Microsoft लाँच करणार मोबाईल गेम स्टोर लाँच करणार esakal
विज्ञान-तंत्र

Microsoft Game Store : मोबाईल गेमर्ससाठी आनंदाची बातमी! Microsoft जुलैमध्ये स्वतःचे मोबाईल गेम स्टोर लाँच करणार

Online Games : कँडी क्रश सागा आणि कॉल ऑफ ड्यूटी आणि बरच काही

सकाळ वृत्तसेवा

Microsoft : टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात मायक्रोसॉफ्ट ही आघाडीची कंपनी असली तरी मोबाईल गेमिंगमध्ये मात्र थोडी मागे आहे. त्यामुळे कंपनी हा नवीन स्टोर लाँच करून मोबाईल गेमर्सना आपल्याकडे खेचण्यासाठी प्रयत्न करत आहे. मायक्रोसॉफ्ट कंपनी जुलै महिन्यात स्वतःचा वेब-आधारित मोबाईल गेम स्टोर लाँच करणार असल्याची घोषणा Xbox ची अध्यक्षा सारा बॉण्ड यांनी केली आहे.

या नवीन स्टोरमध्ये मायक्रोसॉफ्टच्या गेम स्टुडिओंच्या अनेक गेम्स असतील, असे सांगण्यात आले आहे. यात लोकप्रिय कँडी क्रश सागा आणि कॉल ऑफ ड्यूटी मोबाइलसारखे गेम समाविष्ट असतील. तसेच, वेब-आधारित असल्याने हा स्टोर कोणत्याही अँपच्या मर्यादेत न अडकता सर्व डिवाइसेसवर आणि सर्व देशांमध्ये उपलब्ध असेल.

या स्टोअरच्या माध्यमातून मायक्रोसॉफ्ट गेमच्या इन-गेम खरेदींवर सूट देखील देऊ शकते, अशी शक्यता आहे. कारण, अँप स्टोर्स जसे की गूगल प्ले स्टोअर आणि ऍप स्टोअर थोड्या थोडक्या गेमवर 30 टक्केपर्यंत कमिशन घेतात.

त्यामुळे मायक्रोसॉफ्ट थेट विक्रीद्वारे थोडी जास्त सूट देऊन गेमर्सना आकर्षित करू शकेल. भविष्यात गुगल आणि ऍप स्टोअरला टक्कर देणारा स्वतंत्र ऍप स्टोर ठरू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vinod Tawde: ''अप्पा मला वाचवा!'' विनोद तावडेंनी खरंच 'तो' मेसेज केला का?

Latest Marathi News Updates : अनिल देशमुख हल्ला प्रकरणाचं AI रिक्रिएशन; विशेष पोलिस महानिरिक्षकांची माहिती

IND vs AUS Viral Video: सर्फराजची कॅचवरून विराट कोहलीने उडवली खिल्ली; ऋषभ पंत तर हसून लोटपोट झाला

Assembly Election 2024 : एसटी बस निवडणूक कर्तव्यावर... प्रवासी स्टॅण्डवर, सातारा जिल्ह्यातील प्रवाशांचा खोळंबा

Pune Crime : प्रेमसंबंधास नकार; समाज माध्यमावर अश्लील छायाचित्रे टाकून मित्राकडून तरुणीची बदनामी

SCROLL FOR NEXT