Mob-Ion AM 1 Electric Scooter esakal
विज्ञान-तंत्र

Mob-Ion कंपनी आणणार इलेक्ट्रिक स्कूटर, सिंगल चार्जवर धावणार १४० किमी

भारतात आता मोब-आयन ही फ्रेन्च कंपनी इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : Mob-Ion कंपनी भारतासह जागतिक पातळीवर इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करण्याची योजना आखत आहे. ती सिंगल सीटर आणि डबल सीटर व्हेरिएंटमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर सादर करणार आहे. मोब-आयन एक फ्रेन्च मोबिलिटी स्टार्टअप असून ती नुकतीच चर्चेत आली आहे. तिने आता आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर AM1चा आणली आहे. एएम १ पूर्णपणे फ्रान्समध्ये बनलेली पहिली इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांपैकी एक आहे. तिला आफनोर मान्यता असल्याचा दावा केला आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर (Electric Scooter) ७० टक्के फ्रान्समध्ये बनवली गेली आहे.

१४० किमीची असेल रेंज

Mob-in Am 1 इलेक्ट्रिक स्कूटर AM1 एक ब्रशलेस इलेक्ट्रिक मोटारद्वारे चालू होते. या स्कूटरमध्ये ३ केडब्ल्यूची बॅटरी देण्यात येत आहे. तिच्यात स्वॅपिंग बॅटरी ऑप्शन दिले गेले आहे. तिला एक एकदा चार्ज केल्यावर १४० किमीची रेंज देते. कंपनीचा दावा आहे, की बॅटरी पूर्णपणे चार्ज करण्यासाठी दोन तास आणि तीस मिनिटांचा वेळ लागतो. ही इलेक्ट्रिक स्कूटर ४५ kmph ची टाॅप स्पीडपर्यंत पोहोचू शकते. (Mob Ion Company Will Launch Electric Scooter)

फिचर्स

फिचर्सविषयी बोलाल तर एएम १ ला बॅटरीवर धावणाऱ्या या स्कूटरमध्ये सर्व आधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत. यात एलईडी हेडलाईट्स, एक जीपीएसवर आधारित स्थळप्रणाली, एक रिव्हर्स गिअर आणि एक अँटी थेफ्ट सिस्टिमचाही समावेश आहे. त्यात काम्प्युटर किंवा स्मार्टफोनच्या मदतीने रिमोट शटडाऊनची सुविधा आहे. यात एक डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोलही मिळते. जे बॅटरी पातळीवर रेंज लेफ्ट आदी महत्त्वाची माहिती देते.

भारतात किती किंमत असेल ?

मोब आयनने एएम १ ची किंमत ३ हजार ५८२ युरो (३.०४ लाख रुपये) ठेवली आहे. किंमतीवरुन ती भारतात विकली जाणारी सर्वात महागडी इलेक्ट्रिक स्कूटर ठरेल. दुसरीकडे तिची भारतात कमी किंमत ठेवले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. फ्रेन्च ईव्ही स्टार्टअप ९९ युरोच्या मासिक वर्गणी शुल्कावर इलेक्ट्रिक स्कूटर घेता येऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT