Most Demanding Cars In India esakal
विज्ञान-तंत्र

Most Demanding Cars In India : लोकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या या 5 गाड्या

भारतातील तरुण असो वा मध्यमवयीन... गाड्यांची क्रेझ कायमच

सकाळ डिजिटल टीम

Most Demanding Cars In India : भारतातील तरुण असो वा मध्यमवयीन... गाड्यांची क्रेझ कायमच आहे. भारतीय बाजारपेठेत अशा अनेक कार आहेत, ज्या दोन दशकांहून अधिक काळ ग्राहकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. अनेक दशकांनंतरही या कारची लोकप्रियता कमी झालेली नाही. इतकंच नाही तर या कार कंपनीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारच्या यादीत समाविष्ट आहेत. मग या कार नेमक्या आहेत तरी कोणत्या? जाणून घेऊ

Maruti Eeco

मारुतीने 2010 मध्ये आपली इको कार लाँच केली होती. मारुती इको कार सलग 13 वर्षांपासून बाजारपेठेत आपलं स्थान टिकवून आहे. अलीकडेच कंपनीने मारुती इको कार कारच्या विक्रीचा 10 लाख युनिट्सचा आकडा पार केला आहे.

Maruti Swift

मारुतीची स्विफ्ट कार 2005 मध्ये लाँच झाली होती. सध्या कंपनी या कारची तिसरी पिढी असून तिची लोकप्रियता कायम आहे. ही कार कंपनीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारपैकी एक आहे.

Maruti Wagon-R

मारुती सुझुकीच्या सर्वात लोकप्रिय कारपैकी एक वॅगन-आर 1999 मध्ये लाँच झाली होती. मारुती कंपनीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारच्या यादीत दोन दशकांनंतर आणि तिसऱ्या पिढीतही वॅगन-आर कारचा समावेश आहे.

Maruti Baleno Sedan

मारुतीने 1998 मध्ये आपली बलेनो सेडान कार लाँच केली होती, ही कार 2007 पर्यंत विक्रीसाठी होती. त्यानंतर कंपनीने 2015 मध्ये हीच कार हॅचबॅकच्या रूपात ही कार पुन्हा लाँच केली आणि ही कार आतापर्यंत ग्राहकांची पसंतीस कायम आहे.

Hyundai i10

या यादीत पुढील नाव ह्युंदाई आय 10 चं आहे. कंपनीने ही कार 2007 मध्ये लाँच केली होती. ही कार सलग 16 वर्षांपासून कंपनीच्या मागणी असलेल्या कारच्या यादीत कायम आहे. कंपनीकडून सध्या त्याचे नवीन मॉडेल i10 Grand Nios विक्रीस आहे.

Hyundai i20

ह्युंदाईची दुसरी कार ह्युंदाई आय 20 2008 मध्ये लाँच झाली. कंपनी सध्या या कारच्या चौथ्या जनरेशनची विक्री सुरु आहे. या कारचा सलग 15 वर्षांपासून कंपनीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या प्रीमियम कारच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.

Honda City Sedan

या यादीत सेडान कार होंडा सिटीचाही समावेश आहे. ही कार गेल्या 26 वर्षांपासून आपल्या सर्वांची आवडती कार राहिली आहे. कंपनीने या कारमध्ये सहा वेळा अपडेट केली आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT