US Moon Landing eSakal
विज्ञान-तंत्र

US Moon Landing : तब्बल ५० वर्षांनंतर अमेरिकेने चंद्रावर पाठवलं लँडर; मात्र लाँचनंतर काही तासांतच समोर आली मोठी अडचण..

अमेरिकेमध्ये सध्या अवकाश क्षेत्रामध्ये खासगी कंपन्यांच्या सहभागासाठी प्रोत्साहन देत आहे. ‘व्हल्कन’ रॉकेटचे सोमवारी पहाटे फ्लोरिडा येथील अवकाश केंद्रावरून प्रक्षेपण करण्यात आले.

Sudesh

US Moon Lander Mission : अमेरिकेतील युनायटेड लॉन्च अलायन्स या कंपनीच्या ‘व्हल्कन’ या रॉकेटचे सोमवारी चंद्राच्या दिशेने प्रक्षेपण करण्यात आले. या रॉकेटद्वारे ‘ॲस्ट्रॉबॉटिक टेक्नॉलॉजी’ या कंपनीचे लँडर अवकाशात पाठविण्यात आले आहे. सुमारे ५० वर्षांच्या खंडानंतर अमेरिकेने ही चांद्रमोहीम आखली आहे. मात्र, आता या मोहिमेचे भवितव्य धोक्यात असल्याचं दिसत आहे.

लँडर घेऊन जाणाऱ्या रॉकेटमध्ये झालेल्या बिघाडामुळे मोठ्या प्रमाणात इंधन लीक झालं आहे. यामुळे आता लँडिंगसाठी निर्धारित केलेली वेळ पाळणं अवघड होणार असल्याचं म्हटलं आहे. (US Moon Mission) असोसिएट प्रेसने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

अमेरिकेमध्ये सध्या अवकाश क्षेत्रामध्ये खासगी कंपन्यांच्या सहभागासाठी प्रोत्साहन देत आहे. ‘व्हल्कन’ रॉकेटचे सोमवारी पहाटे फ्लोरिडा येथील अवकाश केंद्रावरून प्रक्षेपण करण्यात आले. त्यातील लँडर हा २३ फेब्रुवारीला चंद्राच्या पृष्ठभागावर उतरविण्याचे नियोजन आहे. मात्र, इंधन लीक झाल्यामुळे यामध्ये आता बदल होण्याची शक्यता आहे.

ही मोहीम यशस्वी ठरल्यास चंद्रावर यान अथवा लँडर उतरविणारी ‘ॲस्ट्रॉबॉटिक टेक्नॉलॉजी’ ही खासगी क्षेत्रातील पहिली कंपनी असेल. अशी कामगिरी आतापर्यंत केवळ चार देशांच्या सरकारी अवकाश संस्थांना शक्य झाली आहे. या मोहिमेसाठी ‘ॲस्ट्रॉबॉटिक टेक्नॉलॉजी’ आणि ‘युनायटेड लॉन्च अलायन्स’ या कंपन्यांना ‘नासा’ने मदत केली आहे.

५० वर्षांनंतर मोहीम

चंद्राच्या पृष्ठभागाला स्पर्श करण्याची अखेरची मोहीम अमेरिकेने १९७२ मध्ये आखली होती. ‘नासा’च्या ‘अपोलो १७’ या यानातून गेलेल्या जिनी कार्नन आणि हॅरिसन श्‍मिट यांनी चंद्रावर पाऊल ठेवले होते. चंद्रावर पाऊल ठेवणारे ते अनुक्रमे ११ वे आणि १२ वे व्यक्ती ठरले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सहलीसाठी गेलेल्या कुटुंबावर काळाचा घाला, आई-वडिलांसह मुलगा-मुलगी अपघातात जागीच ठार; गाय आडवी आली अन्..

Latest Maharashtra News Updates : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांना राहुल गांधींनी केला फोन, काय आहे कारण?

Donald Trump : रशिया-युक्रेन युद्ध थांबवू... डोनाल्ड ट्रम्प यांची ग्वाही; मृतांबद्दल दुःख व्यक्त

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंची ‘काम करणारा मुख्यमंत्री’ अशी प्रतिमा झाली यशस्वी

Baba siddiqui Murder case: बिश्नोईच्या हिट लिस्टवर कॉमेडिन मुन्नवर फारुकी अन् श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताब पूनावाला; सुरक्षेत वाढ

SCROLL FOR NEXT