Charge Card : आज मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. त्यामुळे अनेकांना सारखा सारखा मोबाईल चार्ज करावा लागतो. यासाठी सोबत चार्जर घेऊन फिरावे लागते. मात्र, जर चार्जर पॉईंट नसेल तर, सोबत चार्जर असूनही काही उपयोग होत नाही.
परंतु, आता चार्जरसोबत नसतानाही काही मिनिटांमध्ये मोबाईल चार्ज होणार आहे. विशेष म्हणजे काही मिनिटात चार्ज होणारे हे उपकरण कार्डप्रमाणे आहे. त्यामुळे ते अगदी सहजपणे खिशात कॅरी करता येणार आहे. सध्या बाजारात या डिव्हाइसची जोरदार चर्चा सुरू आहे.
नेमकं डिव्हाईल काय?
चार्जरशिवाय चार्ज करता येणाऱ्या या डिव्हाईसचे नाव चार्जिंग कार्ड असे असून, ते आकाराने बँकेच्या एटीएम कार्डप्रमाणे आहे. कार्डच्या आकारातील या डिव्हाईचा वजन 10 ग्रॅम ते 50 ग्रॅम पर्यंत आहे.
या कार्डमध्ये 2300 mAh ची बॅटरी बसवण्यात आली आहे. ज्याचा वापर तुम्ही तुमचा मोबाईल चार्ज करण्यासाठी वापरू शकता. सध्या या स्मार्ट डिव्हाईसची मोठ्या प्रमाणात विक्री केली जात असून, हे केवळ 500 ते 2000 रूपयांमध्ये खरेदी करता येते. डिव्हाईसनुसार याच्या किमतीत फरक असून, तुम्ही तुमच्या सोईनुसार एखादे डिव्हाईस निवडू शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.