Motorola ने आपला नवीन स्मार्टफोन Moto E32 भारतात लॉन्च केला आहे. कंपनीने हा आपला बजेट फोन म्हणून सादर केला असून Motorola चा लेटेस्ट फोन 90Hz डिस्प्लेसह येतो आणि MediaTek Helio G37 चिपसेटसह सुसज्ज आहे.
या स्मार्टफोनला 50-मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे आणि 5000mAh बॅटरी देखील मिळते. सुरक्षिततेसाठी, फोनमध्ये साइड-माउंट फिंगरप्रिंट स्कॅनर आहे.कंपनीने या वर्षाच्या सुरुवातीला हा फोन युरोपमध्ये लॉन्च केला होते, परंतु भारतात ते थोड्या वेगळ्या फीचर्ससह तो लॉन्च करण्यात आला आहे. हा फोन फ्लिपकार्टवरून खरेदीसाठी उपलब्ध आहे. याची किंमत किती आहे आणि यामध्ये काय खास आहे चला जाणून घेऊया सविस्तर....
Moto E32 चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स
Moto E32 मध्ये 6.5-इंचाचा IPS LCD पॅनेल आहे जो 720x1,600 पिक्सेलचा HD+ रिझोल्यूशन आणि 90Hz चा रिफ्रेश रेट देतो. हा फोन Android 12 OS सह येते ज्याच्या वर Motorola चे My UX दिला आहे. फोनला Android 13 अपग्रेड मिळेल की नाही याची कोणतीही माहिती यावेळी समोर आलेली नाही, परंतु Moto ने कंन्फर्म केले आहे की याला दोन वर्षांचे सिक्योरिटी अपडेट दिले जातील. यात साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर देखील दिले आहे.
या स्मार्टफोनमध्ये Helio G37 चिपसेट Moto E32 मध्ये देण्यात आला आहे. हा 4 GB रॅम आणि 64 GB स्टोरेजसह येतो. त्यासोबतच यात 10W चार्जिंगसह 5000mAh बॅटरी दिली आहे. फोनमध्ये ड्युअल-कॅमेरा सेटअप मिळतो, ज्यामध्ये 50-मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा आणि 2-मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी, समोर 8-मेगापिक्सेल कॅमेरा आहे .पुढील आणि मागील दोन्ही कॅमेरे 30fps फुल एचडी व्हिडिओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करतात. हँडसेटमध्ये फेस अनलॉक, ड्युअल 4G VoLTE, Wi-Fi 802.11 AC, Bluetooth 5.0, GPS, MicroSD कार्ड स्लॉट, USB-C पोर्ट, 3.5mm ऑडिओ जॅक आणि IP52 रेटिंग सारखे फीचर्स दिले आहेत.
Moto E32 ची भारतात किंमत किती?
कंपनीने Moto E32 हा एकमेव व्हेरिएंट लॉन्च केला आहे, जो 4GB रॅम आणि 64GB स्टोरेजसह येतो. भारतात या हँडसेटची किंमत 10,499 रुपये आहे. हे आर्क्टिक ब्लू आणि इको ब्लॅकमध्ये फ्लिपकार्टवर खरेदी करता येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.