अमेझॉन आणि फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स वेबसाईटचे मोठे सेल उद्या, म्हणजेच 8 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. मात्र, अमेझॉन प्राईम आणि फ्लिपकार्ट प्लस यूजर्सना आजपासूनच सेलचा अॅक्सेस मिळाला आहे. यामध्ये स्मार्टफोनवर सगळ्यात जास्त डील्स मिळत आहेत.
तुम्ही जर नवीन 5G स्मार्टफोन घ्यायचा विचार करत असाल, तर ही एक चांगली संधी आहे. दिवाळीपूर्वीच तुम्ही नवा प्रीमियम फोन घरी आणू शकता. कोणत्या सेलमध्ये, कोणत्या मॉडेलवर किती डिस्काउंट मिळत आहे याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.
फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डे सेलमध्ये रिअलमी, रेडमी, मोटो, पोको, सॅमसंग आणि अॅपल या कंपन्यांच्या फोनवर मोठी सूट मिळत आहे. रिअलमीचा C51 या फोनची किंमत 10,999 रुपये आहे. मात्र, सेलमध्ये हा केवळ 7,999 रुपयांना उपलब्ध आहे. तर रिअलमीचा C53 हा फोन 9,499 रुपयांना उपलब्ध आहे.
सॅमसंगचा F14 5G या स्मार्टफोनची किंमत 18,490 रुपये आहे. सेलमध्ये हा फोन केवळ 12,490 रुपयांना उपलब्ध आहे. तर सॅमसंग S22 5G हा 85,999 रुपयांचा प्रीमियम स्मार्टफोन केवळ 39,999 रुपयांना मिळत आहे. S21 FE 5G हा 69,999 रुपयांचा प्रीमियम फोन केवळ 29,999 रुपयांना मिळत आहे.
फ्लिपकार्टच्या सेलमध्ये इनफिनिक्स स्मार्ट 7 हा स्मार्टफोन केवळ 5,810 रुपयांना उपलब्ध आहे. तर Infinix Hot 30i हा स्मार्टफोन 7,319 रुपयांना उपलब्ध आहे. यासोबतच व्हिवो, ओप्पो, पोको, रेडमी, मोटोरोला अशा कित्येक स्मार्टफोन ब्रँड्सवर मोठा डिस्काउंट मिळत आहे.
अमेझॉनवर सगळ्यात मोठ्या ऑफर्स या वनप्लस, सॅमसंग आणि अॅपल अशा प्रीमियम ब्रँड्सवर मिळत आहेत. सोबतच आयकू, रेडमी लाव्हा, आयटेल, ऑनर अशा ब्रँड्सवर देखील डिस्काउंट मिळत आहे.
सुपर ओपनर ऑफरमध्ये OnePlus Nord CE3 Lite हा 5G फोन केवळ 17,499 रुपयांना मिळत आहे. तर सॅमसंग M34 5G हा फोन 16,499 रुपयांना मिळत आहे. रिअलमी Narzo 60 5G हा स्मार्टफोन 10,799 रुपयांना मिळत आहे. मोस्ट अफॉर्डेबल 5G स्मार्टफोन म्हणून itel P55 हा स्मार्टफोन दाखवण्यात येतोय. याची किंमत 8,999 रुपये आहे.
अमेझॉनवर आयफोन 13 हा फोन बेस्ट ऑफर लागू केल्यानंतर 44,999 रुपयांना उपलब्ध आहे. तर OnePlus 11R हा फोनदेखील याच किंमतीला उपलब्ध आहे. या सर्व किंमती बेस्ट ऑफर्स लागू केल्यानंतरच्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.