Nokia कंपनीने त्यांचा सर्वात स्वस्त 5G फोन Nokia G300 हा लॉन्च केला आहे. अमेरिकेत नोकिया ब्रँड HMD Global licensee ने तो अधकृतपणे लॉंच केला. हे नवीन मॉडेल वॉटरड्रॉप-स्टाईल नॉच डिझाइनसह लॉंच झालेल्या या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. नोकिया G300 मध्ये OZO ऑडिओ सपोर्ट देखील समाविष्ट आहे, जो व्हिडिओमध्ये स्पॅटियल ऑडिओ अनुभव देतो. हा फोन प्री-लोडेड फीचर्ससह येतो ज्यामध्ये डेडिकेटेड नाईट मोड आणि इलेक्ट्रॉनिक इमेज स्टॅबिलायझेशन (EIS) दिले आहे. नेक्स जनरेशन सेल्युलर कनेक्टिव्हिटीसाठी नोकिया G300 मध्ये ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 480 चिपसेट सपोर्ट देण्यात आला असून हा फोन 18W फास्ट चार्जिंगला देखील सपोर्ट करतो.
Nokia G300 : स्पेसिफिकेशन्स
Nokia G300 स्मार्टफोन अँड्रॉइड 11 वर चालतो. यात 6.52-इंच HD+ (720x1,600 पिक्सेल) डिस्प्ले दिला आहे ज्याचा आस्पेक्ट रेशियो 20: 9 आहे. फोन ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 480 चिपसेट, 4GB रॅमने सुसज्ज आहे. यामध्ये तुम्हाला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप f/1.8 लेन्ससह 16-मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 5-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड शूटर आणि 2-मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ चॅटसाठी नोकिया G300 मध्ये 8 मेगापिक्सलचा सेन्सर आहे.
Nokia G300 64GB ऑनबोर्ड स्टोरेजसह येतो, जो मायक्रोएसडी कार्डसह 1TB पर्यंत वाढवता येतो. कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi 802.11ac, Bluetooth V5, GPS/ A-GPS, NFC, USB Type-C आणि 3.5mm हेडफोन जॅकचा समावेश आहे. पॉवर बटण एम्बेडेड साइड माऊंट केलेले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आले आहे.
HMD Global ने 4,470mAh ची बॅटरी या फोनमध्ये दिली आहे जी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते आणि क्वालकॉमच्या क्विक चार्ज 3.0 शी कम्पॅटिबल आहे. नोकिया जी 300 चे डायमेंशन्स 169.41x78.43x9.28 मिमी आहेत.
फोनची किंमत किती आहे?
सिंगल 4GB+64GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी फोनची किंमत 199 डॉलर (अंदाजे 15,000 रुपये) ठेवण्यात आली आहे. हा फोन एकाच मिटिओर ग्रे रंगात येतो आणि अमेरिकेत 19 ऑक्टोबरपासून खरेदीसाठी उपलब्ध होईल. हे सुरुवातीला प्रीपेड कॅरियर्स स्ट्रेट टॉक आणि ट्रॅकफोन वायरलेस साठी मर्यादित असेल. नोकिया G300 ची जागतिक किंमत आणि उपलब्धता याबद्दल तपशील अद्याप उघड झाले नाहीत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.