tech google
विज्ञान-तंत्र

तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वात मोठे व्यवहार; कोणत्या कंपनीची कितीला विक्री ?

Tesla आणि SpaceX यांसारख्या मोठ्या कंपन्यांचे मालक Elon Musk यांनी Twitterला ४४ दशलक्ष डॉलरला खरेदी केले आहे.

नमिता धुरी

मुंबई : छोट्या माशांना खाऊन मोठे मासे जगतात, ही म्हण तुम्हाला माहितीच असेल. त्याचप्रमाणे व्यावसायिक क्षेत्रातही मोठ्या कंपन्या लहान कंपन्यांना आपल्यात विलीन करून घेतात. तंत्रज्ञान क्षेत्रात तर अशा घटना अनेकदा घडतात.

Tesla आणि SpaceX यांसारख्या मोठ्या कंपन्यांचे मालक Elon Musk यांनी Twitterला ४४ दशलक्ष डॉलरला खरेदी केले आहे. यानिमित्ताने तंत्रज्ञान क्षेत्रातील काही मोठ्या अधिग्रहणांबद्दल (Biggest Acquisitions in History) जाणून घेऊ या.

इन्स्टाग्राम

फेसबूक हे जगातील सर्वाधिक वापरले जाणारे समाजमाध्यम व्यासपीठ आहे. फेसबूकने २०१२ साली इन्स्टाग्रामला १ अब्ज डॉलरला खरेदी केली होतो. म्हणजेच ७६ अब्ज ५६ कोटी ९१ लाख ५० हजार रुपयांना हा व्यवहार झाला होता.

facebook instagram

टम्बलर

Tumblr हे समाजमाध्यम संकेतस्थळ Yahoo!ने २०१३ साली १.१ अब्ज डॉलरमध्ये म्हणजेच ८४ अब्ज २१ कोटी ६१ लाख ६५ हजार रुपयांना खरेदी केले होते.

tumblr

क्वेस्ट सॉफ्टवेअर

क्वेस्ट सॉफ्टवेअर या सॉफ्टवेअर कंपनीला Dellने २०१२ साली २.४ अब्ज डॉलर म्हणजेच १८३ अब्ज ८३ कोटी ४१ लाख २० हजार रुपयांना खरेदी केले होते.

quest

नोकिया

टेलीकम्युनिकेशन कंपनी Nokia च्या मोबाइल फोन युनिटला Microsoft ने २०१४ साली ७.२ अब्ज डॉलर म्हणजेच ५५१ अब्ज ८४ कोटी ७६ लाख रुपयांना खरेदी केले होते.

nokia

स्काइप

मायक्रोसॉफ्टने स्काइपला २०११ साली ८.५ अब्ज डॉलरना म्हणजे ६५१ अब्ज १४ कोटी २५ लाख रुपयांना खरेदी केले होते.

skype

मोटोरोला मोबीलिटी

Google ने Motorola Mobilityला १२.५ अब्ज डॉलरना खरेदी केले.

motorola mobility

व्हॉट्सअॅप

फेसबूकने व्हॉट्सअॅपला २०१४ साली खरेदी केले. हा व्यवहार १९ अब्ज डॉलर म्हणजेच १ हजार ४५६ अब्ज ६५ कोटी ३० लाख ५० हजार रुपयांना झाला.

whats app

Red Hat

Red Hat सॉफ्टवेअर कंपनीला IBMने २०१९ साली ३४ अब्ज डॉलर म्हणजेच २ हजार ६०५ अब्ज ३५ कोटी ३७ लाख रुपयांना खरेदी केले होते.

redhat

EMC

२०१५ साली संगणक निर्मिती कंपनी डेलने स्टोरेज कंपनी ईएमसीला ६७ अब्ज डॉलरना म्हणजेच ५ हजार १३२ अब्ज ५९ कोटी ८६ लाख ५० हजार रुपयांना खरेदी केले.

dell

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT