax In Note 2; पाहा किंमत, स्पेसिफिकेशन्स

सकाळ डिजिटल टीम

Micromax In Note 2 या आठवड्याच्या सुरुवातीला भारतात लॉन्च करण्यात आला होता आणि आता तो आजपासून पहिल्यांदाच देशात विक्रीसाठी उपलब्ध होईल. यात क्वाड रियर कॅमेरा सेटअप आणि पंच-होल डिझाइनसह 6.43-इंचाचा AMOLED डिस्प्ले, कॉर्निंग गोरिल्ला ग्लास सुरक्षा आणि 20:9 आस्पेक्ट रेशो आहे. तर फोनमध्ये तुम्हाला मीडियाटेक हेलिओ G95 प्रोसेसरसह, 4GB RAM आणि 64GB ऑनबोर्ड स्टोरेजसह देण्यात आले आहे. तसेच Micromax In Note 2 हा फोन Android 11 आउट-ऑफ-द-बॉक्स वर काम करतो.

नुकतेच लॉन्च झालेला मायक्रोमॅक्स नोट 2 आज दुपारी 12 वाजल्यापासून भारतात प्रथमच विक्रीसाठी उपलब्ध होईल. Micromax नोट 2 च्या फक्त 4GB+64GB व्हेरिएंटसाठी ची किंमत 13,490 रुपये आहे. मायक्रोमॅक्सचा हा फोन ब्लॅक आणि ब्राऊन (ओक) कलर पर्यायांमध्ये ऑफर केला जात आहे. हे कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून तसेच फ्लिपकार्टवरून खरेदी केला जाऊ शकतो.

एका इनट्रोडक्टरी ऑफर म्हणून, Micromax In Note 2 फोन मर्यादित कालावधीसाठी 12,490 रुपयां च्या सवलतीच्या किमतीत ऑफर केला जात आहे. याव्यतिरिक्त, Flipkart ग्राहकांना Citibank कार्डांवर 10 टक्के सूट आणि Flipkart Axis बँक क्रेडिट कार्डवर 5 टक्के कॅशबॅक देखील मिळेल.

Micromax IN Note 2 वर मिळत असलेल्या ऑफर्स

- Citi क्रेडिट/डेबिट कार्डांवर 10% सूट, 1000 रुपयांपर्यंत

- Flipkart Axis Bank क्रेडिट कार्डांवर 5% अमर्यादित कॅशबॅक -

Google Nest Hub (2nd Gen) 4,999 रुपयां मध्ये मिळवा

- Google Nest Mini 1,999 रुपयां मध्ये मिळवा

- Lenovo स्मार्ट क्लॉक इसेंशीयल 2,999 रुपयांत मिळवा

- 433 रुपये प्रति महिना पासून सुरू होणारे EMI

स्मार्टफोनमध्ये काय खास असेल?

स्मार्टफोन ड्युअल नॅनो सिम सपोर्टसह येतो आणि Android 11 OS वर चालतो. फोनमध्ये 20:9 आस्पेक्ट रेशोसह 6.43-इंच फुल-एचडी+ (1080x2400 पिक्सेल) AMOLED डिस्प्ले, पीक ब्राइटनेस 550 निट्स आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टस सुरक्षा दिली आहे.

- , यात 4GB RAM सह जोडलेला MediaTek Helio G95 प्रोसेसर आहे. फोनमध्ये 64GB ऑनबोर्ड स्टोरेज मिळते जे मायक्रोएसडी कार्डने 256GB पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये 48-मेगापिक्सेल प्रायमरी सेन्सरसह क्वाड रियर कॅमेरा सेटअप मिळतो. सोबत 5-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड-एंगल सेन्सर, 2-मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर आणि 2-मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर देखील आहे. यात 16-मेगापिक्सेल सेल्फी सेन्सर दिला आहे.

कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये 4G LTE, Wi-Fi 802.11 AC, Bluetooth v5, GPS/A-GPS, USB Type-C आणि 3.5mm हेडफोन जॅक यांचा समावेश आहे. फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे.

Micromax In Note 2 मध्ये 5000mAh बॅटरी आहे जी 30W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीचे म्हणणे आहे की कंपॅटिबल चार्जरच्या मदतीने 25 मिनिटांत बॅटरी 50 टक्के चार्ज होऊ शकते. फोन डायमेंशन्स 159.9x74.3x8.34 मिलीमीटर आणि वजन 205 ग्रॅम आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS Test: भारतीय संघ ऑस्ट्रेलियात ४-० असं जिंकूच शकत नाही...! सुनील गावस्करांनी दिला मोलाचा सल्ला

Dharashiv Vidhan sabha election : धाराशिवमधल्या चारही मतदारसंघांमध्ये बंडखोरी टाळण्यात महायुती अन् महाविकास आघाडीला यश; लढत स्पष्ट

Hingoli Assembly : हिंगोली जिल्ह्यात कसं आहे राजकीय गणित? कुणाविरुद्ध कोण लढणार?

"म्हणूनच मराठी अभिनेत्रींना बॉलिवूडमध्ये कामवाली बाईचं काम दिलं जातं" ; तृप्ती खामकरने सांगितलं कटू सत्य

Zip and go sadi : झिप अँड गो साडी; नवीन फॅशन ट्रेंड जो आपला लूक बनवतो स्टायलिश

SCROLL FOR NEXT