मायक्रोसॉफ्ट विंडोज सर्व्हर क्रॅश झाल्यामुळे जगभरात लॅपटॉप आणि कंप्युटर डाउन झाले आहेत. मायक्रोसॉफ्टचा सर्व्हर डाऊन झाल्याने जगभरात खळबळ उडाली असून अनेक महत्वाच्या सेवा ठप्प झाल्या आहेत. असे असताना काही लोकांना मात्र या संधीचं सोनं केल्याचं पाहायला मिळतंय. सोशल मीडियावर यासंबंधी मीम्सचा महापूर आला आहे. लोक अनेक मजेशीर मीम्स इंटरनेटवर पोस्ट करत आहेत.
या आऊटेज दरम्यान मायक्रोसॉफ्ट कंपनीने म्हटले आहे की ते Microsoft 365 ॲप्स आणि सेवांवर परिणाम करणारी समस्या दूर केली जात आहे. मात्र, या समस्येचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. मायक्रोसॉफ्टने सोशल मीडिया 'एक्स' वरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, परिस्थिती सुधारत आहे. मात्र, बराच वेळ उलटून गेल्यानंतर देखील जगभरातून अडचणी येत असल्याच्या बातम्या येत आहेत. डाउनडिटेक्टर या इंटरनेट आउटेजेसवर लक्ष ठेवणारी वेबसाइटने सांगितले की व्हिसा, एडीटी सिक्युरिटी आणि ॲमेझॉन यासह अमेरिकन एअरलाइन्स आणि डेल्टा यासह विविध एअरलाइन्स सेवांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
लोकांना अडचणींचा सामना करावा लागत असताना दुसरीकडे सोशल मीडियावर मात्र युजर्स चांगलीच मजा घेत आहेत. एकापेक्षा एक भन्नाट मीम्स, पोस्ट व्हायरल होत आहेत, ज्या पाहून तुम्हालाही हसू येईल. ऑफिसमध्ये काम बंद पडल्यामुळे सोशल मीडियावर मायक्रोसॉफ्टचा सर्व्हर डाऊन झाल्यामुळे लोक आनंदोत्सव साजरा करत आहेत. . कामाच्या या ब्रेक दरम्यान लोक मिम्मावर खूप कमेंट करत आहेत.
प्रत्येक कंपनीतील आयटी विभाग-
मायक्रोसॉफ्ट क्रॅशनंतर ऑफिसमध्ये लोक रिकाम्या वेळाचा आनंद घेत आहेत
लोक मायक्रोसॉफ्ट डाऊन झाल्यानंतर कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांच्या भावना-
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.