Motorola Moto Edge 50 Pro Smartphone Discount Offer esakal
विज्ञान-तंत्र

Moto Edge 50 Pro : सणासुदीला नवीन मोबाईल घेण्याचा विचार करताय? Moto Edge 50 Pro फोनवर मिळतोय 12 हजारांचा बंपर डिस्काउंट,ऑफर बघाच

Saisimran Ghashi

Motorola Smartphone : स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर Moto Edge 50 Pro हा या सणासुदीच्या दिवसांमध्ये उत्तम पर्याय ठरू शकतो. फ्लिपकार्टने ‘Big Shopping Utsav’ नावाने नवीन सेल सुरू केला असून, या सेलमध्ये मोटोरोला कंपनीच्या प्रीमियम स्मार्टफोन्सवर मोठ्या सवलती दिल्या जात आहेत. विशेष म्हणजे Moto Edge 50 Pro वर तब्बल 12,000 रुपयांची घसघशीत सूट मिळत आहे.

एप्रिल 2024 मध्ये लाँच झालेला हा स्मार्टफोन उच्च दर्जाच्या फिचर्ससह येतो. यात 6.7-इंचाचा pOLED डिस्प्ले असून, 144Hz चा रिफ्रेश रेट आहे. स्नॅपड्रॅगन 7 जन 3 प्रोसेसरवर आधारित हा फोन अतिशय वेगवान परफॉर्मन्स देतो. 50 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आणि 50+10+13 मेगापिक्सलचा ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप असल्यामुळे हा स्मार्टफोन फोटोसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

फ्लिपकार्टवर सध्या हा फोन 41,999 रुपयांच्या जागी फक्त 29,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. याशिवाय, फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डवर खरेदी केल्यास 5 टक्के कॅशबॅक देखील मिळतो. तसेच जुन्या फोनच्या एक्स्चेंज ऑफरमध्ये 20,000 रुपयांपर्यंतची अतिरिक्त सवलत मिळू शकते.

Moto Edge 50 Pro हा फोन अँड्रॉइड 14 ऑपरेटिंग सिस्टमसह येतो आणि 12GB RAM तसेच 512GB पर्यंत स्टोरेजसह उपलब्ध आहे. त्याचबरोबर, IP68 रेटिंगमुळे हा फोन पाण्याच्या प्रतिकारक्षमतेसह येतो, ज्यामुळे तो जास्त काळ टिकाऊ आणि सुरक्षित आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pankaja Munde: दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंकडून लक्ष्मण हाकेंचा "गोंडस लेकरू" म्हणून उल्लेख

Ranji Trophy 2024: जम्मूचा शुभम महाराष्ट्रावर पडतोय भारी; एकट्याने डाव उभारला अन् ठोकले दणदणीत द्विशतक

Uddhav Thackeray Dasra Melava: दसरा मेळाव्याच्या पार्श्‍वभूमीवर मुंबईतील 'हे' रस्ते असणार बंद!

Dussehra Melava 2024 Live Updates: "नाहीतर तुम्हाला उलथे केल्याशिवाय राहणार नाही," जरांगेंचा सराकरला इशारा

सांगलीच्या जागेसाठी 'या' दोन नेत्यांत रस्सीखेच; विश्वजित कदम, विशाल पाटलांकडे कार्यकर्त्यांनी केली 'ही' मागणी

SCROLL FOR NEXT