विज्ञान-तंत्र

Mobile Screen Problems :मोबाईलची स्क्रीन सतत होतेय Black Out?  तूम्हीच करू शकता तिला ठिक, कसे ते पहा!

स्वत:च फुकटात दूर करा मोबाईल स्क्रीनचा हा प्रॉब्लेम

Pooja Karande-Kadam

Mobile Screen Problems : जेव्हा तूम्हाला कुठेतरी बाहेर जायचं असतं. तूम्ही फ्रेश होत असाल किंवा चेंज करत असताना अचानक फोन वाजतो. तेव्हा तूम्ही घाईत फोन हातात घेता पण मोबाईलची स्क्रीन ब्लॅक आऊट झालेली असते. तेव्हा रागात तूम्ही फोन आपटता आणि निघून जाता.

तुम्ही अनेकदा पाहिले असेल की फोनची स्क्रीन ब्लॅक आउट होऊ लागते. अनेक वेळा चालताना फोनची स्क्रीन अचानक काळी पडते आणि काही वेळाने ती स्वतःच बरी होते. याला ब्लॅक आऊट म्हणतात. फोन ब्लॅक आऊट होण्याबाबत तूमचाही अनुभव असाच असेल. तर, काळजी करू नका. या समस्येवर घरीच करता येतील असे अनेक उपाय आहेत.   

सर्वप्रथम तुमच्यासाठी हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की स्क्रीन का ब्लॅक आऊट होते? स्मार्टफोनची स्क्रीन ब्लॅकआउट होण्याची अनेक कारणे असू शकतात आणि काही सोप्या मार्गांनी ती दूर केली जाऊ शकतात.

स्क्रीन ब्लॅक आऊट होण्याचे सर्वात मोठे कारण कालबाह्य अॅप्स आहेत. काही कालबाह्य किंवा जुने अॅप फोनच्या नवीनतम ओएसशी सुसंगत नाहीत किंवा त्यात अनेक त्रुटी आहेत. या कारणास्तव ते वारंवार त्रास देतात.

मायक्रो एसडीमुळे समस्या निर्माण होऊ शकतात. कधीकधी तुमच्या फोनमध्ये इन्स्टॉल केलेली मायक्रोएसडी देखील समस्येचे कारण बनते. कार्डमध्ये तुम्ही दुसऱ्या फोन किंवा पीसीवरून संगीत, फोटो, व्हिडिओ इत्यादी ट्रान्सफर करता आणि त्यातून व्हायरस येतो.

हा व्हायरस तुमचा फोन खराब करू लागतो. त्याचबरोबर कार्ड करप्ट झाले किंवा काही कारणाने खराब झाले तरी फोनची स्क्रीन ब्लॅक आऊट होईल.

ॲप्स

स्क्रीन ब्लॅक आऊट होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे ॲप्स. काही कालबाह्य किंवा जुनी अॅप्स ही फोनच्या लेटेस्ट ओएसशी सुसंगत नसतात किंवा त्यामध्ये अनेक त्रुटी असू शकतात. त्यामुळे ते तुम्हाला वारंवार त्रास होऊ शकतो.

 

मायक्रो एसडी कार्ड

अनेक वेळा तुमच्या फोनमध्ये असलेले मायक्रोएसडी हे देखील समस्येसाठी कारणीभूत ठरू शकते. कार्डमध्ये तुम्ही दुसऱ्या फोन किंवा पीसीवरून संगीत, फोटो, व्हिडिओ इत्यादी ट्रान्सफर करता आणि त्यातून व्हायरस येतो आणि हा व्हायरस तुमचा फोन खराब करू लागतो. त्याचबरोबर कार्ड करप्ट झाले किंवा काही कारणाने खराब झाले तरी फोनची स्क्रीन ब्लॅक आऊट होऊ शकते.

 

व्हायरसमुळे ब्लॅक आऊट

कधीकधी इंटरनेट सर्फिंग किंवा डेटा ट्रान्सफर करताना त्यादरम्यान फोनमध्ये व्हायरस येऊ शकतो, ज्यामुळे तुमच्या फोनमध्ये समस्या निर्माण होऊ शकतात. जर फोनची स्क्रीन ब्लॅकआउट होत असेल तर तुमच्या फोनमध्ये व्हायरस असण्याची शक्यता आहे.

 

 

बॅटरीचा असू शकतो प्रॉब्लेम

आजकाल बहुतेक फोन युनिबॉडीसह येतात, ज्यामुळे स्क्रीन ब्लॅकआउटची समस्या उद्भवते आणि आपल्याला त्याबद्दल माहिती देखील नसते. त्यामुळे तुमच्या फोनमधील ॲप्समुळे कोणतीही समस्या नसल्यास, बॅटरीमुळे तुमचा फोन ब्लॅक आऊट होण्याची शक्यता आहे.

 

 

ब्लॅक आऊटची समस्या कशी सोडवावी ?

  • तुमचा फोन वारंवार ब्लॅक आउट होत असेल तर सर्वात आधी नुकतेच इन्स्टॉल केलेले ॲप्स अनइनस्टॉल करा.

  • फोन दुरुस्त झाला तर चांगले आहे, अन्यथा तुमचा फोन एकदा सेफ मोडमध्ये सुरू करा.

  • फोन ब्लॅक आऊट झाल्यास एकदा त्याची बॅटरी बाहेर काढून तुम्ही फोन ठीक करू शकता.

  • फोनची बॉडी नीट तपासा की बॅटरी फुगत असेल तर फोनची बॅटरी बदला.

  • अशा परिस्थितीमध्ये तुम्ही फोनमध्ये कार्ड टाकले असेल तर एकदा कार्ड काढून फोन रीस्टार्ट करा. तुमचा फोन व्यवस्थित काम करेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT