Moto Edge X30 Google
विज्ञान-तंत्र

स्नॅपड्रॅगन 8 Gen 1 प्रोसेसरसह लॉंच झाला Moto Edge X30; पाहा किंमत

सकाळ डिजिटल टीम

Moto Edge X30 Launch : स्मार्टफोन बनवणारी कंपनी मोटोरोलाने आपला लेटेस्ट स्मार्टफोन Moto Edge X30 ग्राहकांसाठी लॉन्च केला आहे. महत्वाची बाब म्हणजे हा स्नॅपड्रॅगन 8 Gen 1 प्रोसेसर असलेला हा जगातील पहिला स्मार्टफोन आहे. यामध्ये देण्यात आलेल्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, मोटोरोलाच्या या फोनमध्ये कंपनीने सेल्फी प्रेमींची विशेष काळजी घेतली असून या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 60 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

स्पेसिफिकेशन्स काय आहेत?

या Motorola मोबाइल फोनमध्ये 144Hz रिफ्रेश रेटसह 6.7-इंचाचा फुल HD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच हा फोन 576 Hz टच सॅम्पलिंग रेट आणि 10 बिट HDR10 प्लस पॅनेल सोबत येतो.

स्पीड आणि मल्टीटास्कींगसाठी या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 1 ऑक्टा-कोर प्रोसेसर सोबत ग्राफिक्स आणि इंटेग्रेटेड Adreno 730 GPU आणि X65 5G मॉडेम देण्यात आले आहे. त्यासोबतच 12 GB पर्यंत LPDDR5 RAM आणि 256 GB पर्यंत UFS 3.1 स्टोरेज मिळेल. हा स्मार्टफोन लेटेस्ट स्मार्टफोन Android 12 वर आधारित MyUI 3.0 वर काम करतो.

कॅमेरा

ग्राहकांना फोनच्या मागील पॅनलवर तीन रियर कॅमेरे, 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा 5 मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेलचा तिसरा कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या फ्रंटला 60-मेगापिक्सल कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. फोनमध्ये तुम्हाला 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 68W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. सुरक्षिततेसाठी, फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे.

Moto Edge X30 ची किंमत

या Motorola स्मार्टफोनच्या 8 GB RAM / 128 GB स्टोरेज वेरिएंटची किंमत RMB 2999 (अंदाजे 35,540 रुपये), 8 GB RAM + 256 GB स्टोरेज वेरिएंटची किंमत RMB 3199 (अंदाजे 37,941 रुपये) आहे. अंडर-डिस्प्ले सेल्फी कॅमेरासह 12 GB RAM सह 256 GB स्टोरेज वेरिएंटमध्ये लॉंच झालेल्या या मॉडेलची किंमत RMB 3399 (अंदाजे 40,288 रुपये) आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anil Deshmukh: अनिल देशमुखांवर हल्ला कसा झाला, नेमकं काय घडलं? हल्लेखोर देत होते भाजप जिंदाबादच्या घोषणा? मोठा रिपोर्ट समोर

थंडीत उर्जा रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी आहारात काय असावे? ‘हे’ ७ पदार्थ आहारात ठेवा, होतील फायदेच फायदे

Marathwada: जातीयवाद , प्रांतवाद सोडून द्या अन हिंदूत्वासाठी एकत्र या; कालीचरण महाराजांचे आवाहन...

Mumbai Election: मुंबईत मतदारांची संख्या किती? आकडा वाचुन तुम्हालाही बसेल धक्का

...तर ॲडमिनवरही दाखल होईल गुन्हा! सोशल मिडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या ९९ जणांवर कारवाई; सायबर पोलिसांनी हटविल्या ३० पोस्ट; १८ जणांविरुद्ध गुन्हे दाखल

SCROLL FOR NEXT